Skip to main content

काश्मिर आणि लेह

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 10/08/2010 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
लेहच्या नैसर्गिक उत्पाताची माहीती एवाना सगळ्यांना झाली असेलच. हा उत्पात अतिशय भयंकर होता व अजूनही म्हणावी तशी मदत पोचलेली नाही. तरीही सगळा भारत लेह-लडाख मधील दु:खितांच्या जखमांवर आपापल्यापरीने फुंकर घालु पाहत आहे. महाराष्ट्रासकट अनेक राज्यांना मदत देऊ केली आहे. शिवाय जम्मूकाश्मिर राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय प्रशासनातील काही लोक, खासदार जातीने पाहणी करून गेले आहेत. लेखमधील परिस्थिती आटोक्यात येवो व दु:खितांना हा आघात सोसण्याचे बळ मिळो हीच सदिच्छा माझी व अख्ख्या भारताची आहे. यानिमित्ताने भारताच्या अजून एका अविभाज्य भागाची आठवण झाली - काश्मिर.

चंद्रकोरीपरी कोवळें हासणें.... वसंत बापट

लेखक शरद यांनी मंगळवार, 10/08/2010 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्रकोरीपरी कोवळें हासणें कोणत्या कवीने आपल्या प्रेयसीचे वर्णन काव्यात केले नाही ? सर्व काव्यालंकारांचा उपयोग खरे तर त्यासाठीच. ( सुवर्णालंकार परवडत नाहीत म्हणून म्हणून तर कवींनी उपमा-उत्प्रेक्षा यांना काव्यालंकार असे गौरवावयास सुरवात केली नाही ना ? प्रियेला अर्पण करावयास खिशाला चाट नाही) तरीही प्रत्येक कवी वर्णनात आपली खासियत दाखवावयाचा प्रयत्न करतोच.

आईचं छप्पर.

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 10/08/2010 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
आईचं छप्पर. कडाक्यात भांडतात मेघ गडगड करून भरून येते नभाला अश्रू ढाळते वरूण ...! अश्रू बनती गारा वादळ तांडव करी गारठल्या हवेसवे विजेस हिंव भरी ...! हिंव भरल्या विजेस ताप चढवी गारा तिला पांघराया छप्पर नेतो वारा ...! छप्पर उडल्या संसारात ब्रम्हपुत्रा वाहते तेल मिरची शिदकुट पाण्यावरती पोहते ....! पोहतांना पुस्तक वही सरस्वती भिजते माती करून जीवाची चूल उल्हे निजते ....! गरजत्या पावसात चोळी झबले न्हाती पदराखाली लेकरं कवटाळती छाती ....! ...गंगाधर मुटे.. . ( शिदकूट = मोजक्या काळासाठी पुरेल एवढी अन्नसामग्री) ( उल्हा = एकप्रकारची कच्च्या मातीची चुलच पण लाकडा ऐवजी कोळशाचा जाळ घालत
काव्यरस

नकोना नकोना आता नकोना

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 10/08/2010 06:48 या दिवशी प्रकाशित केले.
नकोन नकोना आता नकोना तो: ऐ ये ना ती: अंहं नकोना, नकोना तो: नकोना नकोना आता नकोना ||धृ|| ती: अवेळी या वेळी तू सतावी मला इथे नाही कुणी आवर स्व:ताला तो: नको करू बहाणे का छळशी मला छळण्याचा खेळ बरा जमतो तूला तू जवळ ये अथवा मला जवळ घे ना ||१|| ती: अंहं नकोना
काव्यरस

(कोलंबसाचे गर्वगीत)

लेखक अडगळ यांनी मंगळवार, 10/08/2010 00:50 या दिवशी प्रकाशित केले.
हजार कात्र्या आम्हा परजु दे, कर्तनयोगे त्या, आम्हाला कुरतडू दे सारे, विवस्त्र कवटी आज होवू दे, टक्कल पार्‍याचे, गळू दे व्यर्थ भार सारे. तैलसुरा प्राशुन माजले , तण डोईवरचे , जणु की कवड्यांच्या कविता, आणि ग्रासिले मुख दाढीने , ओठ मिश्याखाली , लोपला नभाआड सविता. क्षौरवीरा तव सुसाट कर्तन असेच चालू दे, खुलो नक्षी डोक्यावरती, मान गळ्यातून निघो कालवे भगव्या पाण्याचे, नापिता, कळ आली भलती. ही कानाची पाळी ठेवा , नीट खिश्यामध्ये शिवुन घ्या जा नाक्यावरती, नापित आम्ही शस्त्र फिरवतो प्राणकराराने, जराशी माफ करा गलती. चला झाडू द्या शुभ्र कापडे, केसांनी मळली , आण बे, चुना नि गायपुडी. वीस टाळकी बारा दाढ्या
काव्यरस

पाऊस वेडा

लेखक स्वाती फडणीस यांनी मंगळवार, 10/08/2010 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस वेडा ================= पाऊस वेडा मोर मनाचा मेघ पाहता हर्षुन जातो.. मेघ बावरा जीव मोराचा ग्रीष्म लागता आतुर होतो.. थेंब आठव ठेवा मनाचा अनुरागी हरपून जातो.. मेघ बावरा मोर जिवाचा नाच नाचरा सागर होतो.. पाऊस वेडा मोर मनाचा थेंब सरीत शहारून जातो.. प्रीत बावरा पिसारा मोराचा भिजून चिक चिक होतो.. आनंद फुलोरा मनोरथांचा वादळ झडीत थिजून जातो.. सर आतुर हर्षित जिवाचा गहिवर डोळी बोलका होतो.. चिखल भिजल्या स्वप्नांचा पिसा पिसातून गळून जातो.. वेडा पाऊस मोरा मनीचा ढग फुटीत भोवरा होतो.. नाच नाचऱ्या फुलेर मनाचा हुंकार कंठीच राहतो.. उजाड भुंडक्या मनमोराचा हुंदका पाऊस होतो.. पाऊस वेडा मोर मनाचा काळ सरीं
काव्यरस

चॉकलेट मूस....very easy and extremely sinful!

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी मंगळवार, 10/08/2010 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : १) कुकिंग चॉकलेट - १५० ग्रॅम्स २) साखर - पाउण कप ३) अंडी - ४ योक आणि व्हाईट वेगळे करून (ते कसे करायचे ते फोटोसहीत दिले आहे) ४) बटर - १ टेबल स्पून ५) व्हॅनीला इसेन्स : १ टेबल स्पून ६) कॉफी : १ T स्पून ७) whipped cream spray for decoration/ नाही मिळाले तर फ्रेश क्रीम पण चालेल. अंडे फोडुन असे सेपरेट करा. एका मोठ्या पण मध्ये पाणी उकळत ठेवा.

तो पाऊस

लेखक सुनिल पाटकर यांनी सोमवार, 09/08/2010 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या अंगणातला पाऊस माझ्या अंगणातला पाऊस शेतात मरमर राबणा-या ढवळ्या-पवळ्याचा पाऊस टोपलीतून भाकरी आणणा-या अनवाणी पावलांचा पाऊस एका छत्रीत भिजलेल्या अनेक प्रेमकथांचा पाऊस रानफूलांच्या वाटेवर हरवून गेलेला पाऊस वाफाळलेल्या चहाच्या कपात चिंब भिजलेला पाऊस डोक्यावरून घेतलेल्या रजईत दडून बसलेला पाऊस पाण्यात भिरभिरणा-या कागदी होड्यांचा पाऊस गरागरा फिरणा-या इवल्याशा छत्रीतला पाऊस पावसात मनसोक्त भिजणारी चिमुकली मुलं पाहिली की आठवतो मला तो पाऊस आभाळा एवढा डोंगर कवेत घेऊन आलेला पाऊस डोंगराखाली गाडलेले ते, इवलेसे जीव आठवले की माझ्याही डोळ्यातून बरसतो न थांबणारा तो पाऊस
काव्यरस

स्वैर कल्पना: "वीजपाऊस"

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 09/08/2010 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
चंदामामा वीज विकत घेतो... सूर्यदादा कडून! चांदण्याताईंना वीज मोफत वाटतो ... ओंजळ भरून! महिनाभर निघते आकाश, प्रकाशाने उजळून! महीना संपल्यावर सूर्याकडून येते, विजबीलही भरभरून! बील भरले नाही तर सूर्यदादा बघतो... रागाने थरथरून! चंद्राची वीज कापतो अमावस्येला... चंद्राकडे पाठवून! ढगआजोबा करीती थयथयाट... चंद्राला विझलेला पाहून! उडल्या वीजरूपी ठीणग्या अन संतापाच्या जलधारा ... त्यात पृथ्वीताई निघाली न्हाऊन!