माझी व्ही.आर्.एस.
माझी व्ही. आर. एस.
वयाच्या तेह्तीसाव्या वर्षी व्ही. आर. एस. म्हणजे जरा अतीच. लोकांची करिअरला सुरवात झालेली असते आणि आमचं करिअर संपल.
मुंबईतल्या एका नामांकित चार्टर्ड अकाऊटंट कंपनीमध्ये वयाच्या एकोणीसाव्या वर्षी म्हणजे १९९६ ला नोकरीला लागलो तेव्हा आपण आता ईक्डनच रिटायर होणार अशी आशा होती. सुरवातीची दहा वर्ष व्यवस्थित गेली. पुढे आमची कंपनी एका मल्टीनॅशनल कंपनी बरोबर मर्ज झाली आणि पुढ्ची लक्षण दिसायला लागली. बरं आम्ही पड्लो कॉम्यूटर ऑपरेटर, नवीन कंपनीला आमची गरज नव्ह्ती, त्यांना गरज होती ती सी.ए., कन्सलटंट ई. प्रोफेशनल स्टाफची, त्या लोकांना त्यांनी सामावून घेतलं. आम्ही अर्थातच लटकलो. पगार, रजा, बाकीचे अलाऊन्सेस ई. व्यवस्थित चालू होत, पण कामाचा काहीच पत्ता नाही. काम सगळं नवीन कंपनीला ट्रान्सफर केलेलं. काम परत आणण्यासाठी कोर्टात केसेस चालु, पगारवाढीच्या अॅग्रीमेंट्साठी कोर्टात केसेस चालु. अर्थात युनीयन असल्यामुळेच आमच्या नोकर्या टिकुन होत्या. पण आता तीन वर्ष झाली कशातच काही प्रगती होत न्हवती.
मुंबईत सगळ्यात जास्त रजा आम्हाला असाव्यात बहुदा. आमच्या नाक्यावरचे सगळे लोक माझ्या रजाच मोजायचे. सगळे शनिवार, रविवार, बँक हॉलीडे, पी.एल., सीक लीव्ह आणि कॅज्युअल लीव्ह सगळे मिळुन १६५ दिवस रजा होत्या. मज्जाच मज्जा. काम नाही, दिवसभर ऑफिस मध्ये पिक्चर बघायचो, नेट असल्यामुळे शेअर मार्केट बघायचो त्यामुळे वेळ चांगला जायचा. मधल्या काळात का कुणास ठाऊक मी पौरोहीत्य शिकून घेतलं होत. आगामी संकटाची चाहुल का काय म्हणतांत ती लागली असावी एखाद वेळेस. तीन वर्षाच्या काळात पौरोहीत्यात आता चांगला जम बसला होता. आणि अचानक मागच्या वर्षी कंपनीने व्ही. आर. एस. लावली. ३ महीन्याचा पगार प्रत्येक नोकरी झालेल्या वर्षासाठी देत होते. युनीयनने आणि आम्ही अर्थातच विरोध केला. आमची एकच मागणी होती आम्हाला काम द्या. पण मॅनेजमेंट काही ऐकायला तयार न्हवती. दरम्यानच्या काळात ३.५ ची व्ही. आर. एस. येऊन गेली होती. या गड्बडीत एक वर्ष गेलं आणि मागच्या महिन्यात पुन्हा कंपनीने व्ही. आर. एस. लावली ४.५ महीन्याची. आता मात्र लोकांचा धीर सुटायला लागला. व्ही. आर. एस. कॉम्पेनसेशन देखील बर्यापैकी मिळ्त होतं.
व्ही.आर.एस. चा दुसरा अर्थ म्हणजे व्हायरल रिटायरमेंट स्कीम. एकाने घेतली की दुसर्याला सुध्दा घ्यावशी वाटते. त्यात अजुन एक मजा म्हणजे आता मिळतय ते पदरात पाडून घ्या पुढे काहीच मिळाल नाही तर ? ही एक भिती सगळ्यांनाच वाटत असते. असो !! एकूण ३८ पैकी ३३ जणांनी व्ही.आर.एस. घेतली.
आईशी आणि बायकोशी बोलुन आणि सगळ्या गोष्टींचा विचार करुन मी देखील व्ही. आर. एस. घ्यायचा निर्णय पक्का केला आणि १७ एप्रील ला फॉर्म भरुन दिला. ३१ मे शेवट्ची तारीख. ३१ मे ला सकाळी आमच्या ०८.०८. च्या ठाणा फास्ट गाडीतल्या लोकांना भेटुन घेतलं, ऊद्यापासुन कोणीही भेट्णार न्हवतं. ऑफीसला पोचलो. आवरा आवरी करण्यात दिवस निघुन गेला. ४.३० वाजले तसे वातावरण गंभीर व्हायला लागलं, कोपर्या कोपर्यातुन गटा-गटाने कलीग एकमेकांच सांत्वन करीत होते, रिटायरमेंट्च्या जवळ आलेले लोक सुध्दा रडायला लागले होते. चला चला आपली आता महाप्रयाणाची वेळ होत आली आहे असे बोलुन मी वातावरण जरा हलंक करायचा प्रयत्न केला पण त्याचा विशेष काही ऊपयोग झाला नाही. शेवटी ५.३० ला आम्ही निघालो ते पुन्हा क्धीही ऑफीसला न जाण्यासाठी.
असो आता ३-४ दिवस झाले आहेत. शेअर मार्केट आणि पौरोहित्य चालु आहेच. दिवस कसा जाईल याची चिंता वाटत होती आता ते काही कठीण वाटत नाहिये. व्ही. आर. एस. कॉम्पेनसेशन देखील बर्यापैकी मिळालयं.
परवाच दांडेकर (ऊर्फ दांडु) नावाचा एक कॉलेजमधला मित्र भेटला होता. त्याला म्ह्ट्ल व्ही. आर. एस. घेतली आणि आता आराम करतोय तरं हसायला लागला. बोलला, सम्या साल्या तुझी सवय गेली नाही अजुन, मला काय चु** बनवतोय ? हे काय तुझं वय आहे का व्ही. आर. एस.च.
असो लोकांना खरंच वाट्त नाही हो आणि कधी कधी मला सुध्दा.
ता. क. : कुठे पुजा वगैरे करायची असेल तर कळवा हो अवश्य.
नुकताच व्ही. आर. एस. घेतलेला आणि आता भरपुर वेळ असलेला
बज्जु गुरुजी.
वाचने
4758
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
अरे रे
छान ! एक
In reply to छान ! एक by परिकथेतील राजकुमार
+१बाकी
In reply to छान ! एक by परिकथेतील राजकुमार
+२
बज्जु
पण
कठोर सल्ला
In reply to कठोर सल्ला by नितिन थत्ते
चांगला प्रतिसाद..
In reply to कठोर सल्ला by नितिन थत्ते
+ १ अगदी उत्तम प्रतिसाद!
नितिन
ही तर सीआरएस
योग्य सल्ला....!!
In reply to योग्य सल्ला....!! by इन्द्र्राज पवार
(या
थत्ते साहेबांशी सहमत....
In reply to थत्ते साहेबांशी सहमत.... by वेताळ
@ वेताळ
अजून बराच पल्ला आहे!
In reply to अजून बराच पल्ला आहे! by अरुंधती
+१ असेच म्हणतो.
आत्ता कठीण
In reply to आत्ता कठीण by पुष्करिणी
आत्ता कठीण
धन्यवाद !!