काही प्रश्न
वेळ :- सकाळचे १०वा.काही मिनिटे
स्थळ :- टिळक रोड वार्ड ऑफिस पुणे. खिडकी क्रं. ७ जन्म मृत्यू नोंदणी.
मी :- नमस्कार,मला जन्म नोंदणी करायची आहे,फॉर्म द्या.
कर्मचारी :- हा घ्या फॉर्म पण आज नोंदणी नाही होणार,आज आमचा कॉम्प्युटर बंद आहे.
मी :- कधी होईल चालू ???
कर्मचारी :- काही सांगता येत नाही.
मी :- अहो, एक तर तुमच ऑफिस २रा आणि ४था,शनिवार बंद,मी परवाच्या मंगळवारी आलो तर सकाळी १०:५० ला सुद्धा तुमच्या खिडकीत कोणीच नाही. आणि आज कॉम्प्युटर बंद आहे. मी धायरीतन इथ येतो १२ किमी यायला लागतंय मला फक्त एका कामासाठी आणि जर इथ आल्यावर तुमचा कॉम्प्युटर बंद असेल तर माझी फेरी वाया नाही काय गेली?