Skip to main content

मी पाहीलेले मृत्यु

लेखक आप्पा यांनी शनिवार, 09/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मा़झ्या आयुष्यातला एक प्रसंग. साधारणतः १९७७ किंवा ७८ ची घटना असावी. मी एका प्रथीतयश रुग्णालयात नोकरीला लागलो होतो. ठाण्यातील पहीलीच नोकरी. ऑपरेशन थियेअटरला मदतनिस होतो. एक रुग्ण ट्रेनमधुन पडला होता. पाय फ्रॅक्चर होता. त्याचे ऑपरेशन ठरले. अती विशाल देह. डॉ.नी त्याच्या कमरेत एक इंजक्शन देऊन त्याचा कमरेखालील भाग बधीर केला. पायाचे हाड जोडले. हाडामध्ये स्टील रॉड टाकला. ऑपरेशन पुर्ण झाले. पेशंट शुध्दीवरच होता. त्याचे पायावर प्लॅस्टर घालण्यास सुरवात झाली. डॉ.नी रुग्णाला सांगीतले तुझे ऑपरेशन यशस्वी झाले. रुग्ण डॉ.ना थँक यु. म्हणाला.

राजगड

लेखक केदार बर्वे यांनी शनिवार, 09/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मि.पा.वरच्या सर्व मित्रानो आणि मैत्रिणिनो, नेहमी प्रमाणे शनिवारी सुटी होती आणी काय करायचे असा ? होता.

***जगदंबा ***

लेखक मदनबाण यांनी शनिवार, 09/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आज ठाण्याच्या टेंभी नाक्याला असणार्‍या देवीच्या दर्शनाला जाउन आलो, आणि देवीची प्रसन्न आणि मोहक मुद्रा टिपुन आलो... :) विशेष :--- हा धागा गणपा शेठला समर्पित केला आहे, कारण मी त्याला सांगितले होते की जेव्हा केव्हा मला शक्य होईल तेव्हा मी या देवीचे फोटो जरुर काढीन...आज तो योग आला.

तव नयनांचे दल हलले ग

लेखक शरद यांनी शनिवार, 09/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आजपासून मला आवडलेल्या काही कवितांची ओळख करून देत आहे. तेव्हा या कविता किमान पन्नास वर्षांपूर्वीच्या असणार हे तर आलेच. पण चांगली कविता नेहमीच ताजी तवानी असते ( हे माझे मत !) सुरवात श्री. बा.भ.बोरकरांच्या एका भावकवितेपासून करू. तव नयनाचें दल हललें ग कवीवर्य बा.भ. बोरकर हे बालकवींप्रमाणेच निसर्गात रंगणारे. त्यामुळे त्यांची एक कविता द्यावयाची म्हटले तर त्यांच्या अनेक निनांतसुंदर निसर्गकविता समोर येतील. पण आज मी आज एक भावकविता देत आहे. हीच का ? तर तुमच्या आवडत्या कवीच्या अनेक कविता तुम्हाला प्रिय असल्या तरी दोन चार तुमच्या स्वत:च्या असतात. त्या नेहमी वाचण्याकरिता नसताच मुळी.

दवाखान्यातील दोन प्रसंग - एक अनुभव

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शनिवार, 09/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
चार दिवसांपूर्वीच माझ्या सात महीन्यांच्या मुलीला फणफणुन ताप आला होता.नुकतेच प्रवासावरुन परत बेंगलोरला आलो होतो आणि येतानाच जाणवले की लेकराला ताप भरला आहे.पण प्रवासाचा शीण असेल आणि थोड्या विश्रांतीनंतर तिला बरे वाटेल असे वाटले.कंपनीमध्ये अगोदरच प्रोजेक्टची डेडलाईन जवळ आल्याने आणि बॉसनेही यांनंतर कृपया रजा घेऊ नको अशी विनंती करुन रजा दिल्याने त्या दिवसाचीही रजा टाकणे मला पटले नसते म्हणुन प्रवासावरुन आल्या आल्यावर पटापट आवरुन कंपनीमध्ये गेलो.कंपनीत जाऊन दोन-तीन तास झालेच नसतील तोवर बायकोचा फोन आला कि पटकन घरी या मुलीला १०३ टेम्परेचर आहे.बॉसला सांगुन लगोलग निघालो.डॉक्टरचे क्लिनिक ५-३० ला उघडते.

चुकुन आलेलं ईमेल : लाँग टाईम नो सी ~

लेखक ऋयाम यांनी शनिवार, 09/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
काल मला एक ईमेल आलं. कोणा अनोळखी माणसाकडुन होतं. "काय माहित?" म्हणुन दुर्लक्ष केलं काल, पण आज त्यावर हे उत्तरही आलेलं दिसलं म्हणुन इथं पेस्टतोय.... ईमेल १ : --------------------------------------------------------------------------------------------- Subject : नमस्कार. लाँटानोसी. :) Text : काय रे नार्‍या? कसा आहेस? :) लाँगटाईमनोसी रे... :( कसा चाल्लाय जॉब? कसं आहे शेड्युल? आणि तुझ्या 'ट्रॅव्हल कंपनी सुरु करायचं' कुठपर्यंत आलं? व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या जमान्यात तुझा 'फिरण्याचा छंद, पार बंद' झालं असेल नाही!? मी खरंच वैतागलोय रे. जॉईन झाल्यापासुन तेच एक मोनोटोनस काम.

कोहम! कोहम!

लेखक मराठमोळा यांनी शनिवार, 09/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
दहावीत असताना टायटॅनिक पाहिला होता, ईंग्रजी अ‍ॅक्सेंट तेव्हा तेवढा कळत नव्हता, पण आज पुन्हा अचानक पाहिला. मनात अनेक विचार उठले, कल्लोळ जाहला... माजला.... डोकं काम करेनासं झालं... का? कुणास ठाउक... काही काही वाक्ये मनाला स्पर्शुन नाही तर घासुन गेली.. ओरखडली.. इतके विचार कल्लोळ माजवुन गेले.. त्यातलाच एक विचार. (he exists in my memories).. अप्रतिम. त्यावरुन सुचलेलं काहीसं. माणसं... एखादी कुत्री मांजरी मेली तर कदाचित दुख: होणार नाही, पण एखादा रोज दिसणारा भिकारी अचानक गेला तर मनाला हुरहुर लागते. का? कितीही वाईट असो, मित्र, नातेवाईक कोणीही, पण एक नातं असतं जे ओढतं, जवळीक साधतं ते का?

पुन्हा क्रांती

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 09/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
स्वार्थाचा कल्लोळ प्रेमाचा दुष्काळ स्नेहाचा अकाल चोहिकडे हिंसा आणि क्रोध धर्म भेदाभेद बुद्धाला निर्बुद्ध केले आम्ही रोज नवे पक्ष त्यांचे नवे झेंडे प्रत्येकाचे दांडे मजबूत क्रांतीबिंती काही होणारच नाही ऐसे काहीबाही वाटे मज कुत्र्याचे शेपूट कायम वाकडे करणारे वेडे सरळ ते होईल होईल मुठी वळतील मेलेला उठेल चितेतूनी चितेच्या या ज्वाला होतील मशाल तख्त हादरेल माजोरडे रयतेचे राज्य रयतेच्या हाती स्वप्नामध्ये क्रांती केली हो मी....!!!
काव्यरस

जोवरी आहे जीव, तोवरी घ्या रामराम

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 09/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
जोवरी आहे जीव, तोवरी घ्या रामराम
(आज नाशिकचे आमदार डॉक्टर वसंत पवार यांची अंत्ययात्रा बघीतली. त्यांच्या नविन पंडीत कॉलनीच्या हॉस्पीटलाच्या शेजारच्या बिल्डींगमध्येच माझ्या कंपनीचे ऑफीस आहे. मी नाईट शिफ्ट करत होतो. ऑफीसमधल्या काचेमधून त्यांच्या अंत्ययात्रेचा सोहळा पाहत होतो. त्याचवेळी खालील कवीता सुचली. डॉ. पवारांना श्रद्धांजली.
काव्यरस