Skip to main content

रुपया

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 02/07/2010 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
रुपया पूर्ण पणे परिवर्तनीय.....rupee fully convertible... असावा अशी चर्चा व मागणी फार पूर्वी एकली होती..प्रश्न खूप टेकनिकल असल्याने .. कुणी जाणकार समजावून सांगू शकेल काय.. १...म्हणजे नेमके काय... २..फायदे ...तोटे ३..सरकारची भूमिका, ४..आज रुपया परिवर्तनीय. आहे का

तिसर्‍या (शिवल्या)

लेखक जागु यांनी शुक्रवार, 02/07/2010 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारे साहित्य: तिसर्‍या (शिवल्या) १ ते २ वाटे लसुण पाकळ्य ४-५ १ मोठा कांदा चिरुन आल, लसूण, मिरची कोथिंबीर वाटण दिड चमचे. अर्धा वाटी सुके खोबरे व १ मोठा कांदा भाजून केलेले वाटण हिंग, हळद २ चमचे मसाला चविपुरते मिठ अर्धा ते १ चमचा गरम मसाला. पाककृती: पहिला तिसर्‍या स्वच्छ धुवुन घ्यावात. मग त्या एका टोपात त्या बुडतील इथपर्यंत पाणी टाकायचे. व त्याला एक उकळी आणायची. टोप मोठच घ्यायच. तिसर्‍या सोडून टोप अर्ध रिकाम राहील पाहीजे नाहीतर कधी कधी उकळल्यावर पाणी बाहेर येत.

छंद

लेखक नेहमी आनंदी यांनी शुक्रवार, 02/07/2010 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
हा छंद जिवाला का लागला रे डॊळा भरुन तुला असे पाहते रे हा छंद....... बिलगुनी तुला अशी बसले मी स्वप्नात तुझ्या माझ्या रंगले मी तुला माझे म्हणताना फुलले रे डोळा भरुन तुला पाहते रे हा छंद....... हरवुनी तुला अशी बसले मी तू निघोन जाता का हरले मी स्वप्नच माझे बघ चुरगळले रे डोळे भरुन तुला मग पाहते रे हा छंद..... प्रसन्ना जीके. २६-११-०८
काव्यरस

पदरगड ऊर्फ कलावंतीणीचा महाल

लेखक बज्जु यांनी शुक्रवार, 02/07/2010 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
पदरगड उर्फ़ कलावंतीणीचा महाल आतापर्यंत भिमाशंकरला १५-१६ वेळा गेलो असेन. एका वर्षीतर एकाच महिन्यात सलग ३ शनिवार-रविवार भिमाशंकरला गेलो होतो घरच्यांना शंका पण यायला लागली हा भिमाशंकरी मुलगी आणतो की काय घरात? असो. पण भिमाशंकरला चिकटुनच असलेल्या पदरगडावर जायचा योग काही आजवर आला नव्ह्ता. गेल्या रविवारीच मी आणि गिरीश साठे कुठे जायच कुठे जायचं असा विचार करत होतो आणि दोघेही एकदम बोललो पदरगड. ठरल तर मग पदरगड फ़ायनल, कोणीही नाही आलं तरी आपण दोघच जाऊ पण तेवढ्यात तात्या आणि पराग भावे सुध्दा येतो बोलले. शनिवारी संध्याकाळीच खाण्याचं सामान घेतलं. रविवारी पहाटे ५.०० ला मारुती ऒम्नीने निघालो.

संदेश

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 01/07/2010 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
काळाच्या क्षितिजावरुनी संदेश कुणाचा येतो? हा किरण कुणाचा डोळां, ती नजर आपुली देतो? सृष्टीची तुटली नाळ हा कोण दवंडी पिटतो? उगवता सूर्य विश्वाचा हा कोण भुपाळी गातो? उपजला कधी, नसताना सदसद् वा अस्ती नास्ती? जन्माची ज्याच्या वेळ, वेळाच्या जन्मापरती आदीम क्षणांचा साक्षी, अदृष्ट पाहिले म्हणतो सत्याच्या खटल्यामध्ये हा कोण पुरावा देतो? सांकेतिक भाषा याची हो अर्थ गवसता त्रास खटल्याची तेव्हा पडते ही नवीन तारिख खास याला न तयाची खंत, हे गाव निरक्षर, झाले! जाईल पुढिल मुक्कामा, वा त्यापुढल्याही, चाले कालाच्या आदीपासुन, क्षितिजाच्या अंतापरती संदेश पसरतो आहे, एक साक्षर शोधत जगती

पेट्रोलियम पदार्थांवरिल सरकारी नियंत्रण हटवणे योग्य?

लेखक दीपक साळुंके यांनी गुरुवार, 01/07/2010 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यातच युपीए सरकारने इंधन दरवाढ केली हे एव्हाना सर्वांना माहिती आहेच. मात्र याचबरोबर सरकारने एक आणखी महत्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम पदार्थांवरिल सरकारी नियंत्रण हटवण्यात(Deregulation) आलेले आहे. म्हणजे आता आंतरराष्ट्रीय बाजारात ज्याप्रमाणे चढ उतार होतील त्याप्रमाणे पेट्रोलचे दर चढतील/उतरतील. फ्री मार्केट. डिझेलच्या बाबतीत मात्र सरकारने partial deregulation केले आहे. डिझेलचे दर बाजारभावाच्या जवळपास निश्चित करण्याची मर्यादित स्वायत्तता केंद सरकारच्या मालकीच्या इंधन विक्री कंपन्यांना दिली आहे.

ती

लेखक आनंद घारे यांनी गुरुवार, 01/07/2010 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी ऑफिसात होत असलेला माझा नित्याचा जनसंपर्क सेवानिवृत्तीनंतर बंद झाला. शेजारी पाजारी, माझ्या घरी मला भेटायला येणारे आणि मी ज्यांना भेटायला जातो असे सगेसोयरे, आप्त वगैरेची वर्दळ किंचितशी वाढली असली तरी त्या सर्वांच्या फाइली आधीपासून उघडलेल्या आहेत. त्यांत क्वचित एकाददुसरी नवी नोंद झाली तर झाली, एरवी त्या नुसत्याच अपडेट होत असतात. लहान मोठ्या कारणाच्या निमित्याने थोडा प्रवास घडला तर दोन चार वेगळी माणसे भेटतात, निदान दृष्टीला तरी पडतात. यामुळे शरीराला आरामशीर वाटत असली आणि खिशाला परवडत असली तरीही स्थानिक प्रवासासाठी सहसा मी टॅक्सी करत नाही. त्यापेक्षा बसमधून धक्के खात जाणेच पसंत करतो.

विष्णुगुप्त २

लेखक पुष्कर यांनी गुरुवार, 01/07/2010 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
(पार्श्वभूमीकरिता वाचा - विष्णुगुप्त-१) (मागच्या भागात - चालता चालता विष्णू नगराच्या बर्‍यापैकी बाहेरच्या बाजूला आला. त्याला आता बाकी कशाचं भानच राहिलं नव्हतं. आता त्याला समोर दिसत होतं ते फक्त एक मोठ्ठं प्रवेशद्वार आणि त्याच्यापुढे दाट झाडीतून गेलेली एक छोटीशी पायवाट. भराभर पावलं टाकत तो त्या प्रवेशद्वारापाशी येऊन थबकला. त्याला पाहून द्वारपालांनी त्याला हटकलं, "काय रे, काय नाव तुझं?". पण विष्णूचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. समोरच्या दाट झाडीतून पलिकडे दूरवर तिमजली इमारतीच्या दिसणार्‍या एका कळसाकडे तो टक लावून बघत होता.

मिपा सुपर सिलेक्टर - मिपाकरांची फुटबॉल टीम

लेखक छोटा डॉन यांनी गुरुवार, 01/07/2010 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्केमर : १. हा खेळ केवळ मौजमजा आणि विरंगुळा इथपर्तंच मर्यादित असावा. २. स्कोअर सेटर करणे, वैयक्तिक चिखलफेक, वाद-विवाद, गदारोळ आदी बाबी आढणारे व अनावश्यक फाटे फोडणारे प्रतिसाद अपेक्षित नाहीत. वि. सु.