Skip to main content

शाळा रे शाळा

लेखक भीडस्त यांनी मंगळवार, 24/08/2010 02:00 या दिवशी प्रकाशित केले.
'अगं बायांनो तुमच्या एकेकीच्या एका वर्षाच्या फीत माझं बालवाडीपासून ते बी.डी.एस. पर्यंतचं पूर्ण शिक्षण झालंय ग'.अस्मादिकांच्या दोन कन्यारत्नांच्या दर शालेय वर्षाच्या सुरुवातीस त्या बिचार्‍या दोघींना माझ्याकडून न चुकता हे ऐकून घ्यावं लागतं. खेरीज वर्षभरातही अनेकदा त्याची पुनरावृत्ती प्रसंगोपात होत असते ती न्यारीच.तरी ही फी मोठ्या शहरातील शाळांच्या तुलनेत कितीतरी कमी आहे.

पल पल दिल के पास...

लेखक दिपाली पाटिल यांनी सोमवार, 23/08/2010 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
हे लेखन माझा मित्र चंद्रशेखर महामुनीचे आहे. आधी इ-सकाळवर प्रकाशित झालंय पण त्याच्या परवानगीने इकडे प्रकाशित कर्तेय... पल पल दिल के पास... हर शाम आँखोपर तेरा आँचल लहेराये, हर रात यादों की बारात ले आये मै सॉंस लेता हूँ, तेरी खुशबू आती है इक महका महका सा, पैगाम लाती है मेरे दिलकी धडकन भी, तेरे गीत है पल पल दिल के पास, तुम रहती हो जीवन मिठी प्यास, ये कहती हो... प्रियतमेच्या आठवणींचं, जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सर्वत्र भासणाऱ्या तिच्या हव्याहव्याशा अस्तित्वाचं इतकं अप्रतिम वर्णन खूप कमी ठिकाणी वाचायला मिळतं.

काय ? काय ! द्यावे बहिणीला भेट म्हणुन ???

लेखक संजयशिवाजीरावगडगे यांनी सोमवार, 23/08/2010 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या संस्कृतीत प्रमुख सणामध्ये 'रक्षाबंधन' हा सण - भाऊ-बहिणीचा स्नेह,प्रेम व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. कृष्‍णाच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहत होते. द्रौपदीने साडी किनार फाडून बांधले होते. तेव्हापासून कृष्णाने द्रोपदीचे रक्षण करण्‍याचा संकल्प केला व आजीवन तिचे रक्षण केले. भारतीय इतिहासात रक्षाबंधन संदर्भात अनेक उदाहरणे आहेत.चित्तौढगडची राणीने बहादुरशाहपासून रक्षा करण्यासाठी हुमायूला राखी बांधल्याचे उदाहरण आहे. व हुमायूने राणीचे रक्षण केले ! "रक्षाबंधन" या सणात काळानुरूप जरासा बदल झालेला आहे.

अविस्मरणीय

लेखक अनिकेत प्रकाश आमटे यांनी सोमवार, 23/08/2010 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
अविस्मरणीय - ५ व ६ ऑगस्ट २०१० समीक्षा (माझी पत्नी) आमच्या ११ दिवसांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन ४ ऑगस्ट रोजी २ महिने आराम करण्यासाठी माहेरी पुण्याला गेली. नागपूरला डॉ.मंगला केतकर यांच्या दवाखान्यात २४ जुलै २०१० ला तिने बाळाला जन्म दिला. तिला व मुलाला ४ तारखेला ला संध्याकाळी नागपूरला रेल्वे स्टेशनवर सोडले. सोबत तिची आई होती. ५ तारखेला सकाळी १० वाजता नागपूरहून परत घरी लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे जाण्यास निघालो. नागपूर ते हेमलकसा जवळपास ३५० किलोमीटर अंतर आहे. वाटेत बाबा आमटेंची मुख्य कर्मभूमी आनंदवन लागत. ते नागपूरहून १०० किलोमीटर आहे. १२ वाजता तिथे पोहोचलो. आजीची (साधनाताई आमटे) भेट घेतली.

राखी अमावस्या!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 23/08/2010 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
राखी पौर्णिमा जवळ आली, की छातीत धडकी भरायचे दिवस आता सरले आहेत. तरीही राखीपौर्णिमेच्या निमित्तानं जुन्या जखमांवरच्या खपल्या निघतात आणि आमचा अश्‍वत्थामा पुन्हा गत आठवणींच्या भोवऱ्यात भिरभिरत राहतो... शाळेच्या आवाराच्या तटबंदीपेक्षा जास्त भक्कम तटबंदी त्या वेळी आमच्या मनांची होती. मुलीकडे पाहणं म्हणजे "शांतम्‌ पापम्‌' म्हणायचे ते दिवस. त्यातून आम्ही रत्नागिरीसारख्या छोट्या शहरातल्या सर्वांत "सुसंस्कृत' शाळेत, सर्वांत हुशार समजल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर्गातले सहाध्यायी. सर्व जगाच्या संस्कृतीरक्षणाची जबाबदारी आमच्यावरच!

संस्कृत शब्द नववारिपरिप्लुता

लेखक सूड यांनी सोमवार, 23/08/2010 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
एक सुभाषित वाचनात आले ते असे : एषा घर्मपरिक्लिष्टा नववारिपरिप्लुता । सीतेव शोकसंतप्ता महीं बाष्पं विमुञ्चति ॥ तर उपरोक्त सुभाषितातील "नववारिपरिप्लुता" शब्दातील परिप्लुता शब्दाचा मूळ धातू कोणता ? कृपया कोणाला माहित असल्यास सांगणे. संस्कृतचे ज्ञान असलेल्या व्यक्तींकडून प्रतिक्रिया अपेक्षित आहे. (अर्धवटराव म्हणतात तसे धाग्याचे काश्मीर होऊ नये ही अपेक्षा. :))

बंडखोरी

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 23/08/2010 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
रुढींची भिंत त्याने पाडली मनाची बंडखोरी वाढली उरे माझे अभागी झोपडे पुरी वस्ती जरी ओसाडली चला, बोली करा, भगवंत घ्या इथे श्रद्धा विकाया काढली जरासे स्वच्छ, हलके वाटले, मनाची ओसरी मी झाडली जगाचे ऐकले अन् वागले, तरी तोंडे किती वेंगाडली! व्यथे, आता तरी तू हो सुखी, तुझ्यासाठी सुखे लाथाडली विठू, दे घोंगडी, आताच मी कुडीची जीर्ण चादर फाडली

बापं

लेखक चिंगुसविकॄतजोशी यांनी सोमवार, 23/08/2010 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
कधी रागाने फटकारलं, तरी नंतर समजूत काढणाराही तोचं असतो. त्याच्यासोबत सगळ्या गोष्टी share करता याव्या असा best friend ही तोचं असतो. आपल्या वाईट संगतीबद्दल रागावणारा तोच असतो. पण चांगल्या friends सोबत जाण्याची मोकळीक देणाराही तोचं असतो. अपयशात धीर देऊन नवीन उमेद जागवणाराही तोचं असतो. आणि यशाच्या आनंदात आपल्या बरोबर नाचणाराही तोच असतो. आपल्याला स्वावलंबी व सक्षम बनवण्यास प्रयत्नशील असणाराही तोचं असतो. स्वतः उपाशी राहून आपल्याला जेवू घालणाराही तोचं असतो. जरी त्याला आईसारखी माया दाखवता येत नसली तरी मुलांच्या काळजीने पोखरला जाणाराही तोचं असतो. मुलांकडे कुणी वाकड्या नजरेने बघितले, तर मुलांचे
काव्यरस