आधी कोंबडी की आधी अंडे, हा प्रश्न तूर्तास बाजूस ठेऊ. तसे आम्हाला दोन्ही आवडतात! प्ररंतु, सध्या आम्ही ग्रासलो आहोत तो एका वेगळ्याच प्रश्नाने. तो प्रश्न असा की, अंडाहाराची गणना शाकाहारात करावी की मांसाहारात?
आम्ही आमच्या एका प्रिय मित्राचा सल्ला घेतला. तो म्हणाला, "मांसाहारी".
म्हटले, "का?"
"हे बघ, अंडे येते कोंबडीच्या शरीरातून. कोंबडी तर मांसाहारी. सबब, अंडेदेखिल मांसाहारी", बिनतोड युक्तिवाद!
पण तसे आम्ही मूळचेच शंकेखोर.
त्याला विचारले, "ते बरोबर. पण मग दूधसुद्धा गायी-म्हशीच्या शरीरात्रूनच येते. मग ते शाकाहारी कसे?"
तो क्षणभर विचारात पडला आणि मग घड्याळ्याकडे पाहात चटकन म्हणाला, "अरे, माझी आता दुध पिण्याची वेळ झाली. आपण नंतर बोलू!"
झालं!
मग आम्ही गाठला दुसरा मित्र. त्यालाही तोच प्रश्न टाकला!
"हे बघ, दुकानात जी अंडी मिळतात ना, त्यात अजिबात जीव नसतो. कारण ती मुळी कोंबडा-कोंबडीच्या समागमाने निर्माण झालेलीच नसतात! तेव्हा ती शाकाहारीच!"
मी म्हटले, "जरा स्पष्टीकरण दे"
तर तो म्हणाला , "हे बघ, कोंबडी नैसर्गिकरीत्या दिवसाला एखादेच अंडे देऊ शकते. आता अशा फक्त एकांडी कोंबड्या पाळणे पोल्ट्री फार्मला परवडणार काय? नैसर्गिक अंडी उपजवायची तर त्याला कोंबडे किती लागतील? असे एकास एक बफर रिसोर्सेस ठेवले तर तो गेलाच की बाराच्या भावात! तेव्हा त्याला अनैसर्गिक उपाययोजना करून, एका कोंबडीला अनेक अंडी घालणे भाग पाडावे लागते. त्यात जीव असा नसतोच!"
तरीही आमच्या मनात शंका आलीच, "पण शेवटी येते तर्, कोंबडीच्या शरीरातूनच ना!"
तर मंडळी, मला आता तुमचा सल्ला पाहिजे आहे. सांगा, अंडाहार हा शाकाहारी की मांसाहारी?
वाचने
21261
प्रतिक्रिया
64
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक विचार
पिलाच्या पोषणाकरता हे द्रव्य
In reply to एक विचार by हुप्प्या
थोड थांबा फक्त शाकाहारी
In reply to एक विचार by हुप्प्या
दूध व मध शाकाहारी की
असे कसे म्हणता येईल?
उत्तर
In reply to असे कसे म्हणता येईल? by वेताळ
आमचा असाच एक तर्क
अवांतर
दोन्ही नाही
:-)
हम्म...
In reply to :-) by सहज
ह्या नियमाप्रमाणे कोणत्याच गर्भात जीव नसला पाहिजे,
In reply to :-) by सहज
सगळी कहाणी ऐकून झाल्यावर (की
In reply to ह्या नियमाप्रमाणे कोणत्याच गर्भात जीव नसला पाहिजे, by गांधीवादी
अंडे व जीव
In reply to ह्या नियमाप्रमाणे कोणत्याच गर्भात जीव नसला पाहिजे, by गांधीवादी
मी शुद्ध शाकाहारी आहे, म्हणून
वांगे कळले नाहि....
In reply to मी शुद्ध शाकाहारी आहे, म्हणून by भारतीय
वांगे
In reply to मी शुद्ध शाकाहारी आहे, म्हणून by भारतीय
हमस
In reply to वांगे by सुनील
त्या बरोबर कांदा पण बंद करा
अंडाहार - शाकाहारी की मांसाहारी?
खाणा-याने खात जावे...
तूर्तास तू गरमागरम भूर्जीपाव
तात्या,
In reply to तूर्तास तू गरमागरम भूर्जीपाव by विसोबा खेचर
भूर्जीपाव पार्टी
In reply to तात्या, by असुर
अंधेरी स्टेशनबाहेर सुद्धा.
In reply to भूर्जीपाव पार्टी by सुनील
तात्या, बघा! तुम्ही प्यार्टी
In reply to अंधेरी स्टेशनबाहेर सुद्धा. by मेघवेडा
अंडे शाकाहारी कि मांसाहारी??
अंडाहार
हिंसा
>>अवांतर- एका मित्राला
In reply to हिंसा by प्रकाश घाटपांडे
समांतर
In reply to >>अवांतर- एका मित्राला by विश्वनाथ मेहेंदळे
होय
In reply to हिंसा by प्रकाश घाटपांडे
माझ्याकडून
In reply to होय by सुनील
यस्स
In reply to माझ्याकडून by प्रियाली
अंड्याचा फंडा कळावा म्हणून हा
संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे
अंडा बुर्जी
बोला.. कधी जमायचे..?
In reply to अंडा बुर्जी by तुषार काळभोर
(No subject)
वादाचे मूळ
vegan
सध्याच्या काळात पोल्ट्री आणि
कुणाला काय खायचंय ते खा..
असं कसं असं कसं???
In reply to कुणाला काय खायचंय ते खा.. by पिशी अबोली
ते तसं ते तसं..
In reply to असं कसं असं कसं??? by प्यारे१
ते प्रशांत दामले ह्या मराठी
In reply to ते तसं ते तसं.. by पिशी अबोली
हे आम्हाला काय माहिती?मराठी
In reply to ते प्रशांत दामले ह्या मराठी by प्यारे१
विचारतय कोण तुमच्या मराठी
In reply to हे आम्हाला काय माहिती?मराठी by पिशी अबोली
+ १
In reply to कुणाला काय खायचंय ते खा.. by पिशी अबोली
व्हेज अंडाकरी
व्हेज अंडाकरी
कोणते हॉटेल "कांचन" का?
In reply to व्हेज अंडाकरी by सुहास
कांचनची मिसळ
In reply to कोणते हॉटेल "कांचन" का? by श्रिया
हो, मिसळ छान असते आणि
In reply to कांचनची मिसळ by तुषार काळभोर
@ व्हेज अंडे बहुतेक पनीर आणि
In reply to हो, मिसळ छान असते आणि by श्रिया
णाविलाज को क्या विलाज?
विवादास्पद मुद्दा
वनस्पती रुचकर लागतात म्हणून
In reply to विवादास्पद मुद्दा by सुबोध खरे
बॅटमॅन
रोचक चर्चा.
आय मीन...
In reply to रोचक चर्चा. by सूड
मी ते वर लाल अक्षरात आय मीना
In reply to आय मीन... by सूड
आय मीना...
In reply to मी ते वर लाल अक्षरात आय मीना by ५० फक्त
अंडे जे आपल्यला मिळते ते फलित