Skip to main content

एक कविता....(हे कवितेचे नाव नाही) पण शीर्षक हवेच...मग काय करा?

लेखक अथांग यांनी गुरुवार, 09/09/2010 05:10 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथमच मिपावर काही लिहु धजत आहे. गेले काही दिवस येथे वाचन करत आहे, प्रतिक्रिया बघत आहे..यावर माझी प्रतिक्रिया अशी की आपण आपले वाचक म्हणूनच रहावे. कशाला उगीच काही पोस्ट करण्याचा आटापिटा? पण आज मनाचा हिय्या करुन माझी पहिली कविता आपणांसमोर ठेवत आहे. तिचे पोस्टमार्टम होवु शकते याची पूर्ण कल्पना आहे. ते झाले तरी कवितेचा "आत्मा" माझ्यापुरता तरी मी सांभाळून ठेवेनच!

शिवराज्याभिषेक

लेखक जिप्सी यांनी गुरुवार, 09/09/2010 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
शिवराज्याभिषेकाचे वर्णन आपण अनेकदा वाचले असेल पण एखाद्या प्रत्यक्षदर्शीकडून यावर लेखन फार क्वचितच झाले असेल. खास महाराजांच्या राज्याभिषेकासाठी निमंत्रित करण्यात आलेल्या एका डच वकीलाने लिहिलेले हे वर्णन.हा वकील वेंगुर्ल्यातल्या डच वखारीतला असावा,त्याने हे पत्र बटेव्हियातल्या (?) आपल्या वरिष्ठास लिहिलेले आहे. त्याचा हा गोषवारा. संदर्भ :- डच रेकॉर्डस्,शिवकालीन पत्रसारसंग्रह खं.२ पुष्कळ दिवस तयारी होऊन जुनच्या सुरुवातीला राज्याभिषेकाची तयारी पूर्ण झाली. ब्राह्मण्,विद्वान व इतर मिळून सुमारे ११ हजार लोक रायगडावर जमा झाले.

खमण ढोकळा

लेखक प्राजक्ता पवार यांनी बुधवार, 08/09/2010 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : डाळीचे पीठ - २ वाट्या बारीक रवा - पाव वाटी हिरवी मिरची,आले , लसुण यांचे वाटण - २ चमचे मीठ साखर - १/२ चमचा तेल - २ चमचे लिंबाचा रस - २ चमचे खायचा सोडा - १/२ चमचा फोडणी - तेल , मोहरी, कढीपत्ता , कोथिंबीर - डाळीचे पीठ , रवा , हिरवे वाटण , मीठ , साखर ,लिंबाचा रस एकत्र करावे. त्यात तेल व गरजेनुसार पाणी घालुन जाडसर असे पीठ भिजवावे.हे मिश्रण अर्धा तास तसेच राहु द्यावे. नंतर त्यात खायचा सोडा घालुन एकत्र करावे. तेल लावलेल्या थाळीमध्ये हे मिश्रण घालुन एकसारखे पसरावे व कुकरमध्ये १५ मिनीटे वाफवुन घ्यावे. थंड झाल्यावर तुकडे कापुन घ्यावेत. तेल ,मोहरी , कढीपत्ता यांची फोडणी वरुन घालावी. कोथिंबीर व ओले खोबरे घालुन सर्व्ह करावे.

आज.........मदर्स डे निमित्त ---- जगातील सर्व मातांना खूप खूप शुभेच्छा ..................

लेखक निवेदिता-ताई यांनी बुधवार, 08/09/2010 22:09 या दिवशी प्रकाशित केले.
आई हा एक शब्द आहे असं म्हणण व्यर्थ आहे कारण त्यात आहे जे वात्सल्य, शब्दात उतरवणं आहे ते अशक्य!!

आशा भोसलेंचा आज वाढदिवस!

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 08/09/2010 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
युवती मना पासून नैना लगाई ले पर्यंत आणि चांदणे शिंपीत जाशी पासून बुगडी माझी पर्यंत अप्रतिहत सहज संचार असलेल्या ह्या सूरसम्राज्ञीला ७७ वर्षे पूर्ण झाली ह्यावर विश्वास बसणे कठिण जाते! आपल्या आवाजातल्या विविधतेच्या जोरावर तब्बल ६७ वर्षे एखाद्या क्षेत्रात उत्तम काम करीत रहायचं म्हणजे खायची गोष्ट नव्हे म्हाराजा! व्यक्तिगत आयुष्यात अनेक चढउतार पचवूनही आशाताईंच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. अनेक मानसन्मान मिळूनही साधेपणा टिकवून आहेत त्या.

शेतकरी गीत: आज सण हाय बैलपोळा

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 08/09/2010 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
शेतकरी गीत: आज सण हाय बैलपोळा
शिंगे घासली बाशींगे लावली माढूळी बांधली म्होरकी आवळली तोडे चढविले कासरा ओढला घुंगुरमाळा वाजे खळाखळा हो खळाखळा आज सण हाय बैलपोळा ||१|| गोंडे बांधले वेसनी घातल्या छमच्या गाठल्या चवर ढाळली शिक्के उठविले गेरू फासला घुंगुरमाळा वाजे खळाखळा हो खळाखळा आज सण हाय बैलपोळा ||२|| नाव लिहीले झेंडूहार घातला झुली चढविल्या पैंजण घातले पट्टा आवळला फुगे बांधले घुंगुरमाळा वाजे खळाखळा हो खळाखळा आज सण हाय बै
काव्यरस

सुखाचे स्वागत...

लेखक विदेश यांनी बुधवार, 08/09/2010 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
दारात थबकलेल्या सुखाचे ये म्हणून स्वागत केले ; उत्साहाने उंबरठयावर पाऊल त्याने ठेवले ! आत येता येता सुख..तिथेच घुटमळले कुणास ठाऊक काय झाले ? सुखाचे पाऊल अडखळले ! पाठीशी वळून जरा मी डोकाऊन पाहिले- तेव्हा कुठे माझ्या सारे लक्षात आले ! एवढे मोठे माझे घर दु:खानेच भरले- सुखाच्या बोटालाहि स्थान नाही उरले !!

माझ्या बागेतील फुले

लेखक जागु यांनी बुधवार, 08/09/2010 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
हा आहे सोनटक्का. ह्याचे मुळ आल्यासारखे असते. एक रोपटे किंवा मुळ लावले तरी ह्याच्या बाजुला त्याची पिल्ले भराभर तयार होतात. मोहक सुगंधाने सोनटक्का स्वतःकडे आकर्षीत करुन घेतो. बाजारात पानात बाधुंन ह्याची फुले विकायला येतात पण बरेचदा ही अर्धवट उमललेलीच दिसतात. सोनटक्क्यामधे पिवळा रंगही असतो. पिवळ्या रंगाचे फुल आकाराने थोडे छोटे असते. हा आहे डेलीया माझ्या बागेतील नविनच पाहूणा. आमच्या जवळच्याच नर्सरीतुन घेतला. ह्यामध्ये मला पिवळा किरमिजी रंगही दिसला.