माझ्या दुमजली ऑफिसच्या गच्चीवरुन आमचा ग्रुप खाली पाहत होता .
शेजारच्या कंपांउंड मध्ये काहीतरी बांधकाम चालु होते.त्यातील मजुर जेवन करत होते.
चटनी, बाजरीची भाकरी व बरेच मराठ मोळे पदार्थ असावेत.तत्पुवी आमचेही प्रत्येकी पन्नास रुपये देउन कंपनीच्या केफेटेरीयामध्ये जेवन झाले होते , ज्यामध्ये फक्त मिठालाच अशी चव होती जीला आपण ठळक विशेषण देउ शकू.
मेसच्या जेवनाला वैतागलेली ग्रूपमधील एक मुलगी मजूरांकडे पाहत म्हणाली ,
" काय मज्जा ए कि नई या लोकांची , चट्नी , भाकरी , किती मजा येत असेल रोज रोज चट्नी , भाकरी खायला ! "
आम्ही ऐकत होतो .मुलगी शिव्या जरी देत असली तरी आम्ही ऐकतोच!!