Skip to main content

हाती माझ्या शुन्यच उरले

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 30/06/2010 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
हाती माझ्या शुन्यच उरले
हाती माझ्या शुन्यच उरले खिसा फाटकाच, हाती न काही लागले ||धृ|| कोणास माझा म्हणू मी, कोण कोणाचा होतो मी दैवगतीने सारे मी पण जळले, रक्ताचेही नाते तुटले हाती माझ्या शुन्यच उरले ||१|| कोठूनी आणावा पैसा आता, कशा बांधू इमले माड्या काळाबरोबरी काळच आला, जवळचे सारे काही नुरले हाती माझ्या शुन्यच उरले ||२|| ओळख आता विस
काव्यरस

पारध

लेखक सहज यांनी बुधवार, 30/06/2010 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
वस्ती पाखरांची स्थिरावलेली होती हाव पारध्याची उफाळलेली होती नशा हो सत्तेची नित्य चढत होती भूक जुगार्‍याची चाळवलेली होती गात्रे पाखरांची फुलली देखील नव्हती तरी पसरुनी जाळी सर्वत्र टाकली होती पिसे कापण्याची ही चाल धूर्त होती बहेलियानेच त्यांची तोंडे बांधली होती नव्या पाखरांच्या शाळा पुन्हा बहरती जुन्या पारध्याची ओळख त्यांना नव्हती
काव्यरस

प्राचार्य गेले - सरस्वतीपुत्र हरवला

लेखक अर्धवट यांनी बुधवार, 30/06/2010 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
एका महाविद्यालयाचं आवार. प्राचार्य गाडीतुन उतरतात, पांढरा शर्ट, लेंगा आणि काळं जाकीट, सुरकुतलेला पण उत्साही प्रसन्न चेहेरा, आणि त्यांचे पेटंट मिश्कील हास्य, इमारतीच्या पायर्‍या चढुन येताना, त्यांच्याच व्याख्यानाचा बोर्ड समोर लावला आहे, त्याकडे क्षणभर कटाक्ष टाकुन पुन्हा त्यांच्या नेहेमीच्या पद्धतीने तरातरा चालत, हॉल मधे येतात. हॉल काठोकाठ भरलेला. समोरच्या तांब्याभंड्यातुन थोडे पाणी पीउन प्राचार्य सुरुवात करतात. "आत्ताच येताना खाली मी व्याख्यानाचा बोर्ड बघितला. त्यावर विषय लिहीलेला नाही. तो लिहायचा राहायलाय असं नव्हे.

वस्ती..!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 29/06/2010 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
मी जी दुनिया पाहिली, ज्या दुनियेत राहिलो त्या 'वस्ती'त मला रौशनी नावाची एक घरवाली मावशी भेटली.. त्या वस्तीला, त्या रौशनीला या काही ओळी समर्पित.. वस्ती पाखरांची झळाललेली होती मस्ती कामांधांची उफाळलेली होती! मद्याचे प्याले नाचत होते भूक विश्वामित्राची चाळवलेली होती! गेलो कराया सांत्वन पाखरांचे गात्रे तयांची जळालेली होती! दिले धडे मी शुचिर्भूततेचे यौवंने पाखरांची पोळलेली होती! आला थवा हा नवा पाखरांचा सात्त्विकता तेथे हारलेली होती! --तात्या अभ्यंकर.

विनम्र श्रद्धांजली

लेखक नानबा यांनी मंगळवार, 29/06/2010 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
संतांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणारे प्राचार्य माननीय शिवाजीराव भोसले यांचे आज पुण्यात दु:खद निधन झाले. या महान व्यक्तिमत्त्वास विनम्र आदरांजली...

देखावे..

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 29/06/2010 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
ओळखीचे होते सारे तिथे देखावेच होते न्यारे तिथे! गाईन गीत आता खुशीने वाहतील मोकळे वारे तिथे! लाभेल शांती तिच्या जिवाला आनंदे वाहीन भारे तिथे! फेसाळेल मद्य प्याल्यात आता कोंडाळतील हावरे सारे तिथे! मी आस्तिक, मी नास्तिक उघडीन सारी दारे तिथे! -- तात्या अभ्यंकर.

उपांत्य फेरीचे दावेदार....

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी मंगळवार, 29/06/2010 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
श्वास रोखले गेले आहेत... धडधड वाढली आहे... डिफेंडर्सची भिंत उभी आहे... गोलकीपर शेवटच्या क्षणापर्यंत आपले मोहरे योग्य जागी लावतोय... रेफरीची शिट्टी.... आणि संघाचा सर्वोत्तम स्ट्रायकर फ्री किक घेतो... उड्या मारणार्‍या डिफेंडर्सना चुकवून तो जाबुलानी चेंडू एक बाकदार वळण घेत नेटच्या एका कोपर्‍याचा वेध घेत हवा कापत चाललाय.... गोलकीपरनी जिवाच्या आकांतानी तो चेंडू अडवण्यासाठी झेप घेतली आहे.... आणि... ..... आणि???? आणि काय घडणार पुढे??
विशेष

खेकडे

लेखक जागु यांनी मंगळवार, 29/06/2010 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : ४-५ खेकडे आल लसुण पेस्ट १ चमचा मिरची, कोथिंबीर पेस्ट १ चमचा ४-५ लसुण पाकळ्या ठेचुन एक मोठा कांदा २ चमचे मसाला हिंग, हळद चविपुरते मिठ थोडा चिंचेचा कोळ वाटण : १ कांदा व पाव वाटी सुके खोबरे किसुन भाजुन थंड झाल्यावर वाटावे १ चमचा गरम मसाला. तेल कृती: चिंबोरे साफ करुन घ्यावे. टोपात तेल टाकुन लसणाची फोडणी द्यायची. मग त्यावर कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत तळावा. आता त्यात आल, लसुण पेस्ट टाकुन हिंग हळद, मसाला, चिंबोरे व चिंबोरे बुडतील एवढ पाणी टाकायच.