Skip to main content

माझा बसप्रवास

लेखक पैसा यांनी रविवार, 29/08/2010 01:21 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्यापैकी जे मुंबईकर असतील, ते म्हणतील, “हॅः बसचा प्रवास ही काय लिहिण्यासारखी गोष्ट आहे? एकदा विरार फास्ट लोकलने जाऊन दाखवा. पुणेकर म्हणतील, “आमची पी.एम. टी. लै भारी. बसमधून सगळ्या हाडांसहित नीट चढून किंवा उतरून दाखवा.” पण माझ्या मित्रांनो, तुम्ही कधीच आमच्या गोवेकर खाजगी बसमध्ये बसले नसणार. मुंबैहून बदली होऊन आलेल्या साहेबलोकांनीसुद्धा शरणागती लिहून दिल्ये की “तुमच्या गोव्याच्या बसमधून प्रवास करणे हे येरागबाळ्याचे काम नोहे.” तुम्हाला थोडी पार्श्वभूमी सांगणं आवश्यक आहे नाही का? कारण असं की, तुम्ही गोव्यात येता, २ दिवसांची टूर करता आणि परत जाता.

सिनेमा आस्वाद - पॅटन

लेखक शुचि यांनी रविवार, 29/08/2010 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
सहसा मी युद्धाचे सिनेमे बघायच्या भानगडीत पडत नाही. याचं कारण जेव्हा जेव्हा नवरा युद्धाचे सिनेमे लावून बसतो,तेव्हा तेव्हा तोफांच्या, बंदूकींच्या, रणगाड्यांच्या आवाजानी माझं डोकं उठतं. परत कोकलून कोकलून नवर्‍याला "आवाज कमी कर" हे सांगावं लागतं ते वेगळच. ना भक्तीगीतं, भावगीतं लावता येतात ना झोप काढता येते, ना घरी कोणी कुणाशी बोलू शकतं. पण आमच्या घरात सध्या झालीये एक फितुरी. मी ज्या पिल्लाला माझं समजत होते इतकी वर्षं , अगदी टेकन फॉर ग्रांटेड ते निघालय पप्पाचं. तिनी फादर्स डे ला माझ्या नवर्‍याला एक वॉर मूव्ही - "पॅटन" भेट दिली. आता तिनी दिली म्हणजे पहायलाच पाहीजे मला.

बायोटेक्नोलॉजी ऑथिरीटी ऑफ इंडिया

लेखक चैतन्यकुलकर्णी यांनी रविवार, 29/08/2010 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
सध्याचे केंद्र सरकार बायोटेक्नोलॉजी ऑथिरीटी ऑफ इंडिया स्थापन करण्यासाठी नवीन विधेयक संसदेत मांडणार आहे. ग्रिनपीस या संघटनेने त्यावर पंतप्रधान/सोनिया गांधी यांना पत्र लिहिण्याचे आवाहन केले होते, ज्याद्वारे हे विधेयक योग्य व सांगोपांग चर्चा करूनच मांडले जाईल. ज्याप्रमाणे आण्विक दायित्व विधेयक जनमताच्या रेट्यामुळे थोडेतरी बदलले गेले, त्याप्रमाणेच वरील विधेयकही त्यातील काही बाबींसाठी बदलणे आवश्यक आहे. जसे की, १. सदर बायोटेक्नोलॉजी ऑथिरीटी ऑफ इंडिया ही जेनेटिक्ली मॉडिफाईड फूड संदर्भात निर्णय घेणारी एकमात्र संस्था असेल. २. राज्यांच्या व भारतीय नागरीकांच्या मुलभूत हक्कांवर अतिक्रमण. ३.

प्रांतांच्या गोष्टी - काही संदर्भ

लेखक आळश्यांचा राजा यांनी शनिवार, 28/08/2010 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर: लोकप्रशासनावरील हा ऑथेंटिक वगैरे लेख नाही. प्रशासनाशी सहसा संबंध न येणाऱ्या मित्रांना ढोबळ कल्पना यावी एवढाच हेतू आहे. कुणी भर टाकल्यास स्वागत आणि आनंद आहे. काही चूक आढळल्यास अवश्य सांगावे. प्रेरणा (!)-
पण मला प्रांत म्हणजे कलेक्टर/डेप्युटी कलेक्टर की अजुन कुठली पोस्ट ते अजुन कळल नाही.
******* जिल्हा प्रशासनामध्ये दोन प्रमुख उतरंडी असतात. राज्या राज्यांनुसार थोडे फरक असतात. प्रस्तुत संदर्भामध्ये – विकास (डेव्हलपमेंट) उतरंड / हाएरार्की– कलेक्टर – पीडी(डीआरडीए)/ अध्यक्ष जि.प.

इंटरनेट वेबसाईट्स

लेखक विश्नापा यांनी शनिवार, 28/08/2010 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर या आधी कुणी इंटरनेट वेबसाईटस् बद्दल लिखाण केले आहे काय? मी मला माहीत असलेल्या चांगल्या वेबसाईटस् शेअर करु इच्छीतो.मिपाकरांना आवडेल काय?

Departed एक छान movie

लेखक utkarsh shah यांनी शनिवार, 28/08/2010 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
Departed हा मला खुप आवडलेला चित्रपट आहे. कितीजनांनी तो पाहिला आहे ते माहित नाही, पण नसेल पाहिला तर एकदा आवर्जुन पहा. ज्यांनी पाहिला असेल त्यांना ही तो नक्कीच आवडला असेल. चित्रपटात खलनायक बाजु भक्कम आहे.आणि या चित्रपटाचा शेवट पाहून मी पण गुंग झालो होतो. पोलिस डिपार्टमेंट वर याची पुर्ण कथा आहे.खलनायक हा स्मार्ट , हुशार असुन त्याची भरती पोलिसात सहज होते. नायकाला मात्र घेताना टाळाटाळ केली जाते कारण त्याचे फॅमिली बॅकग्राऊंड. तरी पण त्याला घेण्यात येते, पण underground agent म्हणून. त्याला गुंडाच्या टोळीत सामिल होउन त्यांच्या बातम्या पुरवणे हे त्याची जबाबदारी. पुढे थोडा bollywood style ने जातो.

नविन camera घ्यायचा आहे. मला एखादा चांगला camera suggest करा.

लेखक कशेडी घाट यांनी शनिवार, 28/08/2010 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्या मिसळपावच्या सभासदांना माझा नमस्कार. या blog वरील कलादानमध्ये upload केलेले फोठो अतिक्षय सुंदर आहेत. माझ्या कडे सध्या Nikoncha camera आहे.मला नविन camera घ्यायचा आहे. तसा मी professional photographer नाही.पण छंद जोपासन्यासाठी नविन camera घ्यायचा आहे. Net वरती मी खुप शोध घेतला पण अजूनच गोंधळलो आहे. मला एखादा चांगला camera suggest करा.