Skip to main content

गुपित !

लेखक अथांग यांनी सोमवार, 27/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांचे किती-कसे, उभे आडवे वळसे.. भाव ओथंबले त्यात, ओठीं काही येत नसे ! हो, डोळे बोलतात कधी, भाषा एक साधी-सुधी.. ज्याची त्याला समजावी, कुणी-कुण्णी नको मधी ! काही हलके इशारे, उभ्या अंगाला शहारे... भर उन्हातही जणु, मनभर गार वारे ! क्षणी असे हरवणॆ, आणि पुन्हा गवसणॆ... तुझी-माझी लपाछपी, सार्‍या गावाचे बहाणे !!

ईंग्लिश व्याकरणाबाबत मदत हवी आहे Expla'i'nation का नाही?

लेखक शानबा५१२ यांनी रविवार, 26/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
'explain' ह्या क्रीयापदाला '-tion' हा प्रत्यय(suffix) लावताना 'explaination' असे न होता 'explanation' का होते? 'n' च्या आधी 'i' हे vowel असल्यामुळे एखादा नियम लागु झाला असावा अस वाटत्,पण गुगलवर काही माहीती मिळाली नाही.म्हणुन ईथे आपणास विचारतो आहे. मला खुप दीवसांपासुन हा प्रश्न होता.मधे हा प्रश्न मनातुन अनुत्तरीतच(?) राहुन निघुन गेला,पण आज पुन्हा लक्षात आला तेव्हा रहावले नाही. कृपया माहीतीगारांनी शंका दुर करावी.

हिंदूर

लेखक सन्जोप राव यांनी रविवार, 26/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मिलिंद फणसेंची अप्रतिम सिंदूर आणि आसपासच्या समाजात साचत चाललेली समृद्ध अडगळ यांची मनात गल्लत झाल्याने उमटलेले हे काही वेडेवाकुडे नि:शब्द होत गेलो, मजबूर होत गेलो हिंदू वाचुवाचूनी हिंदूर होत गेलो ठिणग्या विझून गेल्या, पिकल्या जरी मिशाही हसले पुन्हा नेमाडे मी धूर होत गेलो धारा न अमृताच्या पानेच ही सहाशे डोळ्यात नीज येता मगरुर होत गेलो ही कोसलाबिढारे वाचून पाठ होती 'हिंदू' जुन्या बाजारी - मी शूर होत गेलो स्मरणातुनी पुसेना पुसता कथा 'खंड्या'ची काहीच वाचवेना, मी दूर होत गेलो
काव्यरस

एका नव्या सभ्यतेची ओळख.

लेखक मराठमोळा यांनी रविवार, 26/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, एकदा असाच मनात विचार आला, आपण काय जपुन ठेवतो बरं? पैसा? माणसं? सुखं? ईतर काही? नाही.. मग काय? तर आठवणी. ज्या कायम सोबत राहतात, अगदी मरेपर्यंत. बाकी सगळं क्षणिक. नाही का? ************************************************** आज नविनच लोकांना भेटलो, कधी विचारच काय तर कल्पना सुद्धा केली नव्हती. एका मित्राला भेटायला काय गेलो आणि एक नविन विश्व पाहुन आलो. शनिवार रात्र म्हणुन पार्टी चालु होती तिथे, नविन चेहरे, नविन लोकं, खरं तर मित्राला बरोबर घेउन लगेच निघायचे होते तिथुन पण हे लोकं एवढे आग्रही होते की मला तिथे तास दोन तास थांबायला भाग पडलं. पहिल्यांदाच मार्गारिटा प्याली, आवडली.