चर्चा
लेखनप्रकार
"अहो सर"
मागुन हाक आली.
पानाच्या ठेल्यावर बंडोपंत उभे होते.
बंडोपंत एका बँकेत मॅनेजर आहेत.
चर्चा करणे बंडोपंताना फार आवडते.
चर्चा करणे व त्या नंतर आव्हान देणे ह्यावर त्यांचे जिवापाड प्रेम
विषय कुठलाही चालतो.
"कुठे निघालात. स्टेशन ला का? चला मी सोडतो रिक्षाने. आज गाडी मान्सुन मेंटेनंस ला गेलीय"
मी न विचारताच खुलासा.
इतक्यात पाउस सुरु झाला.
आडोशाला थांबलो.
"आपला चॅलेंज होता. खरे झाले की नाय. आय. सी.एस.सी चे पालक गेलेच की नाय कोर्टात 'बेस्ट ऑफ फाइव' च्या विरुद्ध."
चालायचेच हो बंडोपंत.
"ह्या वर्षी पण अॅडमिशन प्रोसेस चे वांदे होणार. कॉलेज उशिरा सुरु होणार. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार."
हम्म
"तुमच्या सारख्या कार्यकर्त्यानी हा प्रश्न तडीस नेला पाहीजे"
म्हणजे नेमके काय करायचे बंडोपंत ते सांगा. आणि मी कार्यकता आहे हा शोध तुम्हाला कधी लागला हो. आयला शिव्या द्यायला सकाळी सकाळी मीच सापडलो काय? तुमचा मुलगा दहावीत आहे का? नाही ना? मग गप्प बसा की. मला का छळताय.
बंडोपंत थोडावेळ गप्प बसले.
रिक्षा काही मिळेना.
थोड्यावेळाने बंडोपंत परत सुरु झाले.
" का हो सर, तुम्ही विज्ञानवादी की कॉमर्सवादी"
मी वादी नाही आणि प्रतिवादी पण नाही.
" तसे नाही हो. सायन्स ला खुप खर्च असतो. इंजिनियरिंगपर्यंत जवळ जवळ सहा लाख. ते सुद्धा मेरीट असेल तर"
आता त्याला मी काय करु.?
"??????????"
परवडत नसेल तर करु नये. दुसरे पर्याय निवडावेत. कुणी हत्ती, घोडे, हेलिकॉप्टर तर पाठवत नाही ना 'इंजिनियर' व्हा म्हणुन.
इतक्यात रिक्षा आली.
रिक्षात बसल्यावर बंडोपंत परत सुरु झाले.
"तरी पण मध्यम वर्गीय पालकांचे हालच की हो. सहा लाख कुठुन आणणार. आणि ९०% मार्क मिळवुन पास झालेल्या मुलांना ते करु नकोस असे तरी कसे सांगणार. ह्याचे कुणी तरी काही तरी करायला पाहीजे."
ठीक आहे. कुणी तरी काही तरी कशाला. आपणच करु.
"म्हणजे"?
बंडोपंत गोंधळले.
ह्या वर्षी दहावी च्या २० मुलांना दत्तक घेणार आहे. अगदी १२ वी पर्यंत जबाबदारी माझी.जमल्यास ग्रॅज्युएशन ला पण मदत करेन. कसलीही जातीची अट नाही. फक्त आर्थिक दुर्बलता आणि गुणवत्ता ह्या कसोटीवरच मुले निवडणार. कुठलीही जाहिरात नाही. प्रसिद्धी नाही. समारंभ नाही. बोला घेताय २१ व्या ची जबाबदारी.
बंडोपंतांचा चेहेरा धाडकन पडला.
" काय आहे सर, उद्या टुर ला चाललोय. आलो की भेटुच. सविस्तर चर्चा करु. बघुया काय जमतय ते. शुभेच्छा कायम पाठीशी असतीलच"
इथे रिक्षावाला फस्सकन हसला.
बंडोपंत कावरेबावरे.
"एक काम विसरलोच बघा. मला नौपाड्याला सोडा"
बंडोपंत नौपाड्याला उतरले.
.........................................................................................
रिक्षा स्टेशनला थांबली.
माझ्याबरोबर रिक्षावाला सुद्धा उतरला.
पैसे घेइना.
"Nice to meet you sir. Can I have your phone number?"
कशाला रे बाबा?
"एका गरजु पण हुशार विद्यार्थ्याला देइन. मी रिक्षा चालवत असलो तरी संध्याकाळी कॉलेज ला जातो. बी.ए करतोय एकॉनॉमिक्स मधे.
एम.बी.ए करायचा विचार आहे."
कर कर. एक पुस्तक आहे माझ्याकडे ते घेउन जा. खुप उपयोगी पडेल तुझ्या महत्वाकांक्षेला.
वाचने
2625
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
चर्चा
रिक्षावाल
In reply to रिक्षावाल by स्वाती२
बंडोपंत???
गमतीदार चर्चा
गमतीदार चर्चा!
यस्सा
विज्ञानवादी
In reply to विज्ञानवादी by प्रियाली
तुमचे
हे असं खरच घडलं