Skip to main content

झाड आणि माकड

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 13/08/2010 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
"चांगल्या झाडावर माकड बसते" संदीपचे ते शब्द मला आजही बर्‍याचदा आठवतात. संदीप माझा समवयस्क माझ्याच कंपनीत सारखेच काम करणारा सहयोगी. "चांगल्या झाडावर माकड बसते" हे त्याचे निश्कर्ष. तो म्हणायचा की एखाद्या जोडप्यापैकी एकजण अगदी रुबाबदार असेल तर दुसरा/दुसरी एकदम फडतूस असतो/असते. तरतरीत चालणारी देखणी बायको आणि तिच्या सोबत पाय घसतत चालणारा मेंगळट नवरा. स्मार्ट रुबाबदार नवरा आणि त्याच्या सोबत वेंधळी बायको. मिठ्ठास बोलण्यात साखर पेरणी , हजरजबाबी असणारा नवरा आणि बहुतेक वेळा अबोल किंवा बोललीच तर कुजकट बोलणारी त्याची सहधर्मचारणी. समजूतदार नवरा आणि सतत तोंड चालवणारी त्याची पत्नी. आग्यावेताळ नवरा आणि स्वभावाने मृदू सालस बायको. काळ्यासोबत पांढरे असावे अशा कॉन्ट्रास्ट जोड्या नेहमी पहाण्यात येतात. त्यांचे संसारदेखील सुखात चालत असतात. नवरा आणि बायको दोघेही कर्तबगार रुबाबदार देखणे अनुरूप आहेत असे चित्र फार क्वचित दिसते. माझ्या पहाण्यात असे काही पतीपत्नी आहेत पण बहुतेकदा त्यांचे एकमेकांचे इगो इतके स्ट्रॉन्ग आहेत की त्यांचे संसाराचा गाडा कधी कोलमडेल ते सांगता येत नाही. चांगल्या झाडावर माकड बसते हा निश्कर्ष या अशाच निरीक्षणातून आलेला. दिल्लीत रहात असताना त्याने हे रस्त्याने जाणार्‍या तरूण जोडप्यांसंदर्भात दाखवून दिले. रस्त्याने जाणार्‍या ८०% जोडप्यातील मुलगा किंवा मुलगी हे एकमेकाना अनुरूप तर सोडाच काळ्या सोबत पांढरे असावे इतके दिसण्या वागण्या बोलण्यात एकमेकाना विरूप होते. हे असे का होत असावे. बहुधा विरुद्धा धृवांचे आकर्षण असावे. गरीब मुलीला श्रीमन्त मुलाचे आकर्षण , देखण्या मुलीला काळा तेल्या बावळट तरूण आवडतो तरुणांचेतारुण्यसुलभ म्हणून एकवेळ जाऊद्या पण चाळिशीच्या आसपास असलेल्या जोडप्यात सुद्धा अशी विरुपता आढळते. एकाच वेळेस नवरा आणि बायको दोघे रुबाबदार देखणे कर्तबगार असे का नसतात. एक जण झाड आणि दुसरा माकड असतो. "चांगल्या झाडावर माकड बसते" हे संदीपचे बोलणे मला या मुळे नेहमीच आठवते. माझ्या बाबतीत हे मी ताडून पाहिले .... आम्ही दोघे आलटून पालटून झाड आणि माकड हे रोल प्ले करत असतो. langoor and tree

वाचने 6024
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

मथळा वाचून असे वाटले की इथल्या popcorn वाल्या झाडाविषयी लिहीले आहे. बाकी तुमच्या विषयाशी अंशतः सहमत. कारण असे विरुद्ध जोडपेच सगळ्यांच्या लक्षात रहाते. म्हणून अनुरुप जोडपी विसरली जातात. त्यामुळे पद्धतशीर विदा मिळाल्या शिवाय सांगता येणार नाही.

माकड असल्याचा फायदा पहिल्यांदाच जाणवतो आहे. झाडप्रेमी (आणि झाडाच्या शोधात असणारा) माकडोबा

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आपल्या आवडीच्या झाडावर दुसरा/दुसरी कोणी बसला/बसली असेल तर तो/ती आपल्याला माकड वाटतो/वाटते. असा विचार करुन पाहा पटतंय का.

पिंका टाकणार्‍या झाडावरच्या माकडावर लेख असेल असे वाटले होते पण निराशा झाली. लेख पटला नाही... अदिती आणि नगरीनिरंजनशी सहमत... मृत्योरबा नी अदितीने सांगितल्याप्रमाणे सही बदलावी... बाकी विजुभौंचा फोटो एकदम मस्त आलाय....

व्वा विजुभाऊ व्वा! वस्तुस्थितीचे दाहक चित्रण शब्दातुन मांडलेले पाहुन आम्ही हळवे झालो आणि ड्वाले पनावले. :D >>देखण्या मुलीला काळा तेल्या बावळट तरूण आवडतो खरंय खरंय! अगदी खरंय. :( -(कधी काळी गोरा, न-तेलकट, बावळट) ध.

लेख आवडला थोडाफार पटलाही. अगदी माकड/झाड नाही पण परस्पर विरोधी तत्व एकत्र येतात तरी किंवा एकत्र आल्यावर विरोधाभास अधोरेखीत तरी होतो. जसं मी जितकी इमोशनल आहे तितका नवरा रॅशनल आहे. मला जितकी अध्यात्माची आवड आहे तितकी त्याला नावड. पण गंमत म्हणजे मला त्याचा हा विरोधाभास आकर्षक वाटतो. मला वाटतं नैसर्गीक परस्पर पूरकता निवडली जात असावी.

विजुभौ, निरिक्षणाशी सहमत आहे. खरे तर उदाहरण म्हणून काही फोटो डकवायला पाहिजे होते. :) -दिलीप बिरुटे .

निरिक्षण एकदम बिनचुक आहे. खरतर काही लोक हे सगळ कलियुगामुळे घडत आहे अशी त्यावर सारवासारव करीत असतात.अश्या विजोड कितीतरी म्हणजे जवळ जवळ ९०% तरी जोड्या बघण्यात येतात. अनुरुप असे खुपच कमी भेटतात.अन भेटतात ते लग्न न करता एकत्र रहात असतात.

विजुभाऊंच्या लेखाशी एकदम बाडिस! आलटून पालटून झाड आणि माकड हे अगदी बरोबर आहे. झाड आणि माकड असण्यातच खरी गंमत आहे. दोन्ही झाडे असतील तर काहीच गंमत नाही आणि दोन्ही माकडे असतील तर बाकीच्यांनाच सगळी गंमत ;-) (अनुभवी ) चिन्मना

छानच आहे . पण कळला नाही . म्हणजे ते माकड आहे की माकडीण आहे हे काय कळत नाहीय्ये.

आमच्या पहाण्यामधे सर्व प्रकारची झाडे आणि माकडे आली आहेत... पण चिन्मनाशी सहमत.

इथल्या सगळ्या विवाहितांनी आपण झाड आहोत की माकड ते सांगितलं पाहिजे. म्हणजे त्या पर्सेंटेज वरुन लेखातली कन्क्ल्ञूजन्स बरोबर की चूक ते ठरवता येईल. अर्थात सँपल खूपच छोटं पडेल पण तरी दुसरा काय पर्याय आहे ?

चांगल्या झाडाची व्याख्या काय ? आणि माकड कसे ओळखावे ? आमच्या घराजवळ एक सुंदर तळे आहे .. तिथे खूप सारी (विविध प्रकारची ) झाडे आहेत .. आणि काही माकडे सुद्धा आहेत. आणखीही काही प्राणी दिसतात .. उदा. मनुष्यप्राणी .