Skip to main content

पुरुषांचा छळ आणि आत्महत्या : ताजी बातमी

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 28/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
पुरुषांचा छ्ळ किती होतो असा प्रश्न वारंवार विचारला जातो. सकाळ सारखी वृत्तपत्रे अशा छळाची दखल घेत आहेत हे विशेष. ही बातमी वाचा... http://72.78.249.107/esakal/20100928/4868143190742493441.htm

आयुष्यातील वळणे....

लेखक अथांग यांनी मंगळवार, 28/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यातील वळणे, कधी पाऊस, कधी जळणे... काही नाती ओली-हळवी- काही फक्तं दळणॆ ! कित्ती सारे मोसम आलेले, भोगलेले, क्वचित – उपभोगलेले... काही फुले फुललेली तनात – काही करपून गेलेले ! तरी पण पुढच्या क्षणात, क्षणातील एक-एक कणात... खूप काही जपण्याचे – पण मनातल्या मनात ! आयुष्यातील वळणे, कधी पाऊस, कधी जळणे... काही कोडी सुटल्यासारखी, अन.. काही कधीच न कळणे... कधीच न कळणे !!!

कशे कावळे येती आणिक...

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 27/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिपावरचे धागे कावळ्यांनी शुचिर्भूत झालेत, त्यामुळे आमच्याही डोक्यात कवकवाट सुरु झाली आणि आम्ही एका अप्रतिम गाण्याचे श्राध्द घालून बसलो.. कशे कावळे येती आणिक पिंड शीवूनी जाती पंध्रवड्याची अंगत पंगत पितरांसंगे खाती साप काल मज स्वप्नी दिसला फणा काढुनी उभा राहिला जरा दचकुन जाय उठोनी काळोखाच्या राती सकाळ होता मिपा उघडले मुखपृष्ठावर काक पाहिले कळली नंतर जलावरती मज पितरांची महती लगे एक मी भटजी धरला शीधा दक्षीणे त्याला पुजला उध्दरली मंत्रांनी त्यांने तीन पिढ्यांची नाती अनुभव तुमचा सांगा मजला ह्यासाठी मी धागा रचीला फुटकळ धागे काढत फिरतो अशीच माझी ख्याती

घाल घाल पिंगा वा-या - कमलाकर भागवतांना विनम्र आदरांजली..

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 27/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मी प्रभादेवी येथील जी एम ब्रेवरीज मध्ये नौकरीला असतानाची गोष्ट.. सर जिमि विल्यम आल्मेडा हे आमच्या कंपनीचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक.. तिथे त्यांना भेटायला नेहमी एक वयस्कर गृहस्थ यायचे.. त्यांचं नाव कमलाकर भागवत. ते जिमीसाहेबांचे दोस्त.