Skip to main content

आज.........मदर्स डे निमित्त ---- जगातील सर्व मातांना खूप खूप शुभेच्छा ..................

लेखक निवेदिता-ताई यांनी बुधवार, 08/09/2010 22:09 या दिवशी प्रकाशित केले.
आई हा एक शब्द आहे असं म्हणण व्यर्थ आहे कारण त्यात आहे जे वात्सल्य, शब्दात उतरवणं आहे ते अशक्य!!

वाचने 2466
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

अनुमोदनाचा प्रतिसाद! --(२) असुर

मदर्स डे मे महिन्यात होऊन गेला की? हा कुठला (अनधिकृत) मदर्स डे? सुचना - अनधिकृत हे विशेषण डेचे आहे, मदर्सचे नाही!

In reply to by सुनील

आज पिठोरी अमावास्या असावी. मी कॅलेंडर चेक केलेले नाही. त्यानुसार आज मातृदिन आहे. असो. आमच्या मातोश्रींना शुभेच्छा.

In reply to by प्रियाली

अस्सं होय? मग सरळ मातृ दिन म्हणावं की? नको तिथे भाषांतर कशाला?

In reply to by प्रियाली

होय होय कालच मी वाचत होते . आज पीठाच्या सप्तमातृका बनवतात वगैरे माहीती आहे आंतरजालावर उपलब्ध. आज दुर्गेची देखील पूजा करतात वाटतं.

आईचे, बापाचे, मित्रांचे, बायकांचे त्यांच्या जिवंतपणी आम्ही दिवस घालत नाही. कोणाचे प्रेम दाखवून द्यायचे असेल तर, मी ते 'वेळोवेळी', गरज असेल तेव्हा, तिथल्यातिथेच दाखवून देतो. एखाद्या विशिष्ट दिवसाची गरज वाटत नाही. मला कोणताही दिवस चालतो. हलके घ्यालच : आई वडिलांना पायातील वाहन बनविण्यासाठी अंगावरचे कातडे देखील काढून देईन, पण सध्या माझे आई-वडील एका नामांकित कंपनीचे जोडे वापरतात. त्यामुळे तूर्तास अंगावरची कातडी बचावून आहे. बरं मी जर का आज आईला, मला जन्म दिला म्हणून शुभेच्छा वगेरे द्यायला गेलो तर आईकडूनच एक सणसणीत कानाखाली बसेल.

हे हे हे हे... असेच म्हणतो! (माझी आई बाटा तर बाबा वुडलँड वापरतात)