Skip to main content

मी , ती आणी चटणी-भाकरी

लेखक अविनाश पालकर यांनी शुक्रवार, 13/08/2010 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या दुमजली ऑफिसच्या गच्चीवरुन आमचा ग्रुप खाली पाहत होता . शेजारच्या कंपांउंड मध्ये काहीतरी बांधकाम चालु होते.त्यातील मजुर जेवन करत होते. चटनी, बाजरीची भाकरी व बरेच मराठ मोळे पदार्थ असावेत.तत्पुवी आमचेही प्रत्येकी पन्नास रुपये देउन कंपनीच्या केफेटेरीयामध्ये जेवन झाले होते , ज्यामध्ये फक्त मिठालाच अशी चव होती जीला आपण ठळक विशेषण देउ शकू. मेसच्या जेवनाला वैतागलेली ग्रूपमधील एक मुलगी मजूरांकडे पाहत म्हणाली , " काय मज्जा ए कि नई या लोकांची , चट्नी , भाकरी , किती मजा येत असेल रोज रोज चट्नी , भाकरी खायला ! " आम्ही ऐकत होतो .मुलगी शिव्या जरी देत असली तरी आम्ही ऐकतोच!!

स्वतंत्र

लेखक विकास यांनी शुक्रवार, 13/08/2010 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
येत्या रविवारी भारताला स्वातंत्र्य मिळून ६३ वर्षे होतील. मिसळपावचे बहुतांशी सदस्य हे विविध पिढ्यातील असले तरी स्वातंत्र्योत्तर काळातील आहेत असे वाटते.

गोकुळ आहे!!!

लेखक कळस.. यांनी शुक्रवार, 13/08/2010 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! विचार करावासा वाटतो कि आपल्यापेक्षा दिग्गज जेव्हा लेखन करीत असतील तर त्यांना प्रतिसाद द्यावा कि नाही. खर तर नवोदितांनी प्रतिक्रिया देणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे. पण कधी कधी एकमेकावर उगवलेले टीकेचे सूड पाहता त्यांचा बद्दल असलेला पगडा थोडा का होईना ढासळतो. याचे कारण म्हणजे एकमेकांवरील केलेले [विनोदात्मक] शब्दांचे वार. हे सगळे वाचून बरा टाईमपास होतो पण हे होणे थोडे चुकीचे वाटते. कधी कधी दुर्भाग्यपूर्ण वाटते.

फ्लॉवर मुगडाळ आमटी

लेखक जागु यांनी शुक्रवार, 13/08/2010 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
फ्लॉवर मुगडाळ आमटी हा प्रकार अगदी सोप्पा त्यातुन वेगळी भाजी नको करायला आणि घरात सगळ्यांच्या आवडीचा त्यामुळे आठवड्यातुन एकदा तरि मी करतेच.

झाड आणि माकड

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 13/08/2010 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
"चांगल्या झाडावर माकड बसते" संदीपचे ते शब्द मला आजही बर्‍याचदा आठवतात. संदीप माझा समवयस्क माझ्याच कंपनीत सारखेच काम करणारा सहयोगी. "चांगल्या झाडावर माकड बसते" हे त्याचे निश्कर्ष. तो म्हणायचा की एखाद्या जोडप्यापैकी एकजण अगदी रुबाबदार असेल तर दुसरा/दुसरी एकदम फडतूस असतो/असते. तरतरीत चालणारी देखणी बायको आणि तिच्या सोबत पाय घसतत चालणारा मेंगळट नवरा. स्मार्ट रुबाबदार नवरा आणि त्याच्या सोबत वेंधळी बायको. मिठ्ठास बोलण्यात साखर पेरणी , हजरजबाबी असणारा नवरा आणि बहुतेक वेळा अबोल किंवा बोललीच तर कुजकट बोलणारी त्याची सहधर्मचारणी. समजूतदार नवरा आणि सतत तोंड चालवणारी त्याची पत्नी. आग्यावेताळ नवरा आणि स्वभाव

कणसूर

लेखक विसुनाना यांनी शुक्रवार, 13/08/2010 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
का जिवाला आज त्याच्या लागली हुरहूर आहे? कोण अज्ञातातुनी निर्यातले काहूर आहे? लोक सारे दूर जाती - तो जरा दिसला कुठे की! हे खरे का? की अताशा तोच त्याच्या दूर आहे? दिसत आहे तो असा शुद्धीतला माणूस का रे? बिघडले का आज कांही? - और त्याचा नूर आहे गीत जे तो गात आहे बेसुरे आहे खरे ते (शुद्ध नाही लागला - शुद्धीतला कणसूर आहे) पैज लावा - कीर्त त्याची फारशी टिकणार नाही तेवणारी ज्योत ना तो धधकता कापूर आहे