Skip to main content

आठवते का ...

लेखक प्रज्ञादीप यांनी मंगळवार, 05/10/2021 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
आठवते का तुला साजणा ...? तुझी माझी प्रीत कशी जुळली हृदयी प्रेम धारा कधी वाहीली न तुला कळली न मला कळली बोलता बोलता एकमेकांसोबत आपण किती दूर चालत गेलो परतीच्या या वाटा नकळत साय्रा विसरत गेलो भान न राहीले वास्तवाचे प्रेम पाखरे कशी सीमा ओलांडुन उडाली ..? आठवते का तुला साजणा ...?

माद्रिदचा आलिशान पालासिओ रेआल

लेखक पराग१२२६३ यांनी सोमवार, 04/10/2021 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वी टी.व्ही.वरील वाहिनीवर स्पॅनिश राजधानीतील आलिशान राजप्रासाद पाहिला होता. स्पेन, स्पॅनिश भाषा आणि फुटबॉल टीमबद्दल मला आकर्षण वाटत राहिले आहे. पुढे स्पॅनिश शिकणे राहूनच गेले, पण मला असलेले ते आकर्षण मात्र कमी झाले नाही. दरम्यानच्या काळात काही स्पॅनिश शब्द शिकलो. बऱ्याच वर्षांनी माद्रिदमधल्या राजप्रसादावर पाहिलेल्या त्या कार्यक्रमाची सहज आठवण झाली आणि इंटरनेटवर शोधताना आढळले की, त्या राजप्रासादाला या वर्षी २६० वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्या निमित्ताने लेख लिहिला. रॉयल पॅलेस (स्पॅनिश भाषेतील मूळ नाव – पालासिओ रेआल दे माद्रिद) माद्रिदच्या मध्यभागी वसलेला आहे.

शिद्दत-आणखिन एक अभागी मज्नू

लेखक Bhakti यांनी रविवार, 03/10/2021 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
शिद्दत याचा ट्रेलर मला वाटतं मागच्या महिन्यात पाहिला होता. आवडला होता. परवा सध्याची स्टार गायिका योहानीचं ‘शिद्दत’ गाणं ऐकलं, मस्तच आहे. (थोडी उच्चाराचा खडा जाणवतो पण चालतंय). झालं. मग पाहायचा ठरवला. जग्गी एक स्वप्नाळू मुलगा! उत्साही ,उर्जेने भरलेला. गौतम आणि इराच्या लग्नात गौतमच्या प्रेमाने भरलेल्या स्पीचने भारावून जातो. आणि लवकरच त्याला त्याची जलपरी कार्तिका भेटते. ९० च्या सिनेमाप्रमाणे कार्तिका बड्या घराची आणि जग्गी कफल्लक आणि थोडासा सरफिरा. लवकरच दोघांचं मेतकुट जमलंय, या अंदाजापर्यंत आपण येऊन पोहचतो. तोच कार्तिकाचं काही दिवसांत लंडनला लग्न आहे, ही छोटीशी कलाटणी मिळते.

बखरीतून निसटलेलं पान..

लेखक पाटिल यांनी रविवार, 03/10/2021 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
(आमचे परमस्नेही खासे सेनापती बहाद्दर गुले गुल्फाम अवरंगाबादकरियांनी सदर बैठकीचे वर्तमान ल्हिवून काढणेसंबंधी आम्हांस विनंती केली ऐसीजे..

शहाणी मुलगी ... 2 (#तूम्हणालास)

लेखक प्राची अश्विनी यांनी रविवार, 03/10/2021 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
तू म्हणालास, संस्कारी असणंच असतं एकदम best. नाहीतर आयुष्यं बनतं न सुटणारं total mess. यावर मी बिचारी उलटं काय बोलणार? "तसं नसतं रे" म्हणून झाकली मूठ खोलणार?? ( माहीत आहे मराठीत "खोलणार" म्हणत नाहीत आणि संस्कारी लोक याला लेखनच गणन नाहीत.) पण ते असूदेच. थोडं यमक जुळू देच. हां तर, तुझं म्हणणं मला फारसं नाही पटलं, पण तुझ्या वागण्याचं कोडं मात्र सुटलं. आता कळलं दोघांमधलं दोन हात अंतर.. आधी सीमारेषा बाकी सगळं नंतर. साडेपाच सेकंद handshake, stopwatch लावून छान खुलतो रंग तुझ्यावर..
काव्यरस

सांज फुले

लेखक चांदणशेला यांनी रविवार, 03/10/2021 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
सांज फुलांनी भरू दे काळोखा रंग सावल्यांत उतरू दे धूसर झाली मावळतीची वाट मोहरला लाल केशरी क्षितिजाचा तट पंखात घेऊन भोवतीची वारे परतू लागली चुकार पाखरे सूर्य मिटून राने अंधारली प्रकाशज्योत अलगद विजून गेली अंबरी आकार घेई अर्धी चंद्रकोर रात्र पावलाने पुढे येई हळुवार
काव्यरस

'मी'पणाच्या वर्तुळाभोवती

लेखक चंद्रकांत यांनी शुक्रवार, 01/10/2021 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
'इगो' ही मोठी समस्या असते. आपल्याकडेही ते असावेत (?) फक्त दिसत नसावेत किंवा नाहीत एवढेच. काहीना खरेच काही दिसत नाही. त्यांनी ती नजर कमावलेलीच नसते. ते कसब आत्मसात करण्याची कला अवगत नसते अशा लोकांना. काहीना दिसले तरी जाणवत नाहीत अन् जाणवले तरी मन हे मान्य करेलच असंही नाही. काहीना सोयीच्या गोष्टी सोयीस्कर करण्याचं कसब साधलेलं असतं. काहीना बरंच काही जमतं, काहीना काहीच नाही. सगळ्यांना सगळंच जमतं असं नाही. म्हणून ते काही कुचकामी ठरत नाहीत.