Skip to main content

एक भन्नाट दुपार !

लेखक भाग्यश्री यांनी मंगळवार, 08/06/2010 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
शनीवार उजाडला.. उजाडला कसलं उलटलाच म्हटले पाहीजे, तेव्हा आम्ही जागे झालो व आता कुठेतरी गेलेच पाहीजे भटकायला असे विचार सुरू झाले.. आधी विचार केला मस्त आवरून मालिबूला जाऊ, बीचवर वेळ घालवू व तेथील नेपच्युन'स नेट मध्ये जेवून भटकत भटकत परत येऊ. जसा प्लॅन तयार होईल तोच प्लॅन एक्झीक्युट करणे म्हणजे आमच्या दृष्टीने पाप असल्यासारखे वागतो आम्ही दोघं!

भोपाल वायू दुर्घटना...न्याय

लेखक शिल्पा ब यांनी मंगळवार, 08/06/2010 06:13 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसत्तात आताच http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=75758:… हि बातमी वाचली...न्यायालयाने वॉरन अंडरसन याचा उल्लेखदेखील केला नाही असे लिहिले आहे...अशीच थट्टा होणार असेल तर लोक का म्हणून कायद्याने वागायला जातील? का त्यांना देशप्रेम वाटेल? पेपर उघडला कि असंच काहीतरी वाचायला मिळतं... :-( नक्की कोणाचं, कुठे आणि काय चुकतंय हे कळायलाच मार्ग नाही..

विण

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 07/06/2010 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे आहेस? आज भेटतोस का? घरी नको. पण नक्की भेट. तुझ्याकडे काय आहे? शिवास चालेल. आज लुढके पर्यंत पिणार आहे. घरी पोचवायची जबाबदारी तुझी. Am I crashing? may be. meet me and find out. You are the crash specialist. बायकोला सांगुन येतोय. तुझ्याबरोबर असलो तर तीला काळजी नसते. आधीच्या क्रॅशेस मधे तुच संभाळले आहेस हे तीला माहीत आहे. ......................................................................................... जवळ जवळ एक वर्षाने भेटतोयस रे. गेली ३० वर्षाची आपली मैत्री. अगदी बिनओझ्याची. कधी जास्त न भेटता मैत्रीची घट्ट विण. शेवटी तु म्हणाला होतास तेच खरे झाले. बायको अक्षरशः कोसळलीय. दाखवत नाही

रायगडावर शिवराज्याभिषेकदिन

लेखक सुनिल पाटकर यांनी सोमवार, 07/06/2010 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
" alt="" /> शिवराज्याभिषेकदिन रायगडावर काल साजरा झाला .त्यावेळी शिवप्रेमींचा उत्साह असा ओसंडून वाहत होता. उद्धव ठाकरे यांची उपस्थिती

अल कायदाचे तीन नंबरचे नेते मुस्ताफा अबुल-याझीद कालवश!

लेखक सुधीर काळे यांनी सोमवार, 07/06/2010 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
अल कायदाचे तीन नंचे नेते मुस्ताफा अबुल-याझीद कालवश! मी २३ जून २००९ साली लिहिलेला अल कायदाचे तीन नंबरचे नेते मुस्ताफा अबुल-याझीद यांची माहिती देणारा लेख लिहिला होता. http://www.misalpav.com/node/8315 गेल्या आठ-दहा दिवसापूर्वी आलेल्या वृत्ताप्रमाणे द्रोणाचार्यांच्या हातून त्यांची अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेवरील प्रदेशात हत्या करण्यात आली. त्यांच्याबरोबर त्याचे कुटुंबीयही मारले गेल्याचे वृत्त आहे.

मोरोपंतांची आर्या हवी आहे

लेखक शशिधर केळकर यांनी सोमवार, 07/06/2010 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, लहानपणी ऐकलेली एक मोरोपंतांची आर्या मला अर्धवट माहीत आहे, आणि नेहेमी मनात रुंजी घालत असते. कोणाला ती पूर्ण येत असेल तर जरूर सांगावे. ती अशी - देवा परमसमर्था दीनदयाळा प्रभो जगन्नाथा, शरण तुला मी आलो, लीन तु़झ्या ठेवितो पदी माथा. तू सागर करुणेचा, देवा ..... पुढे काय? मोरोपंतांची आर्या कुठे वाचता येण्यासारखी आंतरजालावर उपलब्ध आहे का? शशिधर

घर घर घर

लेखक मराठमोळा यांनी सोमवार, 07/06/2010 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, जुन्या काळी एकाच मोठ्या घरात २-३ पिढ्या रहात होत्या. नविन घराची गरज फारशी पडत नव्हती पण आजकाल जवळपास प्रत्येकाला स्वतःचे घर घेण्याची ईच्छा असते किंवा गरज पडते. मीही असाच विचार करत घर घ्याव (ईंवेस्टमेंट होइल, रहायला मोठं घर होइल आणी टॅक्स वाचेल म्हणुन) असं ठरवलं आणी शोध सुरु केला. पण नुसतच घर शोधायला बाहेर पडण्याऐवजी घर घेण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी ध्यानात घ्याव्यात असा विचार करु लागलो. माझ्या लक्षात आलेल्या काही खालील गोष्टी, जाणकारांचे/अनुभवी लोकांची मते अपेक्षित आहेत. १. बिल्डर आणी त्याचा अनुभव (कारण फसवणुकीचे प्रकार कमी नाहीत.) २.