अवलिया को गुस्सा क्यो आता है ?
काल संध्याकाळी दुकान बंद करायला घेतले आणि तेव्हड्यात फोन वाजला. बघतो तर चौपाटीवरच्या बारच्या म्यानेजरचा फोन.
"हॅलो परा साब जल्दी आओ यार, इधर तुम्हारा दोस्त नाना राडा कर रहा है, वेटर को गालीया दे रहा है "
मी डोक्याला हात लावला आणि चौपाटीकडे धावलो. साला चौपाटीचे रंग रुपच बदलून गेले आहे आजकाल हे जाणवुन गेले. चौपाटी अजुनच झगमगायला लागली होती. ह्यावेळी चौपाटीवर तरुणाईचा उत्साह जाणवण्यागत वाढला होता, एका कडेला मोठा स्क्रीन लावुन त्यावर फुटबॉलच्या मॅचेस दाखवल्या जात होत्या. साला क्राउड एकदम खेचला गेला होता तिकडे. काही जुने चेहरे गायब होते तर काही गायब झालेले जुने चेहरे पुन्हा दिसायला लागले होते.
मिसळपाव