Skip to main content

डंकर्क

लेखक पुष्करिणी यांनी रविवार, 06/06/2010 03:02 या दिवशी प्रकाशित केले.
डंकर्क हून लाखो ब्रिटीश - फ़्रेंच सैनिकांची जर्मनांच्या तावडीतून झालेल्या सहीसलामत सुटकेला काल ( ४ जून ) ७० वर्षं झाली, दुसया महायुदधाच्या घटनाक्रमातील एक अत्यंत महत्वाची घटना. १९३९ पासून फ़्रेंच आणि ब्रिट्ननं जर्मनीविरूद्ध युद्ध पुकारलं. ब्रिटीश सैन्य फ़्रेंच हद्दीत तळ ठोकून बसलय आणि तिकडे जर्मन सैन्य युद्धाची कसून तयारी करतय अशी अवस्था.. १० मे ला चर्चिल पंतप्रधान झाले आणि जवळजवळ त्याच मुहूर्तावर हॉलंड,लक़्झंबर्ग आणि बेल्जियम वर जर्मनीचा हल्लाबोल झाला.

परमेश्वराचे..... मेंदू? ---- क्षमस्व !

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 05/06/2010 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
या विषयावरचे लेखन मला उडवावे लागणार आहे कारण - Copyright .(परंतू ज्याला हा लेख मराठीत वाचायचा आहे त्यांनी मला व्यनि करावा मी तो त्यांना ई-मेल ने पाठ्वीन. मी त्यांना लिहीले आहे. जर नवीन परवानगी मिळाली तर हा लेख आख्खा टाकेन. नशीब ! जयंत कुलकर्णी.

माझी व्ही.आर्.एस.

लेखक बज्जु यांनी शनिवार, 05/06/2010 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
माझी व्ही. आर. एस. वयाच्या तेह्तीसाव्या वर्षी व्ही. आर. एस. म्हणजे जरा अतीच. लोकांची करिअरला सुरवात झालेली असते आणि आमचं करिअर संपल. मुंबईतल्या एका नामांकित चार्टर्ड अकाऊटंट कंपनीमध्ये वयाच्या एकोणीसाव्या वर्षी म्हणजे १९९६ ला नोकरीला लागलो तेव्हा आपण आता ईक्डनच रिटायर होणार अशी आशा होती. सुरवातीची दहा वर्ष व्यवस्थित गेली. पुढे आमची कंपनी एका मल्टीनॅशनल कंपनी बरोबर मर्ज झाली आणि पुढ्ची लक्षण दिसायला लागली. बरं आम्ही पड्लो कॉम्यूटर ऑपरेटर, नवीन कंपनीला आमची गरज नव्ह्ती, त्यांना गरज होती ती सी.ए., कन्सलटंट ई.

२६ जून चे चंद्र्ग्रहण - भाग २ (बाधित जन्मतारखा)

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 05/06/2010 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही वर्षी खालिल जन्मतारखाना जन्मलेल्या व्यक्तीना त्यांच्या पत्रिकेतील रवि २६ जूनच्या बृहच्चौकोनात सापडतो १७ मार्च - २५ मार्च १८ जून ते २५ जून १९ सप्टे ते २६ सप्टे १८ डिसे ते २६ डिसे वरील जन्मतारखाना कार्यनाश, आरोग्याच्या तक्रारी, मानसिक त्रास, निकटच्या लोकांशी मतभेद, आक्रस्ताळीपणा इत्यादि गोष्टी अनुभवास येण्याची शक्यता जास्त आहे खालिल जन्मतारखाना जन्मलेल्या व्यक्तीना त्यांच्या पत्रिकेतील मंगळ २६ जूनच्या बृहच्चौकोनात सापडतो.

नाष्टा-ए-पाणीपुरी

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 05/06/2010 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
पुऱ्‍यांतून पाणी पिणं काय किंवा पाण्याच्या पुऱ्‍या खाणं काय, दोन्ही एकाच आंबट पाण्याच्या दोन बाजू. तिसऱ्‍या बाजूकडून म्हणजे रस्त्यावरून माझ्या नजरेत तो पाणीपुरीचा ठेला भरला. तिथे उपस्थित जनसमुदायाला पाणीपुरी गिळतांना पाहून माझ्याही पोटात कोरड पडली. वळवळणाऱ्‍या जिभेभोवती चळाचळा पाणी सुटले. तरीही त्या पुऱ्‍यांमधल्या आंबट गोड पाण्याची पंचस्वादीय चव जिभेला खूपच हवीहवीशी वाटली अन् त्यामुळेच की काय पाच गिर्रेबाज गोल पुऱ्‍यांची डोकी टचाटचा फुटली! अन् फुटक्या डोक्यानिशी बशीत दाटीवाटीनं आसनस्थ होण्याची शिक्षा त्यांना मिळाली. आणखी काय काय पहावं लागणार गं बाई..

बुलेवार्ड ऑफ ब्रोकन ड्रिम्स....

लेखक निखिल देशपांडे यांनी शनिवार, 05/06/2010 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
ट्रिगरः अर्थातच.. मकीने लिहिलेलं चाँद तनहा!!! रोज ऑफीसमध्ये होणारा तोच तो उशीर. सकाळी ९ ते रात्री ११ पर्यंत मरमर करायची.. त्यानंतर माजिवाड्याला उतरून पुन्हा घरी जायचं अगदी जीवावर येतं.. एकदा का घराकडच्या रस्त्यावर वळलं की रहदारी तशी तुरळकच. कधी कधी तर साथ द्यायला कुत्रंही नसते.. रस्ता मस्त शांत असतो.. मधूनच गार हवेची झुळूक शरीराला गारवा देऊन जाते.. खरेतर हा रस्ता चालण्याचा खूप कंटाळा आलेला असतो.. दिवसभराचा शीण तर असतोच, त्यात कुणाला फोन करावा अशी वेळ पण नसते. अशा वेळेला कंटाळलेल्या जीवाला सोबत एकच....