Skip to main content

सासऱ्याच्या घरावर सुनेचा अधिकार नाही

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 04/08/2010 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
सासऱ्याच्या घरावर सुनेचा अधिकार नाही सकाळ वृत्तसेवा http://www.esakal.com/esakal/20100804/5516904965574932147.htm मुंबई - नवऱ्याशी भांडण झाले, तरी सासऱ्याच्या घरात वेगळे बिऱ्हाड करून राहण्याची सुनेला परवानगी देणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सासऱ्याच्या मालकीच्या मालमत्तेवर सुनेचा अधिकार नाही, असे स्पष्ट करणाऱ्या या निर्णयामुळे सासरी भांडणे करणाऱ्या सुनांना सावधानतेचा इशारा मिळाला आहे. बोरिवलीत राहणाऱ्या प्रीती वालिया (नाव बदलले आहे) आणि त्यांच्या पतीने सुनेच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील याचिका केली आहे. वालिया यांच्या सुनेचे, वैजयंतीचे (नाव बदलले आहे) आणि तिच्या पतीचे दीड वर्षापूर्वी भांडण झाले. या भांडणामुळे नाराज झालेल्या वैजयंतीने सासरचे घर सोडून माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. माहेरी जाताना तिने स्वतःचे दागिने व अन्य मालकीच्या वस्तूही सोबत नेल्या. याचबरोबर तिने पती व सासरच्या मंडळींच्या विरोधात महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली. कौटुंबिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली केलेल्या या तक्रारीवर सासू-सासरे व पतीने प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. सुनावणीदरम्यान दंडाधिकारी न्यायालयाने सुनेला सासरच्या घरातील एका बेडरूममध्ये राहण्याची परवानगी देण्याचा आदेश दिला. सासू-सासरे या खोलीचा वापर विशिष्ट कारणांसाठीच करू शकतात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. या निर्णयाविरोधात सासू-सासऱ्यांनी सत्र न्यायालयात अपिलामध्ये दावा दाखल केला. सून तिचे सगळे दागिने व वस्तू यापूर्वीच घेऊन गेली असल्यामुळे तिला आमच्या घरात राहण्याची परवानगी नाही, असे सासरच्या मंडळींचे म्हणणे होते; परंतु सत्र न्यायालयानेही दंडाधिकारी न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून केवळ अपिलातील दावा सुनावणीसाठी मंजूर केला. यामुळे पुन्हा एकदा सासू व सासरे यांनी उच्च न्यायालयात अपील याचिका केली. उच्च न्यायालयाचे न्या. विद्यासागर कानडे यांच्यापुढे याचिकेवर सुनावणी झाली. संबंधित जागा सासऱ्यांच्या नावावर असून, मुलाचा म्हणजेच सुनेच्या पतीचा या जागेवर अधिकार नाही. त्यामुळे सासऱ्यांची परवानगी नसताना त्या खोलीमध्ये सून राहू शकत नाही, असा युक्तिवाद याचिकादार सासऱ्यांच्या वतीने करण्यात आला. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य मानला आणि कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली. ज्या घरात सून राहते ते भागीदारीत नसून सासऱ्यांच्या नावावर आहे. त्यामुळे सकृतदर्शनी सुनेला तिथे राहण्याचा अधिकार नाही, असे न्यायालय म्हणते. सत्र न्यायालयाने दावा सुनावणीसाठी दाखल करताना कोणताही अंतरिम आदेश का दिला नाही, याचे स्पष्टीकरण दिले नाही. यासंबंधित तरतुदींचाही गैरप्रकारे अर्थ काढला; तसेच सासऱ्याच्या मालमत्तेवर सुनेला दिलासा देणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांमध्ये झाल्याचे आढळत नाही, असे निरीक्षण न्या. कानडे यांनी नोंदविले आहे.

वाचने 8854
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

गरिब नवर्‍यांचे तारणहार आणि भांडखोर सुनांचे कर्दनकाळ युयुत्सु पुन्हा फॉर्म मधे....

आजकाल समस्त बायकाच्या कुंडलीत शनीचा फेरा आलेला दिसतोय. तिकडे न्यायमुर्ती अंबादास जोशी एकदम स्फोटक निर्णय देतात त्याच्या तुलनेने ह्या निर्णयात काही दम नाही असे खेदाने म्हणावे लागेल.

KON KONACHE KON AANI GHODYA CHE TOND EK DUM SAHI FAISLA HAI BHAI :)

हल्ली मुलींना मुलान्रमाणे समान हक्क आल्यामुळे त्या दोन्ही कडून ओरबाडू शकत होत्या ! सासरकडून आणि माहेरकडून सुद्धा.ह्याला कुठेतरी छडा बसेल असे वाटते. मुलींनी फक्त तेच हक्काने घ्यावे जे त्यांच्या नवर्याच्या स्वकमाईचे आहे ...उगाच सासर्याच्या Property वर डोळा कशाला हवा काही नाही तर या निर्णयामुळे त्या सासू सासर्यांचा आदर तरी करतील आणि करायला शिकतील !

मस्त बातमी. युयुत्सुं सारख्या पुरुषांच्या कैवार्‍यांचे अभिनंदन. हे तुमच्याच प्रयत्नांचे यश आहे.

पण मग आता त्या बाईने कुठे जायचे? भांडणाचे कारण काय? आणि खरच जर सासरची मंडळी तिचा छळ करत असतील,तर तिच्यावर विश्वास का नाही ठेवला जात? दागिने वगैरे घेउन गेली मग रहायला मागते हे चुकीचे वाटते,पण घर सास-याच्या नावावर असल्याने बाईला त्यात अधिकार मिळणार नाही,हेही योग्यच आहे. पण................... जर सासरची मंडळी तिचा पैश्यासाठी छळ करत असेल व मुद्दाम तिला बाहेर काढले असेल आणि आता त्या दुर्दैवी बाईला कुठेच थारा नसेल्,तरीही तुम्हाला हा निर्णय योग्य वाटेल का? हो,असे आपले उत्तर असेल तर वाजवा फटाके!

या निर्णयामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल. ज्येष्ठ नागरीकांच्या काही संघटना ही मागणी अनेक दिवस करत होत्याच. इतर अनेक मागण्या अजुनही प्रलंबित आहेत. रेपची झाली तशी डोमेस्टिक व्हायोलंसची व्याख्या नव्याने करावी का हा देखील प्रश्न आहेच.

केवळ राहण्याच्या हक्कापुरता मर्यादीत आहे असे मला वाटते. घटस्फोटाच्या खटल्याचे काय ? तो मंजूर झाला आहे का ? जर ही मुलगी मिळवती नसेल तर खटल्याला वेगळे वळण लागू शकते. अशा एका दाव्यात मी सासरच्या मंडळींकडून पुढील काही वर्षांची भाड्याची रक्कम वसूल केली आहे. हे घटस्फोटाचे खटले फार गुंतागुंतीचे असतात . त्यात न्यायाधीशाच्या मनाचा कलही महत्वाचा असतो असे मला काही अनुभवानंतर समजले आहे.

In reply to by रामदास

रामदास यांच्याशी सहमत आहे. पण आता एकत्र राहणार्‍या स्त्रियांसाठी हे नवे झेंगट झाले. मॅट्रिमोनिअल घरात राहण्याचा अधिकार या कारणाने हिरावला गेला तर ते अयोग्य होईल. सध्या या अधिकाराचा वापरकरून बाहेर काढल्या गेलेल्या स्त्रीला घरात पुन्हा प्रवेश मिळवून देता येतो. पण ते घर नवर्‍याचे नसून सासर्‍याचे आहे म्हणून जर हा हक्क गेला तर ते चुकीचे आहे असे वाटते. प्रस्तुत दाव्यात सासर्‍याच्या घरात वेगळे बिर्‍हाड करण्याचा हक्क नाही हा निर्णय योग्य वाटतो.

In reply to by नितिन थत्ते

प्रस्तुत दाव्यात सासर्‍याच्या घरात वेगळे बिर्‍हाड करण्याचा हक्क नाही हा निर्णय योग्य वाटतो. हे बरोबर. मालकी हक्कही नाही हे ही योग्य. पण रहाण्याचा हक्क नाही हे विचित्र आहे. नको असलेल्या सुनेला घरातून बाहेर काढणे फारच सोपे आहे की यामधे.

तुम्ही नावडत्या व्यक्तीस आपल्या फ्रेंडलिस्टमधेही ठेवण्यास तयार नसता आणि त्याने तिला घरात का ठेवून घ्यावे ? वा रे वा (सून आहे वगैरे कारणे लागू होत नाहीत. भांडणे होउन पटत नसल्याने / किंवा त्याच्या मुलाने सासर्‍याच्या मनाविरुद्ध लग्न केले असल्यास सासरा - सून नात्याला सासर्‍याच्या लेखी काहीच अर्थ नाही)

आयटीतील सून सासर्‍याला स्वतःच्या घरी ठेवून घ्यायला तयार होईल का ? नाही ना ? मग तसेच. ह्म्म्म, पण समजा सासर्‍याला स्वयंपाक करता येत असेल तर ? शक्य आहे.

In reply to by मिसळभोक्ता

मी आपल्याशी सहमत आहे.अशा सुना सासु- सासरे या॑ना घरतिल अडगळ म्हणुन आश्रमात पाठ्वतात मग वाटा घाटीची वेळ आलि कि त्या॑ना तेवढ्यापुरता प्रेमाचा पाझर फुटतो. पण गेलि अनेक वर्ष ते याच घराचे मालक होते कि॑वा याच घरात त्या॑नि पण स॑सार केला होता हे त्या विसरतात. सासर्‍याच्या घरावर सुनेचा ह्क्क असुच शकत नाई.

पण नातवंडांचे काय? त्यांचा आजोबांच्या इस्टेटीवर हक्क असू शकतो!

म्हंटल कुठे गेले तुम्ही? काहीच प्रतिसाद नव्हते म्हणून हो...असो. माझं असं म्हणणं आहे कि नवऱ्याच्या मालमत्तेवर हक्क सांगावा पण सासऱ्याच्या मालमत्तेवर नाही....कारण काय? नवर्याचं घर ते आपलं घर म्हणून त्याच्यावर आपलापण हक्क.. सासर्याचा बंगला असू, झोपडी असू कि राजमहाल...काय करायचाय? पण सुनेला जायला कुठेच जागा नसेल तर घरातली एखादी खोली द्यायला काय हरकत आहे...नवा घरोबा करायचा असेल तर त्याच घरोब्यात राहावे....कसे? बाकी तुमचे पुरुषमुक्तीवाले काय म्हणतायेत या बाबतीत? काही मोर्चा वगैरे? सहजच विचारलं.

मध्यंतरी एका नामवंत मराठी अभिनेत्रीने आपल्या सासर्‍यांना घराबाहेर हकलले होते (बहुतेक) त्याची आठवण आली !!! या अभिनेत्रीने तिच्या सासर्‍यांचा छळ केला म्हणे... अधिक वाचायचे आहे ? ;) मग इथे टिचकी मारा :--- http://marathi.webdunia.com/newsworld/news/regional/1001/14/1100114033_…