Skip to main content

"७ इयर्स इच"

लेखक शुचि यांनी मंगळवार, 27/07/2010 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
"७ इयर्स इच" दचकलात ना ऐकून? आहेच हा प्रकार भन्नाट. म्हटला तर गंभीर, म्हटला तर गमतीशीर. लग्नानंतर साधारण ७ वर्षांनी माणसाला अनावर हुक्की येते, अगदी खाज यावी तशी कंपल्सिव्ह. कशाची म्हणता? ह्म्म तर विवाहबाह्य प्रकरण करण्याची. थोडं अ‍ॅडव्हेन्चरस होण्याची. याला म्हणतात "७ इयर्स इच" :) या विषयावर मर्लीन मन्रोचा एक मस्त विनोदी चित्रपट्देखील निघाला आहे. तिच्याखेरीज कोण न्याय देऊ शकणार अशा इरसाल विषयाला? त्या चित्रपटाचं नावच मुळी "७ इयर्स इच". चांगला सुखासुखी संसार सोडून अशी "सो कॉल्ड" अवदसा का बरं आठवत असावी माणसाला? मला तरी वाटतं याचं उत्तर दड्लय मानसशास्त्रात. टू मच ऑफ एनीथिंग इज बॅड.

होम्सानंद

लेखक सन्जोप राव यांनी मंगळवार, 27/07/2010 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ष होते १९८४. पुण्यात पदव्युत्तर शिक्षण घ्यायची संधी आणि महानगराची भीती अशा दोन कुबड्यांवर लंगडत मी पुण्यात आलो. संपूर्ण गोंधळलेल्या अवस्थेत पहिले काही दिवस गेले. जन्माने पुणेकर नसलेल्यांबद्दलची पुणेकरांची तुच्छता समजून घेण्यात नंतरचे काही दिवस गेले. त्यानंतर वर्गातल्या सहकार्‍यांनी त्यांच्या गप्पांमधे सहभागी व्हायची परवानगी दिली. त्यांच्या गप्पांमध्ये 'अरे, आज स्कॅन्डल इन बोहेमिया वाचली...',' नेव्हल ट्रेटीला तोड नाही...', 'क्रीपिंग मॅन काहीतरीच आहे हं...', 'माझी आवडती म्हणशील तर यलो फेस...' असं काहीतरी त्यांचं बोलणं सुरु असे.

औषध उतारे आणि आशिर्वाद

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी मंगळवार, 27/07/2010 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रंथपरिचय- औषधं उतारे आणि आशिर्वाद

मंत्रतंत्र बाबा बुवांच्या गप्पा चाललेल्या असताना एका मित्राने एक पुस्तक वाचायला दिलं. काहीशा नाखुशीनेच मी ते पाहिल. औषधं, उतारे आणि आशिर्वाद.

काही प्रश्न

लेखक जिप्सी यांनी मंगळवार, 27/07/2010 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
काही प्रश्न वेळ :- सकाळचे १०वा.काही मिनिटे स्थळ :- टिळक रोड वार्ड ऑफिस पुणे. खिडकी क्रं. ७ जन्म मृत्यू नोंदणी. मी :- नमस्कार,मला जन्म नोंदणी करायची आहे,फॉर्म द्या. कर्मचारी :- हा घ्या फॉर्म पण आज नोंदणी नाही होणार,आज आमचा कॉम्प्युटर बंद आहे. मी :- कधी होईल चालू ??? कर्मचारी :- काही सांगता येत नाही. मी :- अहो, एक तर तुमच ऑफिस २रा आणि ४था,शनिवार बंद,मी परवाच्या मंगळवारी आलो तर सकाळी १०:५० ला सुद्धा तुमच्या खिडकीत कोणीच नाही. आणि आज कॉम्प्युटर बंद आहे. मी धायरीतन इथ येतो १२ किमी यायला लागतंय मला फक्त एका कामासाठी आणि जर इथ आल्यावर तुमचा कॉम्प्युटर बंद असेल तर माझी फेरी वाया नाही काय गेली?

सप्तपर्णी

लेखक लिखाळ यांनी मंगळवार, 27/07/2010 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
सप्तपर्णी
सप्तपर्णीच्या झाडाकडे पाहावे तो अचंबा वाटतो. बुंधा तर इतका मोठा, की दोन हात पसरून कवेत घ्यावे तरी शक्य नाही. जुन्या देवरायांमधले हे वृक्ष शाश्वततेची प्रतिके असल्यासारखी पाय रोवून उभी. प्राचीन देवराई, त्यात असा प्रचंड वृक्ष. सप्तपर्णीच्या बुंध्याशी बसून राहावे. अश्या भल्या वृक्षांखाली बोध होत असतो. उंच झाडांखाली वाढलेल्या गडद पानांच्या वनस्पती आणि बराचसा पाचोळा. पाचोळ्यावर एखादे पान पडावे आणि तळ्यावरल्या संथ पाण्यावर तरंग उमटावे तसे आपल्या मनावर उमटावेत. जमीन मात्र सर्वकाही धारण करते. स्तब्ध असते.

सी.आय.डी शेरोशायरी

लेखक सुनिल पाटकर यांनी मंगळवार, 27/07/2010 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
सोनी टि.व्ही वरची सी.आय.डी मालिका सध्या भलतीच फार्मात आहे त्यापेक्षा जास्त फार्मात आहे ती सी.आय.डी शेरोशायरी .हल्ली अनेकांच्या मोबाईलवर सी.आय.डी शेरोशायरीचे पकाऊ शेर येतात.या शेरोशायरीमूळे भरपूर टाईमपास तर होतोच.आपणही या धाग्यातून जरा सी.आय.डी शेरोशायरी करु या .ए.सी.पी.प्रद्युम्न ,दया ,अभिजीत,डाँ.साळूंके अशी पात्र मालिके प्रमाणेच मोबाईल एस.एम.एस.वर प्रसिद्ध झाली आहेत.एस.एम.एस.वर सी.आय.डी शेरोशायरी धुडगूस घालत आहे.संता आणि बंता प्रमाणेच एस.एम.एस.वर प्रद्युम्न ,दया ,अभिजीत पाँप्युलर होतायत. काही शेर . १) ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए ए.सी.पी.प्रद्युम्नने क

प्राजक्ता पटवर्धन यांचे अभिनंदन!

लेखक प्रसन्न केसकर यांनी मंगळवार, 27/07/2010 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
मध असला की मधमाध्या गुणगुणतात, सुवास आला की भुंगे घोंघावतात आणि गुण दिसले की गुणग्राहक जमतात! या उक्तीचा प्रत्यय नुकताच पुण्यात आला, ख्यातनाम कवियत्री आणि मिसळपाव, मी मराठी आदि संस्थळांच्या सदस्या प्राजक्ता पटवर्धन यांच्या अल्बमच्या प्रकाशनाच्या निमित्ताने. मुळातच प्राजक्ता पटवर्धन या प्रतिभावंत कवियित्री. मिसळपाव, मी मराठी आदि संस्थळावरच्या रसिक वाचकांची त्यांच्या कवितांना आधीच भरभरुन दाद मिळालेली आहे. विविध संस्थळांचे मालक, संपादक आणि समस्त जालकरी मंडळींचा समर्थ पाठिंबा देखील त्यांना सतत मिळत असतोच.

सभ्यतेची अभिरूची : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 27/07/2010 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
सभ्यतेची अभिरूची : नागपुरी तडका छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं ...... !! चॅनल पाहावं कोणतंय तं उघडेबंब नाचते टीव्ही पाह्यतांना पोरासंग, मायबाप लाजते सभ्यतेची अभिरूची लईच दिसते न्यारी अब्रू गेली ढोड्यात अन नोट झाली प्यारी आता उघडं काय, झाकलं काय, सारखंच झालं हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं ...... !! जलश्यातल्या पोरी कशा टगरबगर पाहे चार लोकामंधी मात्र झाकूनझुकून राहे जे काही करे ते अंधारात करे उजेडात मात्र इज्जतीले मरे आता उजेड काय, अंधार काय, सारखंच झालं हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं ......
काव्यरस