Skip to main content

काय करावे?

लेखक अवलिया यांनी शुक्रवार, 09/07/2010 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातील एक एमआयडिसी छोटा कारखाना थोडी फार मशिनरी. इंजिनियरींग जॉबवर्क्स ची कामे घेवुन ती पुर्ण करणारा उद्योजक. कारखाना सुरु होवुन दोनच वर्षे झालेली. पीएफ इएसआयसी केवळ कायम कामगारांना. कायम कामगार मोजुन ८. जादा कामाचे पैसे मिळतात. त्यांचा पगार वेळेवर. हा मुद्दा नाही बाकी १०-१२ तात्पुरते, १२-१५ कॉन्ट्रॅक्टरची. कॉन्ट्रॅक्टरला २५० रु माणशी, अधिक ओटी वगैरे दिले जातात. तो त्यातले १५ टक्के कापुन कामगारांना देतो. हा पण मुद्दा नाही तात्पुरते गेटवर कधी काळी आलेले. भरलेले. दिवसाला १२५ ते १७५रु. १२ तास काम. महिन्यातले २५ दिवस. जादा कामाचा हिशोब नाही. १२ तास ड्युटी.

मीरा म्हणे ...........

लेखक झुम्बर यांनी शुक्रवार, 09/07/2010 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
मीरा हसुनी सांगे राधेला रोजच भेटे श्रीहरी मजला हेवा मी करू तरी कसला तो माझ्यातच भरुनी उरला सकाळी माझ्या शेजेवरी सूर्यकिरण बनुनी येतो अल्लड उधळीत उषा लाडिक चाळा तो करितो स्नानासाठी मी जाता माझ्यास्तव तो जल होतो मी माळंता फुले सुगंधी तोच तयातुनी परीमळतो गंध उगळता त्याच्यासाठी चंदन बनुनी तो झिजतो माला गुंफता जाईची तो सूत्र म्हणुनी वावरतो मी नेसता वस्त्र रेशमी तो तयातील मार्दव बनतो मी करिता शृंगार दर्पणी तो सौंदर्य माझे होतो मी छेडीता वीणा विरागी तो तारांचे अंतर बनतो पायी बांधता मी घुंगरू नादमधुर तो झंकारून उठतो रात्री माझ्या गवाक्षातुनी चंद्र बनुनी पाझरतो नक्षत्रांचे
काव्यरस

गणित

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 09/07/2010 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
"खुप दिवसाने भेटतोयस रे". खराय. " तुला एक प्रश्न विचारायचाय" विचार. "तु स्वतः ला काय समजतोस"? माणुस "आर्थिक चौकटी बद्दल बोलतोय" अस का? अं.... मध्यम मध्यम वर्गिय. "जरा सविस्तर सांग बघु." खाउन पिउन सुखी. पण बँक बॅलन्स, ओल्ड एज इन्वेस्ट्मेंट्स वगिरा वगिरा काही नाही. घरात खर्च होते त्याच्या जवळपास उत्पन्न. वर्षाअखेरीस बॅलन्स शीट जमते. कधी थोडीफार शिल्लक. कधी नाही. सापशिडीचा खेळ. "म्हणजे माझ्यासारखेच" बर मग? " ही पोझीशन तुला तुझ्या गुणवत्तेला बुद्धीमत्तेला अनुसरुन आहे का"? आता हे काय नविन? "नाही रे. तु मला कायम म्हणतोस. माझ्या बुद्धीमत्तेचा निट वापर केला असता तर मी खुप कमाउ शकलो असतो.

मसाला मसूर

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 09/07/2010 05:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी >:) , अस्मादिकांना ह्या विभागात बघून दचकू नका :O ... व्यावसायिक स्पर्धेमुळे आता आम्ही मिपाच्या सर्व विभागात शिरकाव करायचे ठरवले आहे.. :B पाककृतीच लिहिणार आहे .. :$ आपापल्या स्वयंपाकघरात तुम्ही तिचे स्वतःच्या जबाबदारीवर विडंबन करू शकता..

कानसेन कोण?

लेखक बहुगुणी यांनी गुरुवार, 08/07/2010 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
गाण्यांच्या दुव्यांसह आणि विजेत्यांच्या नावांसह या स्पर्धेचे आधीचे भाग इथे पहायला मिळतील: पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग, चवथा भाग, आणि पाचवा भाग. खुशखबर: काही (सहृदय!) कानसेन माझ्या टीम मध्ये यायला तयार आहेत! त्याचा पहिला दृश्य परिणाम म्हणून स्पर्धेच्या या भागाच्या संचालिका आहेत "मस्त कलंदर"! भाग ६ चा ध