नमस्कार मंडळी,
जुन्या काळी एकाच मोठ्या घरात २-३ पिढ्या रहात होत्या. नविन घराची गरज फारशी पडत नव्हती पण आजकाल जवळपास प्रत्येकाला स्वतःचे घर घेण्याची ईच्छा असते किंवा गरज पडते. मीही असाच विचार करत घर घ्याव (ईंवेस्टमेंट होइल, रहायला मोठं घर होइल आणी टॅक्स वाचेल म्हणुन) असं ठरवलं आणी शोध सुरु केला. पण नुसतच घर शोधायला बाहेर पडण्याऐवजी घर घेण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी ध्यानात घ्याव्यात असा विचार करु लागलो.
माझ्या लक्षात आलेल्या काही खालील गोष्टी, जाणकारांचे/अनुभवी लोकांची मते अपेक्षित आहेत.
१. बिल्डर आणी त्याचा अनुभव (कारण फसवणुकीचे प्रकार कमी नाहीत.)
२. घर घेतोय ती जागा महापालिकेच्या हद्दीत आहे की नाही.
३. पाणी, गॅस आणी वीज पुरवठा यांची सोय.
४. येण्या जाण्याची सोय (पब्लिक ट्रान्स्पोर्ट)
५. सोसायटी मेंटेनन्स, लिफ्ट वीज बॅकअप
६. बांधकामासाठी वापरलेल्या वस्तुंची गुणवत्ता
७. सरकारचे त्या जागेच्या आसपासचे प्लॅन्स (रस्ते किंवा काही ईतर बांधकाम , कचरा डेपो)
८. शाळा,पोलिस स्टेशन्, रेलवे स्टेशन,बस स्टँड, बाजारहाट व ईतर महत्वाची कार्यालये यांचे अंतर
९. घराची दिशा, व्हेंटीलेशन, सुर्यप्रकाश, मजला आणी बिल्डींगच्या आजुबाजुच्या इतर जागेचे भविष्यातले प्लॅन्स लक्षात घेणे महत्वाचे.
१०. घर भुकंपरोधक आहे की नाही.
११. सुरक्षितता आणी शांतता
१२. हो आणी सर्वात मह्त्वाची घराची किंमत (खिशाला परवडेल की नाही )
मला तरी एवढे मुद्दे महत्वाचे वाटतात, तुमची मते/अनुभव मांडा.
आपला,
मराठमोळा
वाचने
2453
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुद्दे
हे ही पहा
आसपासची
माझ्या मते
+०.५
In reply to माझ्या मते by टारझन