Skip to main content

एक समिक्षा ( बी ए भाग दोन)

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 02/07/2010 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या एक आदरणीय सदस्या मृगनयनी देवीनी एक थोर काव्य खेचर टंकणीने स्क्रीनवर उतरवले.. त्या खेचरीच्या काव्यखेचराची विद्यापीठातील अभ्यासक्रमात वर्णी लागली आणि बी ए भाग दोन च्या पेपरात कवितेचे समिक्षण लिहिण्याच्या प्रश्नावर का विद्यार्थ्याने लिहिलेली ही समिक्षा मूळ काव्य खेचरः ____/\____ फार झाला हा कवितेचा पसारा.... आता आवरा आवरा..... आम्ब्याच्या वनात नाच रे मोरा... घाल घाल पिन्गा वारा.... सन्गे पावसाच्या धारा.... आय डोन्ट लव ब्रायन लारा...... यातला कोण बरे पुरुष?= वीर की झारा... जाऊ कशी मी मथुरेच्या बाजारा...... शरारा... शरारा....... तुझा मिर्चीचा तोरा..... रन्ग कधी काळा.. कधी गोरा.... निळ्या निळ्या पिसांचा फुलव फुलोरा... मै हुं आशिक ... अशिक आवारा... मला जाउ द्या ना घरी... आता वजले की बारा..... ___ ___ ___ ___ हे अति होत अस्सेल... तर अन्डी फेकून मारा.... .....मृगनयनी. समिक्षा प्रस्तूक कवितेत नायीकेच्या मनाची उलघाल दाखवताना कवयत्री लिहिते फार झाला हा कवितेचा पसारा.... आता आवरा आवरा..... कविता करून मनातल्या भावना व्यक्त होत नाहीत. कवितेतले शब्द मनाला आवर घालू शकत नाहीत . मनाचा पसारा कव्हर करायला कवितेचा कॅमेरा तोकडा पडतो. तो थोडासा आवरला तर न्यूज म्हणून कव्हर करता येईल. एकाच एपिसोड मध्ये बसु शकेल असे कवयत्रि ला वाटते. आम्ब्याच्या वनात नाच रे मोरा... घाल घाल पिन्गा वारा.... आंब्याच्या वनात वार्‍यासवे पिंगा घालावा...भावनांच्या कल्लोळात अवघे आम्रवन पिग्याने घुसळून काढावे असे कवयित्रीला वाटते. सन्गे पावसाच्या धारा.... आय डोन्ट लव ब्रायन लारा...... मनाचा हा कल्लोळ जणू पावसाच्या धारा आहेत आणि अवघी पृथ्वी न्हाऊन निघत असताना त्या कल्लोळाला ब्रायन लाराच्या एखाद्या झंझावती इनिंगची उपमा सुद्धा तोकडी पडेल असे कवयित्री म्हणते काव्याच्या उपमेत क्रीकेटमधील ही उपमा हे अर्वाचिन काव्यातले एक झळालते रत्न आहे. मराठी कविता हळूहळू भाषीक भौगोलीक क्षितीजे ओलांडत आहे याचीच जाणीव ही उपमा करून देते यातला कोण बरे पुरुष?= वीर की झारा... जाऊ कशी मी मथुरेच्या बाजारा...... शरारा... शरारा....... मथुरेच्या बाजारात शॉपिंगला जाताना आपण ज्याच्या सोबत जातो ती सखी असेल क्जी सख्याहारी असेल याच्या चिंतेत नायीका असताना तिच्या अधिर्‍या झपुर्झा अवस्थेत असणार्‍या मनाची थरथर कवयत्रीने शरारा शरारा या नव्या शब्दाने दाखवली आहे. मराठीच्या दालनात हा नवा शब्द बहाल केला आहे. तुझा मिर्चीचा तोरा..... रन्ग कधी काळा.. कधी गोरा.... निळ्या निळ्या पिसांचा फुलव फुलोरा... मै हुं आशिक ... अशिक आवारा... मला जाउ द्या ना घरी... आता वजले की बारा..... काळा सो की गोर आसो एकदा प्रेमात पडले की सगळा तोरा संपतो. निळ्या नभाच्या पार्श्वभुमीवर मोरपिसारखे फुलणारे प्रेम. हे स्थळकाळाची जाणीव हरपून ठेवते. बारा कधी वाजले तेच कळत नाही. नायीका नायकाला आता हे सगले आवरा असे म्हणते.... बारा वाजले म्हणूनघरी जायचे असते. पण पाय निघत नाही. ___ ___ ___ ___ हे अति होत अस्सेल... तर अन्डी फेकून मारा.. नुसत्या रेखीव चार ___ च्या ओळीत कवयित्रीने शब्देवीण संवादु म्हनजे काय हे दाखवून दिले आहे. प्रेमात असली तरी नायीकेचे पाय जमिनीवरच आहेत. ती लोकाना सांगते माझ्या वेड्या प्रियकराला दगड फेकून नका मारू. अंडी फेकून मारा. निदान भूक तरी भागेल. कवितेच्या शेवटच्या ओळीत प्रेम हे पोटाची भूक भागवू शकत नाहीत हे प्रखर वास्त्व अधोरेखीत केले आहे
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2251
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

विजुभाऊ, इंप्लीमेंटेशन बोंबलेले दिसते. बराच वेळ आहे. :D

छान ! --अवलिया लेख प्रतिक्रिया लिहिणार | खाडकन डिलीट होणार || सखेद फाट्यावर मारणार | निश्चितच ||

~X( 8} :S =)) 8| :SS =)) मी ॠचा र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

In reply to by मी ऋचा

विजुभौ!!!!!!! @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) @) तुम्ही हिचं असं जाहीर प्रकटन कराल.. असं स्वप्नातही वाटलं नव्हतं!!!! ;) अहो... त्या कवितेचा अर्थ मलाही अजून कळला नाहीये हो!! :-?:/ उगीच तुम्ही खूप आग्रह केला.. म्हणून "रा" ला "रा" जोडायचा एक प्रयत्न होता... तो..... =)) आपल्या सारख्या मातब्बर समीक्षकाने या कवितेला एका वेगळ्याच "उन्ची" वर नेऊन ठेवलेले आहे! आभार... दोन्ही हात दन्डापासून जोडुन!!!! ;) ____||____ _________________ असो... माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे.... "आणि मी नि:शब्द!" :| ;) लवकरच येइल... तोपर्यन्त प्रतीक्षा करा........ ;) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

In reply to by मृगनयनी

कसली खंगरी कविता केलीये =)) =)) पार झोपलो ... बाकी रा ला रा जोडण्याच्या प्रयत्नात आमची जोडी का दिसली नाही तुला ? =))

तिच्या अधिर्‍या झपुर्झा अवस्थेत असणार्‍या मनाची थरथर
वा...

"आणि मी नि:शब्द!" शांतता नांदेल .....=)) =)) =))