सहज...
मला वाटलं, म्हणून हे लिहितोय.
कदाचित तो विषय अकारण वाटेल. पण असे काही विषयही, विचार करायला लावतात.
... काल अगदी सहजपणे कानावर पडलेले ते शब्द ऐकून मलाही धक्का बसला आणि मी चमकून त्यांच्याकडे बघितलं.
ट्रेनमध्ये समोरच्या बाकावर ते मस्त गप्पा मारत होते.
एक मध्यम वयाचा माणूस, आणि एक, पोरगेलासा, कॉलेजात जाणारा, नुकती मिसरूड उमटूउमटू लागलेला मुलगा. बहुतेक तो त्या माणसाचा मुलगा असावा. चेहेरेपट्टी बरीचशी मिळतीजुळती.
आणि, बहुधा ते गुजराती असावेत.
कारण, त्यांच्यात `बिझीनेस'च्या `वार्ता' चालल्या होत्या.
बहुतेक तो माणूस भडकमकर रोडवर कॉम्पुटर पार्टसचं दुकान थाटून स्थिरावलेला असणार...