Skip to main content

घरगुती सावरकर

लेखक भोचक यांनी शुक्रवार, 28/05/2010 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
सावरकरांच्या संघर्षातील कालखंडाचा लेखाजोखा बराचसा त्यांनी लिहून ठेवला आहे. त्यांच्या विचारांचे मंथनही बरेच झाले आहे. त्यांच्यासह बर्‍याच जणांनी ते केले आहे. परंतु, संघर्षाच्या सुरवातीचा कालखंड ओलांडल्यानंतरचे सावरकर कसे होते, या विषयी फारसे कधी वाचनात आले नव्हते. नुकतंच रवींद्र पिंगेच्या 'देवाघरचा पाऊस' या ललित पुस्तकात सावरकरांचे चिरंजीव विश्वासरावांची मुलाखतवजा लेख वाचायला मिळाला. त्यातून 'घरातले' सावरकर कसे होते, ते कळायला मदत झाली. त्यातल्या माहितीचा हा कोलाज.... सावरकरांचा कर्मकाडांवर विश्वास नव्हता. पण ते जानवे नेहमी घालायचे.

फसवणुक - कायदेशीर मदत हवी आहे.

लेखक अभिज्ञ यांनी शुक्रवार, 28/05/2010 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
५ हजार वर्षापूर्वी वेगवेगळ्या ऋषी-मुनींनी माझे भविष्य आणि मला मार्गदर्शक गोष्टी एका नाडीपट्टी वर माझ्यासाठी लिहून ठेवलेल्या होत्या. त्या फक्त माझ्यासाठी आणि माझ्यासाठीच लिहिलेल्या आहेत. त्यावर माझे नावही कोरलेले आहे. शिवाय त्या पट्टीचा या जगातील दुसर्‍या कुणालाही उपयोग नाही. असे असुनही नाडीकेंद्रातल्या लोकानी महर्षींनी फक्त माझ्या साठी लिहिलेली ही पट्टी लपवून ठेवलेली आहे. मला ते देत नाहीतच शिवाय ती वाचायचे पैसे मागत आहेत.

अरे कोणीतरी भीती दाखवाल का?

लेखक sagarparadkar यांनी शुक्रवार, 28/05/2010 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
गेली कित्येक वर्ष मी असा एखादा तरी अनुभव, कथा, किंवा चित्रपटाच्या शोधात आहे ज्यामुळे जरा तरी भीती वाटेल. ८वी-९वीत असेपर्यंत जरा भीती वाटेल असे सिनेमे निदान इन्ग्लिश्मधे तरी येत असत, जसे की Exorcist, Omen, Evil Dead वगैरे वगैरे. माझ्या आत्त्याची एक मैत्रीण तेव्हा पुण्यात ओब्झर्वेट्रीत नोकरीला होती. एका शनिवारी हाफ्-डे नंतर ती ऑफिसच्या समोरच्याच 'राहूल' ला 'The Exorcist' बघायला गेली.

तर्पणाची छाया

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 28/05/2010 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
तर्पणाची छाया
दि. ४ मार्च २०१० "प्रथम पत्नीला स्मरून रामेश्वरच्याकिनाऱ्यावर तर्पण कर" अशी आज्ञा नाडी महर्षींनी केली त्याप्रमाणे मी ३४ वर्षानंतर सौ.छायाला तर्पण करायला मी रामेश्वरमच्या तटावरील समुद्रात सुर्याकडे हात जोडून उभा होतो. तेंव्हा एक वाक्य. क्षणात तरळून गेले. "छाया मी तुझ्या मृत्यूला नकळत का होईना जबाबदार आहे. त्यासाठी तू मला माफ कर. मला माझ्या जबाबदारीच्या त्या बोचणीतून सोडव." डोळ्यातून अश्रु टपकले.

जल्लाद उर्फ चंडाळ

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शुक्रवार, 28/05/2010 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
चंडाळाचं जे निर्दयी काम असतं तेच जल्लादाला करावं लागतं. परंतु चांडाळाच्या भांडाळ स्वभावाप्रमाणे त्यात तोँडाळपणा नसतो. जल्लाद त्याचं काम 'अल्ला'द करतो असा शब्दभ्रम होणे साहजिकच. चांडाळा सारखा ठोस शब्द जल्लादासारख्या हिँदी शब्दाने वाङमयाच्या वेशीबाहेर 'लटकविला' आहे. चांडाळाचा मूल्य(मूळ)अर्थाने नेहमी गालिप्रदानासाठीच उपयोग केला गेल्याने आरोपीच्या रूपातील चांडाळांभोवतीचा फास आवळण्यासाठी हिँदीचे जल्लाद कामी येतात म्हणजे उपयोगी पडतात.

वृषभ राशीच्या व्यक्तींची वैशिष्ट्ये...

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 28/05/2010 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
सूचना: ज्योतिषशास्त्र, राशी आणि स्वभाव वैशिष्ट्ये हे सर्व मानणार्‍या मिसळपावच्या वाचकांसाठी हा चर्चेचा प्रस्ताव.... रास ओळखण्याचा नियम- जन्मकुंडलीत ज्या राशीत चंद्र असतो ती आपली रास असते. मिसळपाव चे जे वाचक वॄषभ राशीचे आहेत त्यांनी आणि ज्या वाचकांचे मित्र/नातेवाईक/ ओळखीचे/ संपर्कातले व्यक्ती वृषभ राशीचे आहेत त्यांनी वॄषभ व्यक्तींचा स्वभाव येथे मांडावा.

तीळ व त्यांचे अर्थ...

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 28/05/2010 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
ज्योतिषशास्त्रात "पूर्ण शरिरावरील वेगवेगळ्या ठीकाणी असलेली तीळ आणि त्यांचे अर्थ "याबद्दल उल्लेख आढळतो. ज्योतिष शास्त्र क्षेत्रातील जाणकार मंडळी या ठीकाणी याबद्दल अधिक माहिती सांगू शकतील काय? या विषयाला वाहीलेले ऑनलाईन/ डाउनलोड करण्याजोगे / छापील पुस्तके / ब्लॉग्ज उपलब्ध आहेत का? असल्यास माहिती द्यावी. तसेच कुणी या विषयाचा अभ्यासक असेल त्याने येथे माहिती द्यावी. कुणाला याबद्दल अनुभवसिद्ध माहिती असल्यास ती येथे शेअर करावी.... ही या चर्चेची अपेक्षा. येथे तीळांबद्दल विज्ञानाच्या अनुषंगाने चर्चा मला अपेक्षीत नाही.

एक प्रचंड अस्वस्थ करणारा लेख

लेखक शिल्पा ब यांनी शुक्रवार, 28/05/2010 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
लोकप्रभात आलेला ब्रिगेडीअर हेमंत महाजन यांचा http://www.loksatta.com/lokprabha/20100604/suraksha.htm हा लेख प्रचंड अस्वस्थ करून गेला...त्यांच्या म्हणण्याप्रमाणे देशात तुकडे झाल्यातच जमा आहेत...सुमारे ३ कोटी बांगलादेशी आपल्या देशात आहेत...इस्लामीकरण वाढत आहे त्याचबरोबर भारतविरोधी कारवायाही वाढत आहेत...खरं तर मी असे लेख वाचायचे सोडून दिलेले आहे कारण आपला नुसताच संताप होतो आणि काहीच करता येत नाही हि जाणीव काही केल्या जात नाही...पण चुकून हा लेख वाचला...खरंच इतकी भयानक परिस्थिती आहे?

वातानुकुलित आराम!

लेखक इंटरनेटस्नेही यांनी शुक्रवार, 28/05/2010 05:04 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज मितीला माझे वय सुमारे २१ वर्षे आणि ७ महिने आहे. नुकतेच माझ्या अभ्यास व शयन कक्षा मधील वातावरण चांगले रहावे, मन प्रसन्न राहावे आणि पर्यायाने अभ्यास चांगला व्हावा म्हणून माझ्या कक्षामध्ये एक १.० टनाचे वातानुकूलन संयंत्र लावले. तर, सांगायचा मुद्दा असा की हे संयंत्र लावल्यापासून मला मोठ्या प्रमाणावर सर्दी आणि डोकेदुखी चा त्रास होऊ लागला आहे, ज्याचा थेट परिणाम माझ्या मनस्वास्थ्यावर आणि अभ्यासावर जाणवतो आहे.