Skip to main content

वारियाने कुंडल हाले

लेखक शरद यांनी गुरुवार, 07/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
श्री.ज्ञानेश्वर,नामदेव व तुकाराम यांच्या पदांनंतर आपण आज श्री. एकनाथ महाराज यांचे एक पद घेऊन संतांच्या कविता या मालिकेचा निरोप घेऊ. एकनाथांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या लिखाणातील विविधता. गौळणी,भारुड आदी लोकवाङ्मय लिहावे तर एकनाथांनीच. इतर कवी या क्षेत्रांत त्यांच्या जवळपासही येऊ शकत नाहीत. त्यांची एक अतिशय लोकप्रिय गौळण म्हणजे : वारियाने कुंडल हाले डोळे मोडित राधा चाले ! फ़णस जंबीर कर्दळी दाटा हाती घेऊन नारंगी फ़ाटा ! हरि पाहून भुलली चित्ता राधा घुसळी डेरा रिता !

आग-ए-नफरत

लेखक सद्दाम हुसैन यांनी गुरुवार, 07/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
तोबा तोबा ,ये मै क्या पढ रहा उई ?? ? वो तात्यासाब ने क्या चिंगारी लगाया पुरा मिस्सलपाव पाकिस्तानी लोगांके पिच्छु हँडवॉश कर के भागरां मिया .. ए टु झेड पाकिस्तानी पे अब नफरत की आग उगळ रहे सब मियां लोगां ! क्या इतना एनर्जी है हम मे ? तो फिर आपण आपल्या देशातल्या गद्दारोंके प्रति इतने आक्रमक क्यो नही है उई? खैर वो तो गैर ही थे .. इधर अपने ही पिठ मे खंजर खुपस रहे है उई... ये कलमाडीका बच्चा (म्हणजे सुरेशंच) अगले चुनाव मे फिर से निवडके आइंगा ... लालु बरसोंसे जितता आरां उईं ... ये राजकारनी लोगां पाकिस्तान का कांडी डाल्लेते और हम लोगां उनको गालि देते बैठते :) कुछ कामां नही क्या हम लोगांको? आँईं ?

भुक

लेखक शानबा५१२ यांनी बुधवार, 06/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
ही घटना त्याच काळातली ज्याबद्दल मी काल लिहल आहे.काल लिहलला लेख ह्याच बाबतीत लिहायचा होता.पण दारु कींवा तत्सम नशा करुन माणुस भरकटतो.तसा मी काही कारणांमुळे भरकटलो.म्हणुन गाडीला वेगळेच वळण देउन एका वेगळ्याच कोप-यात थांबवुन टाकली.:) लहानपण आठवल की मला राग जास्त येतो.मी तसा लहानपणापासुन रागीट व माणुसघाण्या असल्याने मला जग व त्यात घडणा-या घटना एके ठीकाणी शांत उभा राहुन बघायला आवडतात.त्यात सहभागी होउन 'सामाजिक प्राणी' बणने(?) मला कधी जमले नाही.नाही माझ्यात मीपणा नाही हे ह्यासाठी सांगतोय की आता मला ज्या घटनेबद्दल (ह्याला घटना म्हणावे का ही शंका आहे,पण दुसरा पर्यायी शब्द मला माहीती नाही) बोलायचे आहे त्

तुझं माझं घर...

लेखक जयवी यांनी बुधवार, 06/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
तुझं माझं घर...एक झोका कधी निळ्याशा ढगांत, कधी पाचूच्या बनात. तुझं माझं घर.... एक फुलबाग कधी प्राजक्ती सडा कधी धुंद केवडा. तुझं माझं घर ... एक चांदणं कधी टिपूर टिपूर कधी गंधाळ आतूर. तुझं माझं घर... एक पाऊस कधी झिम्माड झिम्माड कधी कोसळ द्वाड. तुझं माझं घर.... एक मैफिल कधी तुझिया सुरात कधी माझिया तालात. तुझं माझं घर ... एक देव्हारा शांत समई प्रकाश पराकोटीचा विश्वास जयश्री अंबासकर
काव्यरस

संघ आणि सिमी सारखेच : भावी पंतप्रधान राहुलजी यांच्रे परखड बोल

लेखक हुप्प्या यांनी बुधवार, 06/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या एकमेव राजघराण्यातील एकमेव राजपुत्र, युवराज माननीय श्री. राहुलजी गांधी यांनी असे म्हटले आहे की रा. स्व संघ आणि सिमी यात फार फरक नाही. http://72.78.249.125/esakal/20101006/4905023441473910304.htm हे विचार मननीय आहेत.

शेयर बाजारच्या खरेदी विक्री करिता मनीवर्क्स्४मी ह्याची मदत घ्यावी का.

लेखक सुकामेवा यांनी बुधवार, 06/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
कालच मला एक विरोपपत्र आले होते, म्हणून सहज मी moneyworks4me.com ह्या साईट वर जाऊन त्यांचा डेमो पाहिला. कृपया तुम्ही सुद्धा डेमो अथवा तुमच्या अनुभवावरून सांगू शकता याचा उपयोग आहे का नाही ते. तुम्हाला काय वाटत ४००० रु. भरून ह्याच्या सुविधा घ्यावा का?

कधी कधी

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 06/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी आयुष्यातल्या दिवसांचे गणित कळतच नाही. कधी कधी सगळं कसं एकाच धाग्यात गुंफल्यासारखं घडत असतं किंवा कधी कधी काहीच घडत नाही बरेच दिवस; नुसतेच दिवस पळत असतात. सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे कॅलेंडरची पाने बदलावीत त्याप्रमाणे दिवस उडत असतात. देवासमोरच्या आरतीच्या ताटात कापराच्या वड्या भर्रभर्र जळाव्यात आणि काही क्षणांतच तिथे फक्त काळपट काजळी रहावी किंवा गॅसवर ठेवलेल्या कढईतले पाण्याचे थेंब काही क्षणातच नाहीसे व्हावेत तसं काहीतरी आयुष्यातल्या दिवसांचं होतं कधी कधी. कधी कधी काही दिवस उगीच सगळं बिघडत जातं. अगदी साध्या-साध्या गोष्टी डोक्याला ताप देतात.

तुझ्या उंबऱ्याची माती

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी बुधवार, 06/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
तसं पाहिलं तर सत्शील व्यक्तिंनी उंबरा ओलांडू नये असे म्हणतात. त्यामानाने तुझा उंबरा फारच मोलाचा. जणू एखादी लक्ष्मणरेखाच. ती ओलांडली की माणसाने सद्गुणांना सोडले असे मानतात. वर्षअखेरीस तुझ्या उंबऱ्‍याच्या अलिकडे अगणित सद्गुणांची भली मोठी रास साठलेली असते. ती आम्हां 'अ'शीलवंतांना खुणावते. त्या राशीने भारीत झालेली मूठभर माती जरी मिळाली तरी उंबऱ्‍या पलिकडे जाऊन केलेल्या कुकर्मांचे प्रायश्चित्त मिळाल्यासारखे वाटते. ती दिव्य मृत्तिका आम्ही ढोल ताशे बडवित वाजत गाजत तुझ्याच वस्तीतून आमच्या ग्रीनलाईटच्या दुनियेत आणतो.