Skip to main content

इंग्रजी सिनेमातही घुमणार... शिवाजी महाराज की जय!

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी बुधवार, 09/06/2010 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
आताच मटा मध्ये वाचलेली बातमी येथे देत आहे http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6026826.cms छत्रपती शिवाजी महाराजांवर आजवर अनेक पुस्तके लिहिली गेली, मालिका निघाल्या, मराठी सिनेमे आले. पण या जाणत्या राजाचे महत्त्व उभ्या जगाला कळावे यासाठी आता इंग्रजी सिनेमा येणार आहे. महत्वाकांक्षी कलादिग्दर्शक नितीन देसाई हा भव्यदिव्य प्रकल्प वास्तवात आणणार आहेत. महाराष्ट्राची अस्मिता असणा-या शिवाजी महाराजांबद्दल महाराष्ट्राबाहेर अनेक प्रवाद आहेत.

..पाऊस मोठा अस्सा यावा..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी बुधवार, 09/06/2010 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस मोठा अस्सा यावा! ---------------------------------- खोटा पैसा खरा व्हावा.. पाऊस मोठा अस्सा यावा. चिंबलेल्या पाण्यातुन मग.. लटका तुझा गुस्सा न्यावा. सोसाट्याचे वारे वहावे.. धूळ पाने उडवित जावे.. तुला पदरात लपेटून मग. वार्यालाही अडवित जावे.. स्वप्न सुंदर असे पडावे.. रागावलेली तू..खुशीत यावस.. रात्र बेचैन होताना मग.. मला अलगद कुशीत घ्यावस. थंडी अशी कडक पडावी.. घट्ट तुझी मिठ्ठी व्हावी.. खट्याळ तुझ्या डोळ्यात पाहुन.. मग कामावरही सुट्टी घ्यावी.. -- योगेश जोशी
काव्यरस

बोक्यांची काशीयात्रा...!

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी बुधवार, 09/06/2010 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
शंभर उंदीर खाऊन बोका चालला काशीला अशा अर्थाची हिँदी म्हण प्रसिद्ध आहेच. आमचे भिमाजी आप्पा साठीचे झाले तरी त्यांच्या हाती काठी न येता त्यांची तब्येत अजूनही तरणीताठी आहे याचं सर्वांना केवढं नवल! परंतु साठी पार करताच आप्पांनी चक्क अध्यात्मिक गप्पा मारायला सुरुवात केली. तसे पाहता तरूणपणीही ते कुणाच्या अध्यातमध्यात नसायचेच. त्याला कारणही तसं गोडसर होतं. त्यांचं कुटुंब जरा सैलसर होतं. म्हणजे जाडी-घेरानं नव्हे. संख्येनं मोठं होतं. मोठं म्हणजे फारही मोठ्ठं नाही. इन मिन तीन बायका अन् प्रत्येकीची चार चार पोरं. एवढाच काय तो त्यांचा गोतावळा.

लहानपणच्या आठवणी

लेखक वेदश्री यांनी बुधवार, 09/06/2010 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
"बेट्या, आता तू मोठा झालास. आता वेगळ्या ताटात जेवत जा." मी लहानपणी तिसरीत जाईतो बाबांच्या ताटात जेवायचे. यामुळे त्यांच्या तिखट खाण्याच्या प्रमाणाला आळा बसायचा त्यामुळे ते करवादायचे पण लहान लेकराला काय म्हणा म्हणून असा क्षीण प्रयत्न करायचे. "पुढच्या वर्षीपासून जेवत जाईन वेगळ्या ताटात. अजून मी छोटीच आहे." बागेत जाऊया, सर्कस बघायचीये, नवे बूट घ्यायचे वगैरे म्हटले की बाबांचे "पुढच्या वर्षी" हे उत्तर इतके ठरलेले असायचे की तेच उत्तर माझ्या तोंडून बाहेर पडल्यास नवल ते कसले? ~~~ बाबांच्या हापिसात बसून त्यांच्या कामात त्यांना मदत करण्याची मला कायम हौस.

स्त्रीयांना कशा कशात छळ दिसतो

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 09/06/2010 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्रीयांना कशातही छळ दिसतो आणि उच्च न्यायालयाला त्याचा निवाडा करावा लागतो. ही बातमी छळ कायद्याच्या दूरुपयोगाचा एक उत्तम नमूना आहे. http://www.dnaindia.com/mumbai/report_father-disallowing-children-to-wa…

चर्चा

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 09/06/2010 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
"अहो सर" मागुन हाक आली. पानाच्या ठेल्यावर बंडोपंत उभे होते. बंडोपंत एका बँकेत मॅनेजर आहेत. चर्चा करणे बंडोपंताना फार आवडते. चर्चा करणे व त्या नंतर आव्हान देणे ह्यावर त्यांचे जिवापाड प्रेम विषय कुठलाही चालतो. "कुठे निघालात. स्टेशन ला का? चला मी सोडतो रिक्षाने. आज गाडी मान्सुन मेंटेनंस ला गेलीय" मी न विचारताच खुलासा. इतक्यात पाउस सुरु झाला. आडोशाला थांबलो. "आपला चॅलेंज होता. खरे झाले की नाय. आय. सी.एस.सी चे पालक गेलेच की नाय कोर्टात 'बेस्ट ऑफ फाइव' च्या विरुद्ध." चालायचेच हो बंडोपंत. "ह्या वर्षी पण अ‍ॅडमिशन प्रोसेस चे वांदे होणार. कॉलेज उशिरा सुरु होणार.