Skip to main content

जगन्याचि कला

लेखक अशक्त यांनी गुरुवार, 12/08/2010 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या आपल्या इथे पुष्कळ बाबा आहेत पण त्यात उठुन दिसतात ते रवि शंकर. त्यांचा भक्तवर्ग बहुतांश युवक-युवति आहेत हे विशेष. ज्या पद्धतिने आर्ट ओफ लिविंग चे कार्य चालते ते पाहुन हा एक जस्ट अनादर कल्ट चा प्रकार आहे असे वाटते. कल्ट कसा सुरु करावा हे इथे पहा, http://www.youtube.com/watch?v=mnNSe5XYp6E. त्यांनी समाजसेवाहि बरिच केलि आणि करत आहे अस ऐकुन आहे. बरयाच जनांच जीवन हि बदलुन टाकलय असे दावा करनारे हि आहेत. परंतु जेव्हा माझे हुशार मित्र काम-धंदा सोडुन बाबाच्या मागे फिरताना (सत्सन्ग करताना) दिसतात तेव्हा कीव वाटते.

वरंधा घाट

लेखक येडाखुळा यांनी गुरुवार, 12/08/2010 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, वरंधा घाट माझा अतिशय आवडता...मागच्या वर्षी पावसाळ्यात शिवथर घळीत समर्थांच्या दर्शनाला गेलो होतो. भोर सोडल्यानंतर जो काही पाऊस सुरू झाला तो पुण्यात घरी परत येईतो चालू होता. पावसाळ्यात वरंधा घाटाचे सौंदर्य काय सांगावं?

"नॅनो" नंतरची भारताची देणगी - $35 (अंदाजे रू. १५०० रू.) चा काँप्यूटर

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 11/08/2010 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातील चार आय. आय. टी. ज् (कानपूर, मुंबई, खरगपूर आणि मद्रास) आणि बंगलोरची इंडियन ईंस्टिट्यूट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ही लक्षणीय निर्मिती केली आहे. हा जगातील सद्या तरी सर्वात स्वस्त टॅब्लेट संगणक असावा, यात touch screen, wi-fi, full video capability, e-book reader आणि 2 GB मेमरी या सोयी आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री कपिल सिबल यांनी NDTV च्या Gadget Guru या कार्यक्रमात या पुढील वर्षी येऊ घातलेल्या 'सरकारी' निर्मितीची माहिती दिली.

घड्याळ

लेखक कमलेश पाटील यांनी बुधवार, 11/08/2010 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
तो आज जरा तिच्याशी भांडला, तू सांगत नाहीस तुझ्या मनातलं मला म्हणाला, तिला थोडं आश्चर्यच वाटलं; बऱ्याच दिवसांनी याला तिच्याशी बोलावंस वाटलं. तरीही तिचं चिडणं, त्याच्या डोळ्यात डोकावणं, असतो का तुला माझ्यासाठी वेळ, हा त्याला अनुत्तरित करणारा प्रश्न विचारणं. तो तरी किती बहाद्दर, म्हणाला थांब जरा क्षणभर, घेऊन आला एक गजराचं घड्याळ, म्हणाला चोवीस तासांचा गजर लावलाय त्यावर. असं घड्याळ लावून बोलायचं, कल्पनेनेच तिला हसू आलं, त्याचं नातं या वळणावर आलं, म्हणून टचकन् डोळ्यात पाणीही भरलं. तो अजूनही स्वप्नांतच दंग, घड्याळाचा सेकंद काटा मोजत, बोल ना गं भरभर वेळ संपेल, असं म्हणत तासांचं गणि
काव्यरस

तुझा पाऊस

लेखक कमलेश पाटील यांनी बुधवार, 11/08/2010 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
वर्षभर तहानलेल्या चातकाला, इवल्याश्या थेंबाने तृप्ती देताना., मिळेल मलाही त्याच्या प्रेमाची उब, ही ग्वाही देणारा पाऊस. त्याच्यामाझ्यात तलम रेशमी, निमिषाचा अंतरपाट धरताना, क्षणभर दुरावा देऊन मिलनासाठी, इंद्रधनुष्य उभारणारा पाऊस. त्याच्या केसातून ओघळताना, माझ्या तळहातावर मोती बनुन येणारा, त्याच्या ओठांवरुन मी अलगद, माझ्या ओठांनी टीपलेला पाऊस. मनाच्या कुपितली आठवणींची , अत्तर चौफेर शिंपडणारा , मला चिंब करत माझ्या, तनामनावर बरसणारा पाऊस. हव्याशा ओल्या स्पर्षाने, नखशिखांत मला लपेटणारा , अन् त्याच्या माझ्या स्वप्नांचा वेडा, झुला झुलवणारा पाऊस. त्याच्या अन् माझ्या एकांतात, हविहवीशी लुड्बूड करणार
काव्यरस

मैत्रीण

लेखक कमलेश पाटील यांनी बुधवार, 11/08/2010 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी शाळेत तुझी झाली भेट; एक नवी मैत्रीण म्हणून; जगण्याच्या संकल्पनाही न कळल्या तेव्हा; तुझा हात धरला आधार म्हणून. या माणसांच्या बाजारात; मला सगळंच अनोळखी वाटायचं; तुझं माझं मैत्रीच नातच फक्त; मला माझ हक्काच वाटायचं. तारुण्यातल्या नवथर गोष्टी; आपण एकमेकींना सांगत गेलो; आपल्या मैत्रीच्या विश्वात रमताना; क्षणाक्षणाला वाढत गेलो. सप्तपदी चालताना सुद्धा; माझी नजर तुलाच शोधितं होती; मनात होतो हुरहुर नव्या जोडीदाराची; पण तुझी नजर मात्र आश्वासक होती. रमत गेले मी ससांरात नकळत; तुझ्या पासून अस्तित्वाने मी दूर झाले; पण तुझ्या मैत्रीची ओढ इतकी की; तुझ्या आठवणींचीच मी मैत्रीण झाले. आ
काव्यरस

प्रवाशांचा रिक्शा टॅक्सी वर बहिष्कार

लेखक आप्पा यांनी बुधवार, 11/08/2010 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, उद्या १२ ऑगस्ट मुंबईकरांचा रिक्शा टॅक्सी वर बहिष्कार घालण्याचे आवाहन वाचले. रिक्शा चालकांचा हा अनुभव चिंचवड येथेही येतो. भारतातील वाचकांना ही हा अनुभव येत असेल. कमी अतंरावर न येणे, किंवा जास्त भाडे घेणे, उध्दट वागणे, चुकीच्या ठिकाणी उतरवणे आदी अनंत अनुभव असतील. सर्वच प्रवाशांनी जर बहिष्कार घालण्याचे ठरविले तर? करायची सुरवात.

ग्रंथस्नेह : मराठी पुस्तकांचे घरपोच पुस्तकसेवा देणारे वाचनालय

लेखक सुप्रिया म्हात्रे यांनी बुधवार, 11/08/2010 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रंथस्नेह वाचनालय ग्रंथस्नेह हे सीएसटी ते डोंबिवली(पूर्व विभाग), सीएसटी ते बेलापूर(हार्बर विभाग), चर्चगेट ते बोरीवली(पश्चिम विभाग) ह्यांदरम्यान कोणत्याही पत्त्यावर कार्यालयात किंवा घरी अशी घरपोच पुस्तकसेवा देणारे वाचनालय आहे. वाचनालयाचा पत्ता- एफ-५-१, स. गो. बर्वेनगर, मुक्ताबाई रुग्णालयाजवळ, घाटकोपर (पश्चिम) , मुंबई ४०००८४ असा आहे. वाचनालयात दूरध्वनी ९८६९०२४०६१ किंवा इ-मेलद्वारे granthasneh@gmail.com पुस्तक नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. येथे सर्वप्रकारच्या वयोगटासाठी पुस्तके उपलब्ध आहेत.