शाळा रे शाळा
'अगं बायांनो तुमच्या एकेकीच्या एका वर्षाच्या फीत माझं बालवाडीपासून ते बी.डी.एस. पर्यंतचं पूर्ण शिक्षण झालंय ग'.अस्मादिकांच्या दोन कन्यारत्नांच्या दर शालेय वर्षाच्या सुरुवातीस त्या बिचार्या दोघींना माझ्याकडून न चुकता हे ऐकून घ्यावं लागतं. खेरीज वर्षभरातही अनेकदा त्याची पुनरावृत्ती प्रसंगोपात होत असते ती न्यारीच.तरी ही फी मोठ्या शहरातील शाळांच्या तुलनेत कितीतरी कमी आहे.
पुण्या-मुबंईतील शाळांमधील प्रवेशाबाबत बरेच काही ऐकत आलो होतो.पण आज जे ऐकले ते सगळ्यांबरोबर शेअर करावसं वाटतंय.
मित्राचा आत्येभाउ मुंबईत फोर्टमधे रहातो.त्याच्या मुलाला ज्युनियर के.जी.च्या वर्गात यंदा प्रवेश प्रवेश घेतला.शाळा फ़्लोरा फाउंटनला आहे.कॅपिटेशन किंवा डोनेशन म्हणा फक्त रुपये दोन लाख. हे थोडंफार ऐकीवातलं होतं. ठीकायं नं.ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्य़ंत दुसरी शाळा तर बघावी लागणार नाही. त्यामुळे मुलाच्या 'उज्ज्वल' भवितव्यासाठी एवढी गुंतवणूक व्यवहार्य आहे.त्यात फारसं वावगं असं काही नाही
मात्र मित्राने पुढं दिलेली माहिती फारच उद्बोधक होती. निदान मला तरी ती तशी वाटली.
त्या पालकाकडून शाळेने अपेक्षिलेली माहिती-
तुमचं उत्पन्न किती.
तुम्ही नेमकं कुठं रहाता.
तुम्ही घरात संभाषणासाठी कुठली भाषा वापरत असता.
तुम्ही घरी कुठल्या प्रकारचा आहार घेता.
तुमच्याकडे किती आणि कोणकोणत्या गाड्या आहेत.
मुलाला रोज शाळेत कसं सोडणार - पायी की टॅक्सीने की स्कूलबसने.
या सर्वावर कडी म्हणजे, तुमच्याकडून आलेल्या माहितीची विश्वासार्हता पडताळण्यासाठी की काय-तुमचे मागच्या तीन वर्षांचे आय.टी. रिटर्न्स देखील दाखवणं अनिवार्य होतं.
एवढं सगळं दिव्य यशस्वीपणे पार पाडल्यानंतर एकदाचा प्रवेश मिळाला आहे.
सध्या ते पूज्य पिताजी बीटरुट जर्मिनेशन प्रोजेक्ट नामक उद्योगात गर्क आहेत असे समजते.एक बीट स्लाइस करून पाण्यात सोडलं आहे. एक कुंडीत लावलं आहे. अजून एक दुकानापुढच्या बागेतही लावून ठेवलं आहे. आणि यातलं निदाएकतरी फळद्रूप (की बीजद्रूप )व्हावं म्हणून ईश्वराची करुणा भाकताहेत.
शिवाय आपली मरगठ्ठ्याची औलाद शाळेतल्या उच्चभ्रू परप्रांतीय सहकार्यांना आज मराठी हिसका तर दाखवून आली नाही ना ही भ्रांत तर रोजचीच झाली आहे.
वर्गीकरण
आजी आजोबांचा इंटरव्ह्यु झाला
In reply to आजी आजोबांचा इंटरव्ह्यु झाला by रेवती
नाही.
पैशे खायचे धंदे
*&^%
In reply to *&^% by सहज
घरची शाळा
मला प्रायव्हेट शाळांचा अनुभव
मला प्रायव्हेट शाळांचा अनुभव
पर्याय काय ?
In reply to पर्याय काय ? by विश्वेश
संकुल बदला
In reply to संकुल बदला by अर्धवट
सहमत. संकुल बदला. अवांतरः
In reply to संकुल बदला by अर्धवट
+१
मलाही हाच प्रॉब्लेम माझ्या
मराठी माध्यमात मुलाना
इयत्ता दुसरी की तिसरीमध्ये
In reply to इयत्ता दुसरी की तिसरीमध्ये by विसोबा खेचर
तात्या