पारध
"भिंतींवर थुंकणारा माणसाची औलाद नसेल" या खास पुणेरी पद्धतीच्या पाटीने आमचे जंगी स्वागत केल्यावर आम्ही आमचा मोर्चा तिकीटखिडकीकडे वळवला. प्रभातच्या दारावर तिकीट घेणारे आजोबा मी गेल्या १८ वर्षांपासून बघत आलोय. ते अजूनही तसेच दिसतात. पुणेरीपणाची 'सिनेमा बघायचाय तर बघा नाहीतर शनिवारवाडा बघा पण दारातून लवकर टळा' अशी एक खास मिजास चेहर्यावर ठेवून ते आत्मीयतेने तिकीटे फाडतात. तिकीटखिडकीवर मी ५०० ची नोट देत "दोन द्या" असे म्हटल्यावर तिथल्या माणसाने चेहर्यावरची सुरकुतीही न हलू देता थंडपणे "सुट्टे द्या!" अशी पुणेरी संयत डरकाळी फोडल्यावर मी गुपचूप सुटे काढून दिले.
मिसळपाव