Skip to main content

ह्युस्टनचा बालकृष्ण मुंबईत

लेखक कवितानागेश यांनी रविवार, 05/09/2010 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
हे वाचा. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6480056.cms ह्युस्टनचा बालकृष्ण मुंबईत 2 Sep 2010, 1519 hrs IST मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई श्रीकृष्णाचा जन्म आणि दहीहंडी हे दोन्ही दिवस देशभर उत्साहात साजरे होतात. हंडी हा बालगोपाळांचा आवडता खेळ. पण अमेरिकेत ह्युुस्टन येथे जन्मलेला व्हिवान कुंतल कोटणीस सध्या मुंबईत दादर येथे आजोळी आला आहे. तेथे त्याच्या आजीआजोबांना हा आपला लाडका नातू बालकृष्णासारखा नटवावा असे वाटले. आणि बालकृष्ण आणि दहीहंडी यांचे नाते अतुट असल्यामुळे हंडी चार महिन्याच्या व्हिवानच्या हातून फोडण्याचा कार्यक्रमही झाला. बहुधा हा सर्वांत लहान बालकृष्ण असावा ज्याने हा पराक्रम केला. नातवाचे प्रेम आणि उत्साहाला आवर घालणे कठीण असते हेच खरे!

वाचने 2367
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

वॉव्.दॅट्स ऑसम. वॉशिंग्टनचा विठोबा झाला,आता ह्युस्टनचा बालकृष्ण. शिकागोचा शंकर, लॉस एंजेलिसची लक्ष्मी बाकी आहेत.

मटा च्या ह्या बातमीला मी बर्‍याच तिख्खट्जहाल प्रतिक्रिया द्यायचा प्रयत्न केला. पण त्यांनी छापल्या नाहीत! ...म्हटलं, आता आपल्याच अंगणात येउन शिमगा करु!

>>बहुधा हा सर्वांत लहान बालकृष्ण असावा ज्याने हा पराक्रम केला. नातवाचे प्रेम आणि उत्साहाला आवर घालणे कठीण असते हेच खरे बहुधा ही इतिहासातली सगळ्यात क्षुद्र घटना असावी जिने मटात बातमी बनायचा पराक्रम केला. उथळपणाची आवड आणि आचरट बातम्या देण्याचा उत्साह ह्याला मटामधे तरी आवर घालणे कठीण असते हेच खरे.

या बातमीबद्दल कुंतल कोटणीस आणी त्यांचे कुटुंबीय सोडुन इतर कोणालाही काय विशेष वाटावे हेच मला कळाले नाही. ही बातमी देउन मटाने नक्की काय साध्य केले? परदेशस्थ भारतीयांत्याच्या१०-५ दिवसांसाठी भारतात आल्यावर आणि त्यांनी इथले कुठलेही उत्सव साजरे केल्यावर त्याच्या बातम्या होणार की काय आता?

ही बातमी छापायला त्या लोकांनी पैसे दिले असतील, त्याशिवाय असल्या बातम्या छापण्यात काय प्वाइंट असेल???

हल्ली संध्यानंदपेक्षा मटा सरस वाटतो. अजुन काय बोलू? एवढेच बास असावे.