Skip to main content

born insomniac....! झोप हविये झोप....!

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी रविवार, 22/08/2010 02:19 या दिवशी प्रकाशित केले.
झोप नाही येत यार! sometimes i feel like i am born insomniac! बेड मध्ये जाण्याआधी असं वाटतं की आज तरी थोडा वेळ झोप लागेल्,,..पण नाही...सहज चुळबुळ म्हणुन घड्याळ पाहिलं जातं..रात्रीचे २-३० वाजलेले असतात... असं वाटतं कि बराच वेळ गेला...आणि थोड्या वेळानी परत घड्याळ पाहिलं जातं ...२.१४... का होतं आहे असं! बरं दिवसा झोपावं तर कितीही प्रयत्न केला १५ मिनिटांपेक्षा जास्ती झोप लागतही नाही.. म्हणजे मला महिनोन महिने १-३ तास झोप पुरेशी होते आहे?

स्पर्श

लेखक Bhushan11 यांनी रविवार, 22/08/2010 01:50 या दिवशी प्रकाशित केले.
स्पर्श वाटतं कधी कुणीतरी यावं नकळत पाठीमागून वाटतं कधी कुणीतरी यावं अन फिरवावा हात माझ्या पाठीवरून वाटतं कधी कुणीतरी यावं अन फिरवावा हात माझ्या केसातून वाटतं कधी कुणीतरी यावं अन फिरवावा हात माझ्या डोक्यावरून वाटतं कधी कुणीतरी यावं अन फिरवावा हात माझ्या चेहर्यावरून वाटतं कधी कुणीतरी यावं अन धरावा हात माझा आपल्या हातात वाटतं कधी कुणीतरी यावं अन पहावं माझ्या खोलवर डोळ्यात वाटतं कधी मिळावं थोडं सुख, मिळावा थोडा आपलेपणा वाटतं कधी मिळावं थोडं सुख, मिळावा थोडा लळा वाटतं कधी मिळावं थोडं सुख, मिळावा थोडा लडिवाळपणा वाटतं कधी मिळावं थोडं सुख, मिळाव्या थोड्या गुददुल्या वाटतं कधी मिळावं थोडं सुख, मिळावं
काव्यरस

पहिला अनुयायी (बाबागिरीच्या साबणाचा गिऱ्हाइक) असा मिळवावा

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 22/08/2010 01:26 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. श्री. अदितीअम्मा देवी यांनी 'पहिला अनुयायी कसा मिळवावा' यावर काथ्याकूट टाकला, त्यावर खूप मोठी चर्चा झाली, श्रद्धा, अंधश्रद्धा, नास्तिकपणा वगैरे विषय चघळले गेले. 'कुंभार थोडे गाढवं फार, त्यामुळे हे सोपं असतं' किंवा 'अमुक बाबाला नशीबाने असे अनुयायी मिळाले' वगैरे आख्यायिका झाल्या. तरी अदितीच्या 'पहिला अऩुयायी कसा मिळवावा?' मूळ प्रश्नाला उत्तरं मिळालीच नाहीत. ती देण्याचा हा प्रयत्न. तो धागा जवळपास 200 पर्यंत गेल्याने इथे त्याची नवीन सुरूवात करतो आहे. पामरावर श्री. श्री. अदितीअम्मा देवी यांचा कोप होणार नाही अशी आशा.

गोकाकचा धबधबा

लेखक चालु माणुस यांनी शनिवार, 21/08/2010 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
गोकाक एक निसर्ग रम्य ठीकाण........ मी काढलेले धबधब्याचे काही फोटो देत आहे. हा धबधबा मनाला फारच भुरळ पाड्णारा आहे. येथे july व august महीन्यात भेट द्यावी... धबधबा प्रेमीनी पाहिलाच पाहीजे असा हा गोकाकचा धबधबा..... धबधबा कोसळण्यापुर्वीचा खडकाळ भाग....... धबधब्यावरील झुलता पुल....

अंडाहार - शाकाहारी की मांसाहारी?

लेखक सुनील यांनी शनिवार, 21/08/2010 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
आधी कोंबडी की आधी अंडे, हा प्रश्न तूर्तास बाजूस ठेऊ. तसे आम्हाला दोन्ही आवडतात! प्ररंतु, सध्या आम्ही ग्रासलो आहोत तो एका वेगळ्याच प्रश्नाने. तो प्रश्न असा की, अंडाहाराची गणना शाकाहारात करावी की मांसाहारात? आम्ही आमच्या एका प्रिय मित्राचा सल्ला घेतला. तो म्हणाला, "मांसाहारी". म्हटले, "का?" "हे बघ, अंडे येते कोंबडीच्या शरीरातून. कोंबडी तर मांसाहारी. सबब, अंडेदेखिल मांसाहारी", बिनतोड युक्तिवाद! पण तसे आम्ही मूळचेच शंकेखोर. त्याला विचारले, "ते बरोबर. पण मग दूधसुद्धा गायी-म्हशीच्या शरीरात्रूनच येते.

भयंकर षडयंत्र

लेखक सागर यांनी शनिवार, 21/08/2010 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : सदर कथा काल्पनिक असून त्याचे कोणत्याही घटनेशी वा व्यक्तीशी साम्य आढळल्यास योगायोग समजावा. *** वेळेअभावी संक्षिप्त स्वरुपात हे कथानक लिहितो आहे. *** भयंकर षडयंत्र उपोद्घातः फेब्रुवारी १९९८ अफगणिस्थानातील तोराबोरा या दुर्गम इलाख्यातील एक प्रशस्त गुहा आपल्या पॉश सोफ्यावर राजेशाही थाटात पाय पसरुन तो बसला होता. सोनी टीव्ही च्या आलिशान पडद्यावर तो अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्राध्याक्षांचे भाषण लोकांना मंत्रमुग्ध कसे करते हे तो पहात होता. गेली कित्येक वर्षे तो हे करत होता.

विटेवर चा विटोबा

लेखक मन्जिरी पैठन्कर यांनी शनिवार, 21/08/2010 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
विटेवर चा विटोबा , हात टेवून कटीव र उभा आपला युगान युगे , डोळे लावून वाटेव र तो - काही येत नाही , हा - काही ट्ळत नाही अरे कुणी सांगा त्याला आजकाल आपल्या पालकांचे पाय कुणी चेपतच नाही.

तुमचा पगार किती आणि तुम्ही काम करता किती ?

लेखक मदनबाण यांनी शनिवार, 21/08/2010 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसभेच्या निवडणुकीत "आम आदमी के साथ, कॉंग्रेस का हाथ', अशा घोषणा देणार्‍या कॉग्रेसला आता महागाई वाढल्याचे कळाले असावे कारण आता खासदारांची पगारवाढ करण्यात आली आहे. फारच गरीबीचे आणि कष्टाचे जीवन हे खासदार मंडळी जगत असावेत. यातील बहुतेक खासदारांची संपत्ती काही कोटीच्याही पुढची आहे, तरी सुद्धा या लोकांना पगार कमी पडतो तर आम आदमीची काय अवस्था असेल ? अर्थात आम आदमीला विचारतोय कोण ज्याला त्याला स्वतःची पडलेली आहे, खासदारांना वाढीव पगार मिळण्यासाठी सर्व पक्ष कसे एकत्र आले याचे सुरेख आणि दुर्मिळ चित्र पहायला मिळाले,मग त्यात डावे असो वा उजवे पगार वाढ मिळतेय ना ?