Skip to main content

शर्यत

लेखक सुवर्णमयी यांनी मंगळवार, 28/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
अमरचे डोळे ' रिसर्च टुडे 'मासिकामधल्या एका बातमीवर खिळले होते- जुलै २००७ उंदरांना जवळ जवळ ३५ कॉन्सन्ट्रेटेड बाटल्या खास द्राक्षासव पाजले की त्यांचे आयुष्य वाढते असे असे पाहणीत आढळले आहे. उंदरांची पाहणी केली असता त्या खास द्राक्षासवातील काही घटक विशेषतः 'लाइफसेवर ' हे आयुष्यमान वाढवण्यात सक्रिय असतात असे सुद्धा एका अभ्यासात आढळले आहे. या ओळी वाचूनच अमर थबकला. त्याच्यापेक्षा अधिक वेगाने कोणीतरी हाच धागा पकडून संशोधन करत होते तर...

माहिती तंत्रज्ञानातील धडाडीची ५ वर्षे

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 28/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आताच ही दिव्य पाटी आमच्या मेल बॉक्स मध्ये ढकलपत्राद्वारे येउन पडली. ती तुम्हा मिपाकरांसमोर ठेवत आहे. धोरणात बसत नसल्यास उडवली तरी चालेल. अशी ही पाटी--

ओले अश्रू

लेखक स्वप्निल मन यांनी मंगळवार, 28/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
कधी येशील तू? मी तुझी वाट बघतोय आभाळ भरून आलंय ढगही गडगडताहेत माझ्या मनातला टाहो जणू तेच व्यक्त करताहेत बघ, त्याचा चेहरा कसानुसा झालाय तु नाही आलीस तर लवकरच ते रडायला लागेल त्याच्या अश्रूंनी मलाही भावूक करेल पण मी रडणार नाही त्याला साथ देणार नाही आणि जर आलच रडायला तर सरळ पावसात भिजत राहीन कोणालाच माझे अश्रू दिसू देणार नाही कारण माझ्या रडण्याचे बोल तुला लावलेलं मला सहन होणार नाही
काव्यरस

मुंजा

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 28/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
"दोन चार दिवसाकरता सर्व बाजुला ठेव आणि जाउन ये. पण करु काय तिकडे जाउन? "माहीत असलेले काहीही करु नकोस. फक्त जा. जे होइल ते आत्तपर्यंत जे झाले त्यापेक्षा वेगळे असेल." अरे बाबा, डोक्यावर ४ कलर ब्रोशर ची डिलीवरी आहे. ते सोडुन ३ दिवस....? एक्झिबिशन ची डेड लाइन आहे." " विझ्युअलायझेशन झाले आहे ना?तु फायनल कॉपी ओके कर. प्रिंटींग मी बघुन घेतो. प्रेस ला अ‍ॅडवान्स दे म्हणजे ऐनवेळी नडणार नाहीत". नंतर गेले तर चालणार नाही का? "आठ दिवसानी बँगलोर. मग २५ डीसेंबर ला मुंबई. जाणार का तु बॅगलोर ला.?" नको. च्यायला यायला जायला ३ दिवस. पण.. "आता पण बिण काहीही नाही. हे ठरले. आर्टीस्टला दोनशे रुपये जास्त दे.

कर्मकांडांमध्ये तत्कालीन ब्राम्हणांचे हितसंबंध-- एका एकारान्ती कोकणस्थ ब्राम्हणाचे मत

लेखक क्लिंटन यांनी मंगळवार, 28/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सध्या मिपावर पितृपंधरवड्यावर लेख येत आहेत त्यातच माझीही एक भर. पण विषय केवळ पितृपंधरवड्यात मर्यादित नाही तर कर्मकांडांमध्ये पूर्वीच्या ब्राम्हणांचे हितसंबंध कसे गुंतले होते असे माझ्यासारख्या ’एकारान्ती कोकणस्थ ब्राम्हणाला’ काय वाटते हा आहे. हा लेख ’जातीय तेढ’ वाढविणारा आहे असे वाटल्यास जरूर त्यात बदल करावेत किंवा लेख पूर्णपणे काढावा. त्या परिस्थितीत मी लेख केवळ माझ्या ब्लॉगवरच लिहेन. मिपावर भिक्षुकी करणारे कोणी आहे का याची कल्पना नाही आणि असले तरीही त्यांच्याशी वैयक्तिक कोणतेही वैर नाही. पण या institution विषयीची माझी मते या लेखात लिहिली आहेतच.

मीपावरती मी पितरांचा कौल काढला नवा

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 28/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.

काल रात्री घासूगुर्जीचा स्वप्नांचा कौल  आणि आमच्या कशे कावळे येती आणिक...या विडंबनाला शुचितैनि दिलेला प्रतिसाद वाचून झोपलो, पण नेहमी सारखी गाढ झोप काही येईना, मध्यरात्री