लतादिदींच्या वाढदिवसानिमित्त्य अनेक लेख वाचण्यात आले आणि अनेक गाण्यांचा आस्वादही घेण्यात आला.
१९६४ च्या सूमारास लतादिदींना गीतेच्या अध्यायावर गायन करण्यासाठी एका संगितमंडळीने सांगितले. लतादिदी आपल्या प्रघातानूसार त्यावर चिंतन, मनन आणि वाचनाची तयारी सुरु केली.
उच्चारावर लतादिदींचे खास लक्ष असते. उच्चारात कोणताही दोष असु नये यासाठी त्यांनी गोनिंदा यांना तातडिने येण्यासाठी पत्र पाठविले.
गोनिदा यांच्या देखरेखीखाली लतादिदी यांच्या सरावासाठी सुरवात झाली. लता एकनंतर एक असे अध्याय वाचत आणि गोनिंदा त्यात र्हस्व आणि दिर्घाच्या उच्चारात काही त्रुटी राहत तर नाही ना यावर लक्ष देत.