Skip to main content

निस्सिम प्रेम

लेखक चिंगुसविकॄतजोशी यांनी बुधवार, 04/08/2010 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
'ती' इतकी सुंदर की, अप्सराही तिच्याकडुन beauty tips घेते. 'तिला' पाहून नदी ही स्वतःभोवती गिरकी घेते. 'तिच्या ' गालावरची खळी पाहून फुलपाखरेही हळूच लाजतात. 'तिचा' स्पर्श झाल्यावर गुलाब अधिकचं लाल होतात. 'ती' इतकी कोमल की, मोरपीसं 'तिला' काट्यासारखे रुततात. 'तिचे नयनरुपी तारे बघितल्यावर आकाशातले झगमगाटही फिके पडतात. 'तिच्या' चेहर्‍यावरची बट पाहतांना वाराही वाहता-वाहता स्तब्ध होऊन जातो. 'तिचे' प्रतिबिंब बघितल्यावर चंद्रही हलकेचं '
काव्यरस

"कांदा बटाटा 'बॅचलर' रस्सा"

लेखक निखिल देशपांडे यांनी बुधवार, 04/08/2010 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, काय दचकलात ना??? आधी तर निखिल देशपांडे हे नाव बोर्डावर बघुन आणि तेही पाककृती या विभागात. पण होते असे कधी तरी चुकुन एखाद्या गोष्टीचा इतका वैताग येतो की आजवर न मनावर घेतलेल्या गोष्टिंकडेही तुमचे सहज लक्ष जातेच. गेले दोन तीन दिवस मिपा वर जो काही धुडगुस चालु आहे त्याचावर आधी भरपुर हसुन घेतले मग थोडा कंटाळा आला आणि शेवटी तर वैताग आला. पण या सगळ्या व्यापातुन आम्हाला एक गोष्ट नक्कीच जाणवली "स्वयंपाकेविण बिंपाक अवघड आहे". कोण रे तो??? नक्की पराच असेल, म्हणतोय कसा बाई ठेवायची स्वयंपाक,बिंपाकाला. आहो प्रत्येकाला जमते का असे???

वर्गणी

लेखक कळस.. यांनी बुधवार, 04/08/2010 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
वर्गणी घरी आलो तोच शेजारच्या घरात गोंगाट. वर्गणी मागणारी सोसायटी मधील पोर बडबड करीत होती. कमीत कमी ५०१ रुपये नाही तर वर्गणी नको. १०१ वर तडजोड करण्यास तयार नव्हती. आमच्या शेजारी गुप्ते काकी राहतात. २ वर्षांपूर्वीच गुप्ते काका वारले. ते lic मध्ये कामाला होते. त्यांचा नंतर काकी कामाला जाऊ लागल्या त्यांचा पाठी एक मुलगी आणि लहान मुलगा आहे. सध्या घर काकिंवरच आहे. मोठी मुलगी science दुसरे वर्ष चालू आहे. मुलगा १० वी त आहे. काकुंने त्यांना १०१ देऊ केले ते घेण्यास तयार नव्हते. शेवटी रागाने ती पोर तशीच निघून गेली.

पुस्तक परिक्षण: "द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी" आणि त्या पुस्तकाच्या पुढच्या मालिका..

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 04/08/2010 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच "द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी" चे मराठी भाषांतर विकत घेतले आणि आताच वाचून संपवले. (संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली) हे एक अप्रतिम पुस्तक आहे. त्याचे लेखक आहेत रॉबिन शर्मा. दक्षिण अमेरिकेतील "शर्मा लिडरशीप इंटरनॅशनल " चे चालक, मालक, संस्थापक. त्यांची व्याख्याने जगभर होतात-व्यक्तीमत्त्व विकास आणि लिडरशीपचे बद्दलचे धडे याबद्दल. आणखी माहिती रॉबिनशर्मा डॉट कॉम वर वर मिळेलच. या लेखाचा मूळ उद्देश्य म्हणजे या पुस्तकाबद्दल मला आलेले अनुभव- बाजारात व्यक्तीमत्त्व विकास आणि लिडरशीपचे बद्दलचे तसे अनेक पुस्तके येतच असतात.

अन्न पदार्थां मधील भेसळ

लेखक तर्री यांनी बुधवार, 04/08/2010 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
काल बायकोने ठाण्याहून खर्वस मागवला होता... रात्री टी.वी . पहाता पहाता तो आम्ही चापला. "कसा मस्त आहे की नाही ?" हो ....छान आहे.दुधात जिलेटिन घालून केलेला "चिक" व त्यापासून बनवलेला खरवस मी पहिल्या चम्च्यात ओळ्खला होता . पण बयाको समोर हो ....छान आहे आसे म्हणावे लागले. आमच्या गोठ्यात ( एके काळी ) वर्षाला ४ /५ म्हशी वीत असत. आणि मग खरवस , नासकोणी , खरवसाची बर्फी असे विविध प्रकार आई / आजी करत असत. हे खरवस बनवणारे रोज २०० /२५०किलो खरवस बनवतात. तो दादर पर्यन्त अनेक "हाटेलात" पुरवतात. आता विचार करा , २०० कि. खरवस बनवायला किमान १०० कि.

मौनाची ढाल

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी बुधवार, 04/08/2010 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
मौनाची भाषांतरे करण्यात कितीही मतमतांतरे उद्भवत असली तरी मौनाची ढाल वापरणे कधीही हितकर ठरत असते. काही व्यक्तिंना वारंवार शाब्दिक वार करण्याची मोकाट सवय जडते. तिच्या सान्निध्यात येणारी व्यक्ती ती ते वार झेलून खचून जाते, पिचून जाते. एकतर्फी होणाऱ्‍या या युद्धात हार निश्चितच वार झेलणाराची, हे ठरलेले. परंतु जर मौनाची ढाल पुढे करून वार कर्णपटलावर झेलत राहिल्यास फैरीवर फैरी झाडणारी व्यक्ती जरा संभ्रमित होऊन गप्प होते. तिला वाटते आपण फारच असंबद्ध ओरडत आहोत की काय? समोरून प्रतिसाद मिळाला तरच कोणत्याही कृतीला हुरूप येतो.

कॉर्पोरेट / कॉलेज पार्ट्या, ग्रामस्थ आणि तारतम्य : ऊत्तरायण -भाग १

लेखक सुहास.. यांनी बुधवार, 04/08/2010 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
व्हाट ईज ए फेंडशिप डे !!! सर्वात महत्वाचे : मला एक सांगा " व्हाट ईज ए फेंडशिप डे ? मुला-मुलांमधली ,मुली-मुलीमधील मैत्री आणी मुला-मुली मधील मैत्री यातला नेमका फरक काय आहे ? बर मग आपण हा विचार करुयात की हा मैत्रीचा दिवस साजरा करण्याची डी-जे,कॉकटेल डिनर, ओपन नेकचा आणी अजुन सेक्सी दिसण्याकरता बॅकलेस,मायक्रो-स्क्रर्टचा ड्रेस-कोड,एखाद गावाबाहेरचं फार्म हाऊस,सिम्बी सारख्या वसती गृहात,ऊद्याचे मॅनेजर्स बनुन,भक्कम पगाराच्या दिशेने वाटचाल करण्यार्‍या मुला-मुलींना कशाला लागतो ब्वा ?

सासऱ्याच्या घरावर सुनेचा अधिकार नाही

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 04/08/2010 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
सासऱ्याच्या घरावर सुनेचा अधिकार नाही सकाळ वृत्तसेवा http://www.esakal.com/esakal/20100804/5516904965574932147.htm मुंबई - नवऱ्याशी भांडण झाले, तरी सासऱ्याच्या घरात वेगळे बिऱ्हाड करून राहण्याची सुनेला परवानगी देणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

कात्रज ते सिंहगड.

लेखक sandeepn यांनी बुधवार, 04/08/2010 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
जुलै महिन्याच्या सुरवातीला कात्रज ते सिंहगड असा ट्रेक करण्याचा योग आला होता. शनिवारचा दिवस होता. सकाळी ७ लाच जुन्या कात्रज बोगद्याच्या वरुन चढायला सुरवात केली. सकाळी सकाळी स्वारगेटवरून टमटम पकडुन आम्ही ८ लोक इथे पोहचलो होतो. आधिच ट्रेक खुप अवघड आहे असे सांगण्यात आले होते , पण उस्ताहाच्या भरात त्याचा सिरिअसनेस आम्हाला कळला नव्हता. पण पहिलाच डोंगर चढतानाच पुढच्या ट्रेक ची कल्पना आली.