Skip to main content

ती......

लेखक सुभाष् अक्कावार यांनी शनिवार, 31/07/2010 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
मन आतुर झाले तेव्हा ती खूप दूर होती.... मग मी वायुवेगाने तिच्या दिशेने धावत गेलो.... ती तिथेच अजून निश्चल उभी असलेली पाहून माझे मन मोर झाले.... आता, पुढे होउन तिला कवेत घेणार तोच कळून चुकले की.. फाटत चालली आहे खाली धरती अन् तिच्या आसवांचा समुद्र रिता झाला आहे माझ्या या हातावरती...... - सुभाष अक्कावार, नाशिक.

स्वतः मळ्यात उतरायचे आहे

लेखक कळस.. यांनी शनिवार, 31/07/2010 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम... मंडळी........... लोकं गावाहून मुंबई ला जातात मी मुंबई हून गावाकडे आलोय मिसळगावात प्रवेश दिल्याबद्दल सरपंचांचे आभार .............. हे गाव फारच सुंदर आहे असे ऐकले आहे. मराठमोठे मोकळे वातावरण, पाठांचे मळे, पद्यांच्या सरिता, खाद्यांच्या बागायती, गप्पांचा पारा , वैश्विक वारा.. सारे पहिले आहे आज आजमवयाचे आहे. स्वतः मळ्यात उतरायचे आहे. बस मायबापांना विनंती आहे थोडीशी सुपीक जमीन देऊन गरिबावर उपकार करावेत आणि मध्ये मध्ये थोड्या शाब्दिक खताची खुराक पुरवावी. आता गावकरी म्हटल्यावर शेजार धर्म आलाच. बाकी माझ मी भागवीन.. आपला नवीन मिसळगावकर

गरमागरम धिरडे आणि चटणी

लेखक केशवसुमार यांनी शनिवार, 31/07/2010 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
प्रोजेक्ट गोलाइव्ह होऊन ४ आठवडे झाले.. प्रॉडक्शन सिस्टिम बर्‍यापैकी स्थिर झाली आहे. विशेष असे काही काम नाही त्यामुळे हा विकांत ही धमाल करता येणार, हे काल प्रॉडक्शन कॉल नंतर नक्की झाले.. दिवस अखेरच्या टीम मीटिंगमध्ये उद्या सकाळी ११ वाजता पॅराग्लायडींगला जायचे असा बेत पक्का केला.. मागच्या आठवड्यातल्या "पेद्रो दि गावा"च्या चढाईचे फोटो बघून ह्या वेळेस अजून ५-६ जण बेतात सामील झाले.. सगळा कार्यक्रम पार करून दुपारी जेवायला कधी मिळणार माहिती नाही.. त्यामुळे ब्रंच करण्यावाचून गत्यंतर नसणार हे कालच समजले होते..

श्री. ओक सर ह्यांस वाढदिवसानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा!

लेखक हैयो हैयैयो यांनी शनिवार, 31/07/2010 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
आपले मिपा मित्र श्री. शशिकांत ओक सर ह्यांचा आज वाढदिवस आहे.. ..श्री. ओक सर, वाढदिवसानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा! आंतरराष्ट्रीय नाडिग्रंथ अधिवेशनाबाबत आपले लेख येताहेत, अजूनही लेख वाचावयास आवडतील! धन्यवाद! हैयो! हैयैयो!

शिक्षणसंस्थांची पैसे कमविण्याची पद्धत

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 31/07/2010 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यातील स्थानिक दैनिक. त्यातील जाहिरात. एका खाजगी डी.एड. कॉलेजला शिक्षक पाहिजे म्हणून. जाहिरातीत त्याच्यांकडलाच छापील अर्ज करावा अशी सुचना. त्या जाहिरातीत अर्जाची किंमत कोठेही उल्लेखलेली नाही. माझा जवळचा मित्र एम.ए. बी.एड. झालेला. त्याने आज मला-शनिवारी सुटी-असल्याने मुलाखतीस बरोबर येण्याची विनंती केलेली. सकाळी १० वाजता नाशिकरोडला निघालो. कॉलेजच्या स्थळी ह्ह्ह्ह्ह्ही गर्दी. ५००-६०० जण/ जणी. मित्राला अर्जासाठी रांगेत उभे केले अन आस्मादीक रिकामपणाची कामगीरी करण्यासाठी मोकळी झाली. एका खिडकीत अर्ज देणे चालू होती. रांगेच्या तोंडाशी गेलो.

हनी बंचेस ऑफ ओट्स!

लेखक चतुरंग यांनी शनिवार, 31/07/2010 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
खाण्याच्या सीरिअल्सचे दोन रिकामे, जुने बॉक्सेस हे माझा अतिशय मौल्यवान ठेवा आहे हे सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. १९९९ साली जेव्हा मी भारतातून मिशिगन टेक्नॉलॉजिकल युनिवर्सिटीत अमेरिकेकडे यायला निघालो तेव्हा माझ्या खिशात पहिल्या सत्राच्या फीला पुरतील इतके $९३०० चे प्रवासी चेक्स होते. माझ्या शिक्षणाकरता आमच्या घरावर कर्ज काढायची तयारी माझ्या वडिलांनी चालवलीच होती परंतु माझ्या मनात मात्र माझ्या शिक्षणासाठी घरच्यांवर हा कर्जाचा डोंगर नको हे ठाम होते! पुढची चार वर्षे मी सफाई कामगाराचा मदतनीस ते प्रयोगशाळेतला असिस्टंट अशी सर्व प्रकारची कामे केली.

IT WIFE आणि स्वयंपाक

लेखक सुजय कुलकर्णी यांनी शनिवार, 31/07/2010 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न झाल्यानंतर साधारणपणे १०-१५ दिवसांनी "स्वयंपाक" हा मुद्दा किती महत्वाचा होता हे तरुणांना कळून चुकते. लग्न ठरवताना सुंदरता, शिक्षण, आणि नोकरी हे तीनच मुद्दे विचारात घेतल्याने हा अनर्थ तरुणांवर ओढवतो. मुलीही "लग्नानंतर स्वयंपाकाच बघू..." असाच विचार करत असाव्यात किंबहुना करतात. खरंतर लग्न झालेल्या ह्या मुलींना बाई किंवा काकू म्हणायला हरकत नाही. पण "बाई" म्हटल्यावर ह्या मुलींना प्रचंड राग येतो. विशेषत: सॉफ्टवेअर मधल्या मुलीला.

काला कोट चोर....

लेखक नेत्रेश यांनी शनिवार, 31/07/2010 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
स्वाती ताईंच्या लोकलच्या गोष्टी वाचुन काही वर्षांपुर्वीची गोष्ट आठवली.. उन्हाळयाचे दिवस होते. मी आणी माझा एक मित्र स्लो ट्रेन ने ठाण्याहुन दादरला जात होतो. दुपारची वेळ होती. डब्यात बर्यापैकी गर्दी होती. बसायला जागा नसल्यामुळे दरवाज्या जवळ वारा खात उभे होतो. बाहेरच्याबाजुला तीन चार शाळकरी मुले लटकत होती. १०वीत शीकत असावीत. मस्त हींदीत गप्पा चालल्या होत्या. गाडी सुटली की स्टेशनवर कुणाला तरी जोरात कॉमेंट मारणे चालु होते. मुलुंडला गाडीत टी.सी. चढ्ले, कुर्ल्यापर्यंत एक दोन बकरे सापडले. या मुलांच्या गप्पा आता हे टी.सी. कसे चोर असतात, कसे पैसे लाटतात यावर चालु होत्या. टी.सी. कुर्ल्याला उतरले.

रत्ना

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 31/07/2010 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
परवा अचानक रस्त्यात ''ती'' दिसली. पाय ओढत, रेंगाळत चालणारी. कधी काळी भरगच्च दाट असलेल्या लांबसडक केसांमध्ये आता बर्‍याच रुपेरी छटा डोकावू लागलेल्या. चेहर्‍यावर एक म्लान उदासी. अंगावरची साडी तरी जरा बरी दिसत होती. मला समोर पाहून ती एकदम चमकलीच! काही क्षणांपूर्वी म्लान असलेल्या तिच्या चेहर्‍यावर ओळखीचे हसू फुलले. आत ओढलेले गाल रुंदावले आणि तिच्या खास शैलीत ती उद्गारली, ''ताई, आज इथं कुठं? कित्ती दिवसांनी भेटताय! '' मलाही तिला इतक्या वर्षांनी बघून खूप आनंद झाला होता. तिचा हात धरून मी म्हटलं, ''चल, भेटलीच आहेस तर तुला माझं नवं घर दाखवते! तुला परत आणून सोडते रिक्षाने हवं तर! '' ''नको नको, ताई!