Skip to main content

राजयोग

लेखक हर्षद आनंदी यांनी गुरुवार, 15/07/2010 01:57 या दिवशी प्रकाशित केले.
काशिब, तसे भारताच्या नकाशावरील शोधुनही न सापडणारे गाव. इतर कुठल्याही गावासारखेच शांत आणि सुंदर. निसर्गरम्य. गावातुन वाहणारी नदी, दोन्ही तीरावर विस्तीर्ण शेती. गावकरी गरीब पण खाऊन - पिऊन सुखी. स्वातंत्र्यानंतर जी काही स्थित्यंतर झाली, त्याचे पडसाद गावावर पण पडले. अशातच पाटलचा पोरगा सुर्याजी आधी सरपंच मग आमदार झाला आणि गावाने जणु कातच टाकली. सुर्याजीने आणि त्याच्या पूढच्या पीढीने गावाचा नकाशा पार बदलुन टाकला. घरा घरात वीज आली, पक्के रस्ते झाले. गावा बाहेरच्या जंगलाची साफ-सफाई करुन दोन-तीन कारखाने पण आले. गावात एस.टी तर होतीच, पण आता दोन-चाकी, चार-चाकी पण गावात दिसायला लागल्या.

जेम्स लेनच्या निमित्ताने उघडी पडणारी मराठी वैचारिक दिवाळखोरी

लेखक चिंतातुर जंतू यांनी गुरुवार, 15/07/2010 01:57 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, चिंतातुर जंतू यांचा हा उत्तम लेख त्यावर काही आक्षेपार्ह प्रतिसाद आल्याने आणि त्या प्रतिसादांचा त्रास मिसळपाव प्रशासनाला होऊ शकेल या शंकेतून काही काळ अप्रकाशित करण्यात आला होता. सध्या लेख प्रकाशित करून वाचनमात्र ठेवला आहे. लेखावरील आक्षेपार्ह प्रतिसाद एक एक करून अप्रकाशित केले जातील. तरीही असे प्रतिसाद राहील्यास सजग सदस्यांनी संपादकांना तसे कळवावे. धन्यवाद, संपादक मंडळ जेम्स लेनच्या शिवाजीविषयीच्या पुस्तकावरची बंदी सुप्रीम कोर्टानं उठवल्यामुळे पुन्हा एकदा मराठी माध्यमं आणि जालावर त्याविषयी गदारोळ उठला आहे.

शून्य

लेखक sur_nair यांनी गुरुवार, 15/07/2010 01:51 या दिवशी प्रकाशित केले.
शून्य शून्य गाव शून्य वस्ती शून्य झाडे शून्य घरटी शून्य खिडक्या शून्य दारे शून्य भिंती शून्य वारे शून्य दिवा शून्य वाती शून्य पणती शून्य ज्योती शून्य शब्द शून्य अर्थ शून्य ओळी शून्य पानी शून्य डोळे शून्य आसू शून्य गाली शून्य हासू शून्य अधिक शून्य वजा शून्य हाती शून्य बाकी शून्य जगतो शून्य आम्ही शून्य सारे शून्य मीही सुरेश नायर http://sites.google.com/site/surmalhar/
काव्यरस

एक फार्सी गज़ल.....मिर्झा महम्मद हसन ( कातिल )

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 14/07/2010 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, आज एका फ़ार्सी भाषेतली गज़लेचा आनंद लुटूया. मी खाली अर्थ दिलेला आहेच आणि सैगल साहेबांचे गाणे पण दिले आहे. वाचून झाल्यावर ही गज़ल पुढे ठेवून ते गाणे जरूर ऐका आणि त्याचा आनंद घ्या. सध्याच्या वादग्रस्त वातावरणात तेवढीच जरा करमणूक !

बुद्धीबळ नियमांचे भाषांतर - बुद्धीबळप्रेमींना एक आवाहन - प्रकल्प पूर्ण झाला.

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 14/07/2010 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
बद्दु ह्यांच्या बुद्धीबळाचे नियम (मराठीत) ह्या धाग्यावरुन एक कल्पना सुचली. मराठीत बुद्धीबळाचे नियम मला आंतरजालावर मिळाले नाहीत. एकट्याने भाषांतर करणे वेळखाऊ आहे. परंतु मिसळपावावरील बुद्धीबळप्रेमींनी त्यांचा थोडा थोडा वेळ देऊ केला तर हा भाषांतराचा उपक्रम आपण मिळून करु शकू.

बुद्धीबळाचे नियम (मराठीत) ...

लेखक बद्दु यांनी बुधवार, 14/07/2010 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
बुद्धीबळाचे नियम (मराठीत) ...आहे का कोणाकडे? क्रुपया लिन्क द्या..आम्च्या मन्डळाच्या बुद्धीबळ स्पर्धेसाठी हवे आहेत.. धन्यवाद.

मासे ८) बोईट

लेखक जागु यांनी बुधवार, 14/07/2010 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
बोईटाची खवले काढून त्याचे पोटाला चिर पाडून पोटातील घाण काढावी, शेपुट व पर काढावेत. मग जर बोईट मोठे असतील तर त्याचा शेपटाकडील भाग , डोके आणि मधला भाग असे तिन भाग करावेत. डोके व शेपटाचा भाग कालवणासाठी वापरावे व मधला भाग तळण्यासाठी वापरावा. जर छोटे असतील तर दोन तुकडे किंवा अख्खेच ठेवावेत.

स्वप्नी माझ्या आलीस तू

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 14/07/2010 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नी माझ्या आलीस तू
स्वप्नी माझ्या आलीस तू हळूच हसून लाजलीस तू कितीक दिसांनी झोप आली मला जागेपणी विसरलो जगाला न दिसे दुसरे काही दिसशी मजला तू रात्र माझी धुंदीत आली वेड्या मनाला समाजावून गेली स्वप्नाच्या वाटेने जातांना वाटेत भेटलीस तू होईल माझे स्वप्न का खरे भेटून सगळे सांग मला बरे विसरू नको आता काही प्रितीचे शब्द बोल तू - पाषाणभेद (दगडफोड्या) १४/०७/२०१०
काव्यरस