पितृपक्षातली स्वप्नं, योगायोग व श्रद्धा
डिस्क्लेमर - या लेखांत श्रद्धांची चिकित्सा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांना अशी चिकित्सा केलेली मुळात आवडत नाही, किंवा अशा चिकित्सेने त्यांच्या विश्वासाला तडा जाईल असं वाटतं त्यांनी हे लेखन वाचू नये. ज्यांना अशा डिस्क्लेमरची गरज वाटत नाही, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करावे.
आपला एखाद्या गोष्टीवर विश्वास कसा बसतो? एका शब्दात उत्तर द्यायचं झालं तर 'अनुभवातून' असं म्हणता येईल. अगदी अडीच वर्षाच्या मुलालासुद्धा 'ब्लेडला हात लावू नकोस, त्याने लाल बाऊ होतो' हे सांगून, त्याच्याकडून दहावेळा वदवून घेतलं तरी त्याचा हात ब्लेडवरून फिरायला शिवशिवतोच.
मिसळपाव