Skip to main content

पुणेरी पुणेकर मालिका...???

लेखक वल्लभ यांनी बुधवार, 26/05/2010 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मण्डळी, खुप पूर्वी दूर्-दर्शन वर 'पुणेरी पुणेकर' नावाची एक मालिका लागायची. त्याबद्द्ल शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण काही सापडले नाही. कोणी मदत करू शकेल का? धन्यवाद. -वल्लभ

(किनारा )

लेखक चेतन यांनी बुधवार, 26/05/2010 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा (जरा सुधरा) प्रसवलेले काव्य विरलेली शब्द्झोळी अगम्य कल्पना आणि काहीशा फिरवलेल्या ओळी शब्दांचा खेळ यमकासाठी रुची ला गच्ची मुक्तछंदातला कवी कल्पनांचा थर लावी शब्दांच्या पुड्या सोडा- कुठेही कशाही जोडा अर्थ लावुन फिरवुन डोकं आक्रंदतोय वाचक बिचारा ..

गजानन महाराज शेगांव -- एक उत्तम व्यवस्थापन

लेखक कोदरकर यांनी बुधवार, 26/05/2010 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
परवा एका मित्राच्या विवाहानिमित्त श्री गजानन महाराज शेगांव चे दर्शन घडले.. त्यातून च एका उत्तम व्यवस्थापनाची ओळख पटली.. १) माफक दरात,सुन्दर आणि तत्पर, दर्शन, भोजन, वाहतुक व्यवस्था २)तथाकथित पुजारी, बडवे, दुकानदार , दलाल यांचा सुळसुळाट नाही ३) वाजवी स्वच्छता ४) आनंद सागर ची महत्वाकांक्षी निर्मिती महाराष्ट्रातील पहिलेच देवस्थान, जेथे स्वच्छता आणि माफक दर यांचा सुरेख मेळ घातला आहे.. बाकी देवस्थान ट्र्स्ट नी आदर्श घ्यावा असे व्यवस्थापन...खुपच छान अनुभव आला.. ( कड्कडीत उन सोड्ता ) गजानन महाराज की जय!!! - योको

तुझ्या रूपातले राग

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 26/05/2010 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
काही तालात, सुरात, काही लयीत चुकले तुझ्या रूपातले राग मनापासून शिकले रात्री जागवल्या मालकौंस, बागेसरी गात आर्त विराण्या गाइल्या जोगियाच्या प्रहरात भल्या पहाटेला भैरवाच्या चरणी झुकले काळजात कोमेजले मुक्या कळ्यांचे नि:श्वास तरि ग्रीष्मकहराचा नाही केला रे दुस्वास सारंगाच्या सुरांत या वेड्या जिवाला जपले मल्हाराच्या लडिवाळ, मृदू सरी श्रावणात, आळविले केदाराचे सूर संध्यावंदनात तुला भूपात गाताना मीच मला हरवले अखेरच्या मैफलीत विठू लाज माझी राख ऐक प्राणांतून घुमणारी भैरवीची हाक दयाघना, भेट आता; आळवून मी थकले
काव्यरस

महाराष्ट्रात फेसबुकवर बंदी?

लेखक चिंतातुर जंतू यांनी बुधवार, 26/05/2010 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र सरकारच्या गृहखात्याला फेसबुकच्या एका पानावर बंदी आणायची आहे, अशी एक बातमी काही दिवसांपूर्वी प्रसिध्द झाली. ती व तीवरील प्रतिक्रिया वाचून अंमळ करमणूक झाली. कारणः
  • २२ मेच्या बातमीनुसार जे पान गृहखात्याला बंदीच्या कारवाईयोग्य वाटत होते, ते फेसबुकनेच आदल्या दिवशी (मे २१) काढून टाकले होते. आम्हांस हे कसे ठाऊक?

आजच backward रुपवेडं जग...

लेखक शानबा५१२ यांनी बुधवार, 26/05/2010 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
इ.पवार ह्यांचा "....तुझे देख के मेरी मधुबाला.....!!!!" हा धागा वाचला आणि मग प्रतिक्रिया दील्याशिवाय राहवल नाही...........ती प्रतिक्रीया जशीच्या तशी ईथे टाकतो(?) आहे. राग मानु नका व मनावरही घेउ नका(प्रतिक्रियेचा नी आपला संबधच नाही अस म्हणा हव तर).................पण जरा ह्या प्रतिक्रियेतुन थोड मनातल लिहतोय...... एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्यामुळे त्याची/तीची प्रशंसा करणे ,त्याला/तिला ईतरांपेक्षा वेगळी वागणुक देणे म्हणजे शुद्र विचार होय........असे माझे मत. अहो शारीरीक सुंदरता कोणी स्वबळावर,मेहनतीवर कमवत का??मग एखाद्या व्यक्तीची त्यासाठी प्रशंसा का?? बुद्धीमता,चांगला स्वभाव्,बोलण्,चातुर्य,मानुस

ललीमावशी...

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 26/05/2010 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
काल माझी मैत्रीण ललीमावशी गेली. अलीकडे तशी आजारी-आजारीच असायची, काल गेली! ललीमावशी! ललिता सुधीर फडके.. माझे गुरुजी - थोर संगीतकार, गायक बाबूजी यांची पत्नी. स्वत:ही एक उत्तम गायिका असलेली ललीमावशी! ललिताबाई फडके म्हणून सर्वांना परिचित. मी तिला 'ललीमावशी' म्हणायचा. वास्तविक ती मला वयानं, मानानं, अनुभवानं, ज्ञानानं खूप वडील. तरीही तिचा उल्लेख मी माझी 'मैत्रीण' असा केला आहे, याला कारण तिचं माझ्याशी वागणं..एखाद्या जवळच्या जिवलग मैत्रिणीसारखीच ती मला भासायची, तसं माझ्याशी वागायची..खूप लोभ होता तिचा माझ्यावर.. शंकर निवास, शिवाजी पार्क, मुंबई, हे माझं श्रद्धास्थान.. तिथे बाबूजी-ललीमावशी राहायचे.

एका सुरेल व्यक्तिमत्वाचा अस्त ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 26/05/2010 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
मै हूं जयपूरकी बंजारन्...चंचल मेरा नाम .... स्व. रफीसाहेबांच्या अनेक गाण्यांपैकी एक सुरेल गीत. १९४७ साली, म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्या वर्षी आलेल्या "साजन" मधील हे गीत. सी. रामचंद्र उर्फ आण्णांचे कर्णमधुर संगीत , कमर जलालाबादींचे शब्द आणि या गाण्यात रफीसाहेबांबरोबर गाणारी गायिका होती ललिता देऊळकर! याच चित्रपटातील अजुन एक गाजलेले गीत म्हणजे.... "संभल संभल के जैय्यो ओ बंजारे....

रातराणी ? ? ? अरे बाप रे ! ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी बुधवार, 26/05/2010 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
रातराणी ? ? ? अरे बाप रे ! ! ! मोकळ्या केशसंभारांत पाठमोरी उभी ती मंद चांदण्यांत भासे रातराणी परी ती वाटे जणू बोलाविते साद देऊन मजला वाढली धडकन दिलाची पाहुनी एकान्ती तिजला विचारी मना “ काय आता करावे ” ? “ मुखचंद्रमा तरी आज पाहून यावे “. गेलो भेटण्या समीप लोक म्हणतील काय ? पाहुनी एकांती आम्हा जळतील हाय. जाऊन समीप हलकेच न्याहाळले, अन जाहला चंद्र तेजोमय नभीं s..s..s..s..s..s..s थरथरली मम काया भीतीने हाय रे दुर्दैव ! पाठमोरी सासूच् होति उभी निरंजन वहाळेकर
काव्यरस