Skip to main content

कॉर्न चॅट

लेखक चिंतामणी यांनी शनिवार, 14/08/2010 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : १०० ग्रॅम स्वीट कॉर्न, १कांदा, १टोमॅटो, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी(१बटाटा), थोडी बारीक शेव, १ टीस्पून चाट मसाला, १कप दही, १/२वाटी कॉथिंबीर.

जनजागृतीसाठी हा मेल देत आहे!

लेखक शानबा५१२ यांनी शनिवार, 14/08/2010 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार्,नमस्कार.......... प्रथम महत्वाच्या व लक्षात ठेवण्याच्या गोष्टी : १)हा लेख १००% सत्यघटनेवर आधारलेला आहे,कुणास कोणतीही शंका असल्यास ती स्वःतकडेच ठेवावी,आम्ही खुलासा करणार नाही.

खांडवी

लेखक शाल्मली यांनी शनिवार, 14/08/2010 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आज येथे देत आहे एक खास कोकणी पदार्थ - खांडवी. आमच्याकडे हा पदार्थ नागपंचमीच्या दिवशी करतात.

काही हास्य क्षण..........

लेखक utkarsh shah यांनी शनिवार, 14/08/2010 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नसुन फक्त आस्वाद घेण्यासाठी............ ------------------------------------------------ संतावर मुलीचा विनयभंग केल्याचा खटला चालू होता. वकिलाने संता ला ११४२० रुपये दंड ठोठावला. संता : ११४२० रुपये का? ...वकील : १०००० रुपये विनयभंग केल्याचे, १०.२ % entertainment tax आणि ४% VAT. ---------------------------------------- एका मुलीने coin टाकला आणि वजन केलं - ५८ kg. पिशवी बाजूला ठेवली - ५५ kg.

मोरा मोरा नाच रे (बडबडगीत)

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 14/08/2010 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
मोरा मोरा नाच रे (बडबडगीत) मोरा मोरा नाच रे अंकलिपी वाच रे वाचता वाचता बोल रे पृथ्वी कशी गोल रे गोल चेंडू उडला सुर्यावरती पडला कान त्याचा कापला म्हणून सुर्य तापला ऊन, हवा आणि गरम झाले पाणी पाणी गरम झाले वाफ़ होऊन आले सोडूनिया धरती वाफ़ गेली वरती आभाळात मगं तिचे झाले ढगं ढग वाजे गडगड वीज चमके कडकड वारा सुटला सो-सो पाऊस आला धो-धो मोरा मोरा नाच रे श्रावणाचा मास रे नाचता नाचता सारा फ़ुलवून दे पिसारा गंगाधर मुटे ...................................

मिपा कट्टा ( अदीम)

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 14/08/2010 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजाल आले आनि लोकांची सार्वजनीक जिवनातील उठबस कमी झाली असे म्हंटले जाते. माणूस जास्त एकलकोंडा होत गेला असे म्हंटले जाते. पुरातन काळी लोक चर्चा /गप्पा करायच्या निमित्ताने एकत्र येत. वेळ घालवत आपुलकी वाढवत. सध्याचा जिवनाचा वेग आणि तंत्रज्ञान यामुळे आपण सातासमुद्रापलीकडल्या माणसाशी झटकन संपर्क साधतो पण शेजार्‍याची विचारपूस करत नाही. मराठी संस्थळांच्या बाबतीत हे थोडे वेगळे आहे. इथे एकत्रे भेटलेली माणसे निव्वळ मराठी आहोत्.साहित्याची आवड आहे. थोडी टवाळकी करायला आवडते या कॉमन गुणामुळे प्रत्यक्षातही एकत्र येतात. भेटत रहातात.

गुगल व स्काईप वर बंदी - मूर्खपणाचा कहर

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 14/08/2010 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या सकाळमध्ये स्काईप वर बंदी घालणे आवश्यक असल्याचे सुरक्षा यंत्रणांचे मत प्रसिद्ध झाले आहे. सर्दी झाली म्हणुन नाक कापून टाकायचा असा हा प्रकार वाटतो. http://72.78.249.124/esakal/20100814/5012159758951521931.htm

माझे पोहणे

लेखक शिल्पा ब यांनी शनिवार, 14/08/2010 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
आता यात काय लिहायचे असे वाटेल तुम्हाला...पोहता येत नसेल तर क्लास लावायचा आणि हात पाय मारताना थोडेफार नाका-तोंडात पाणी जाऊन काही काळाने पोहायला जमते.. खरं तर हीच प्रक्रिया आहे...पण... मला आत्तापर्यंत पोहता येत नव्हते...म्हणजे आता येते अशातला भाग नाही पण आताशा मी पाण्याला घाबरून काठावर उभी राहत नाही एवढंच..मला पाण्याची फार्फारच भीती वाटत आलीये...अजूनही वाटते...अंघोळ करताना डोक्यावरून जास्त पाणी घेतलं तरी एकदम धबधब्याखाली आले असं वाटून डोळे उघडून कितीतरी वेळा साबण डोळ्यात गेला असेल...

शब्द

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 14/08/2010 06:06 या दिवशी प्रकाशित केले.
मी सिगारेट का सोडली. श्री सुधीर काळे ह्यांचा लेख वाचून पुर्वी लिहून ठेवलेली ही स्वानुभवाची कथा आठवली. ....... ' शब्द. फ़ोनची घंटी वाजताच स्वातीने धावत जाऊन फ़ोन उचलला. मी अगदी मजेत आहे आई. तू काळजी करू नको. काळजी वाटणारच गं! लग्नानंतर इतक्या लांब गेलीस. तिथे तुम्ही दोघेच. सगळं घर लावायचं. कोणी मदतीला नाही..... विकास काय म्हणतात? त्याचं काम छान सुरू आहे. संध्याकाळी तसा लवकरच घरी येतो. दिवसभर मी एकटीच घरी. तू काळजी घे बाई. आई तू आली असतीस आमच्याबरोबर तर किती छान झाले असते! पण तुझी शाळा.