Skip to main content

एक दिवस आठवणींचा....

लेखक sandeepn यांनी सोमवार, 06/09/2010 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा गावातल्या शाळेत काम होते म्हणुन गेलो होतो.शाळेसमोरच्या पटांगनावर मुले खेळत होती. याच ठिकानी आमचा रोज सकाळी परिपाठ भरत असायचा.वेगवेगळ्या प्रार्थना म्हणत तो सुरु व्हायचा. मग दिनविशेष , सुविचार , आजच्या घडामोडी अशा काही कार्यक्रमानंतर तो संपत असे.परिपाठाला उशीर झाला तर एका मारकुटया मास्तर चा मार खावा लागायचा. एव्हड्या सकाळी शाळेत जायला पार जिवावर यायचे. थंडीत तर विचारायचेच नाही. पण शाळेत मजा यायची. मस्त मित्र जमले होते. मधल्या सुट्टीमधले खेळ ठरलेले असायचे. अबाधबी हा एकदम फ़ेमस खेळ. कसल्याशा चिंध्या गोळा करून केलेल तो बॉल असा काय लागायचा पाठीत विचारू नका.

कारल्याची सळीभाजी

लेखक जागु यांनी सोमवार, 06/09/2010 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारे जिन्नस: पाव किलो कारली (कारली स्वच्छा धुवुन ती उभी सळ्यांसारखी कापावी चित्रात दाखवल्याप्रमाणे). ४-५ लसुण पाकळ्या कढीपत्ता हिंग, हळद, जिर मसाला थोडा लिंबु रस चविपुरते मिठ १ चमचा साखर २ चमचे शेंगदाणा कुट क्रमवार पाककृती: मिपावर बर्‍याचदा काहीजणांची शब्दांची लढाई चालू असते. म्हणून म्हटल जरा त्यांना शाद्बीक लढाईयुक्त रेसिपी देऊ. सगळ्यात आधी कारली धुवुन घ्या मग त्यांची चिरफाड करुन त्याच्या सळ्या जश्या बटाट्याच्या बाजारात मिळतात त्याप्रमाणे साधारण तेवड्याच आकाराच्या सळ्या करा. आता गॅसवर भांड ठेवा आग लावुन भांड चांगल तापू द्या.

पावसांत वडवानल ! ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी सोमवार, 06/09/2010 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
पावसांत वडवानल ! ! ! बरसत होता श्रावण अगणित, ऋतू प्रेमाचा होता फुलला, विद्युलतेसम प्रकटलीस तू, इंद्रधनूहि स्वागतास अवतरला. पाऊस रिमझिम, तू ओलेती, तन-मन माझेहि ओलेती, केस झटकणे तुझे त्या क्षणी, बरसले अगणित माणिक मोती. उधळीत रंग असे लावण्याचे, आलीगिले तू अवचित मजला, पावसांत जर वडवानल पेटला, मी दोषीन पावसाला.. निरंजन वहाळेकर
काव्यरस

खीर

लेखक भानस यांनी सोमवार, 06/09/2010 05:23 या दिवशी प्रकाशित केले.
तिचे हात एक एक टाका सफाईदारपणे घालत होते. झरझर. एकसारखा. टपोरा. लवकरात लवकर तिला ही दुलई पुरी करून द्यायची होती. शक्य झाले तर आजच. त्या बदल्यात मिळणार्‍या शंभर रुपयात तिच्या जागोजागी फाटलेल्या संसारात निदान मीठ-मिरची-तेलाचे ठिगळ लागले असते. दोन्ही पोरींच्या तोंडात चार दिवस दोन घास पडले असते. दिवसभर मान मोडून पाठीचा काटा पुरा ढिल्ला करून एकदाची दुलई पुरी झाली. जोरदार झटकून तिवर अजूनही लोचटासारखे चिकटलेले धागेदोरे तिने काढले. वरच्या तारेवर दुलई टाकून निरखून पाहू लागली. दुलई सुंदरच झालेली. मऊमऊ. निगुतीने टाचलेली. एकही ओळ वाकडी नाही का एकाही तुकड्याचा तोल ढळलेला.

द्यायचाच आहे तर असा एखादा वर दे माऊली..

लेखक मेघवेडा यांनी सोमवार, 06/09/2010 03:16 या दिवशी प्रकाशित केले.
"श्रीपाद.." आवाज ओळखीचा नव्हता. श्रीपादपंत डोळे चोळत उठून बसले. काळामिच्च अंधार. त्या अंधारात त्यांच्या समोर एक तेजस्वी आकृती उभी होती! ते काही बोलणार इतक्यात ती आकृतीच पुढे बोलू लागली, "श्रीपाद, तू आयुष्यभर माझी नि:स्वार्थ सेवा करीत आला आहेस. तुझ्या या परार्थसिद्ध सेवेने मी प्रसन्न झाले आहे. माग, आज तुला हवा तो वर माग वत्सा!" "माऊली! साक्षात श्री देवी माऊली! खरंच विश्वास बसत नाही!" म्हणत श्रीपादपंतांनी साष्टांग नमस्कार घातला. कृतकृत्य भाव त्यांच्या चेहर्‍यावर उमटले. "आज तुझ्या दर्शनाने जन्माचे सार्थक झाले आहे माते. आता मला आणखी काही नको." "आयुष्यभर स्वतःसाठी काही मागितलं नाहीस.

वाचा आणि शोधा

लेखक यशवंतकुलकर्णी यांनी सोमवार, 06/09/2010 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
१. तुम्ही तुमचं शरीर सोडून कधीच कुठंही जाऊ शकत नाही. २. तुम्हाला वाटते की तुम्ही हुशार आहात, नो!!!! सर्व माणसे मानसिकदृष्ट्या महामूर्ख असतात, येस!!! पण प्रत्येकाचे शरीर हुशार असते. ती एक वेगळी संस्था आहे (इथे वैद्यकिय दृष्टीकोणातून पाहू नये) पुढच्या वेळी नखे वाढतील तेव्हा नजर ठेवा. तुम्ही कधीच सरळ उठून नखे काढायला सुरूवात करीत नाही. आधी हात तुमच्या डोळ्यांसमोर येतो, तुम्हाला नखे वाढल्याचे दिसून येते (हा अक्षरश: शरीराच्या विशिष्ट भागाने दिलेला सिग्नल असतो) आणि मग नखे काढण्याचा विचार करता. ३. मोठ्ठा आवाज होतो तेव्हा, शरीर एकदम दचकते.

रखमाबाई

लेखक प्रसन्न केसकर यांनी रविवार, 05/09/2010 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
मे महिन्यातली अशीच एक रखरखीत कोरडीठाक दुपार. सकाळपासुन रणरणत्या उन्हात दवाखाने, पोलिस ठाणी, क्राईम ब्रँच वगैरे ठिकाणी बातम्यांच्या शोधात फिरुन फिरुन जीव कातावला होता. अनायासे सगळीकडे लंच टाईम सुरु होत होताच म्हणुन म्हणलं जरा आता पोलिस आयुक्त कार्यालयातल्या प्रेसरुम मधे जाऊन पंख्याचा वारा तरी घ्यावा. प्रेसरुम मधे शिरलो तर दोबोले `मेजर' डबा संपवुन हात धुवायलाच निघालेले. त्यांचा सहाय्यक शिपाई राजा आधीच डबा संपवुन फ़ोनवर `राऊंड' घेत बसलेला. मला घाम पुसत प्रेसरुममधे शिरताना पाहुन दोबोले मेजरनी पाण्याची बाटली उचलली अन बाहेर पडले. न सांगताही मला लक्षात आले की मेजर आता कुलरचे थंड पाणी घेऊन येणार.

बंगलोरला धोका बीजिंगचा

लेखक मिसळभोक्ता यांनी रविवार, 05/09/2010 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
काही तथ्ये: १. बंगलोरला दर वर्षी १ लाख नवीन नोकर्‍या तयार होतायत. बीजिंगला पाच लाख. २. बंगलोरच्या घरंच्या किंमती ५ वर्षात दुप्पट झाल्यात. बीजिंगला दोन वर्षात. ३. बंगलोरच्या "आय आय एस सी" सोडल्यास एकाही विद्यापीठातून जगविख्यात लोक निघत नाहीत. बीजिंगला शिंघुआ तर आहेच, पण पेकिंग नॅशनल सारखी उत्तम उदाहरणे देखील आहेत. ४. बंगलोरला इंग्रजी भाषा सर्रास वापरली जाते. बीजिंगच्या इंजिनियर्स ला फारसे इंग्रजी येत, नाही. त्यामुळे बीजिंगच्या इंजिनियर्सना उत्कृष्ट काम करूनच त्यांची जागा मजबूत करायची असते. बंगलोरने आजवर त्यांच्या बोलबच्चनगिरीमुळे ती जागा व्यवस्थित सांभाळली आहे. ५.

ह्युस्टनचा बालकृष्ण मुंबईत

लेखक कवितानागेश यांनी रविवार, 05/09/2010 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
हे वाचा. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6480056.cms ह्युस्टनचा बालकृष्ण मुंबईत 2 Sep 2010, 1519 hrs IST मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई श्रीकृष्णाचा जन्म आणि दहीहंडी हे दोन्ही दिवस देशभर उत्साहात साजरे होतात. हंडी हा बालगोपाळांचा आवडता खेळ. पण अमेरिकेत ह्युुस्टन येथे जन्मलेला व्हिवान कुंतल कोटणीस सध्या मुंबईत दादर येथे आजोळी आला आहे. तेथे त्याच्या आजीआजोबांना हा आपला लाडका नातू बालकृष्णासारखा नटवावा असे वाटले.