Skip to main content

बुठ्ठी

लेखक अज्ञात
शुक्रवार, 15/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
माझी ती पहिलीच नोकरी होती. त्यावेळी मी मेडिकल इलेक्टॉनिक्स या क्षेत्रात काम करत होतो. मी ज्या कंपनीत काम करत होतो, ती कंपनी ऑपरेशन थिएटर व आयसीसीयुला लागणारी इलेक्टॉनिक मशिन पुरवायची. माझ काम होत, त्या मशीनची देखभाल करणं व ही मशीन कशी वापरायची त्याच ट्रेनिंग देणं. त्यामुळे हॉस्पिटलशी सतत संपर्क यायचा. असाच एकदा केईएम्‌ मधुन सकाळीच फ़ोन आला, एक ऑपरेशन चालू होणार होतं व त्यांना आमच्या कंपनीनी दिलेल्या "बलुन पंप" या मशिनची गरज लागणार होती. त्यावेळी हे मशिन नुकतच या हॉस्पिटलनी विकत घेतलेल होत. ते कस वापरायच याचं ट्रेनिंग पूर्ण दिलेल नव्हत.

अभिनंदन...

लेखक अवलिया
शुक्रवार, 15/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
होईल की नाही, झाले तर कसे होईल, कुणी भाग घेईल की नाही आणि अशाच अनेक वादांच्या भोवर्‍यात सापडलेली १९वी राष्ट्रकुल स्पर्धा एकदाची पार पडली. केवळ पारच पडली नाही तर भव्य दिव्य स्वागत आणि सांगता समारोह, भारतीय स्पर्धकांची उत्कृष्ट कामगिरी आणि इतर अनेक भुषणास्पद गोष्टींमुळे ही स्पर्धा कायम स्मरणात राहिल. सर्व स्पर्धकांचे, आयोजकांचे, भारताचे आणि पर्यायाने आपल्या सर्वांचे अभिनंदन ! भारताचा तिरंगा असाच दिमाखात फडकत राहो ही सदिच्छा !! जय हिंद !!

यूपीएससी साठी 'मराठी साहित्य' विषयाचे मार्गदर्शन हवे आहे (तत्काळ).

शुक्रवार, 15/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्र / मैत्रीणींनो.. आमची एक बेस्ट फ्रेंड केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परिक्षा या वर्षी देऊ इच्छिते. तीने सदर परिक्षेसाठी मराठी साहित्य या विषय मुख्य परिक्षेकरता वैकल्पिक म्हणुन घेण्याचे ठरवले आहे. तिचे माध्यमिक शिक्षण गोरेगाव, मुंबई इथल्या अ. भि. गोरेगावकर शाळेत झाले आहे. तिचे मराठी साहित्याचे सुरवातीपासुन म्हणाजे अगदी शालेय जीवनापासुन वाचन अफाट आहे. तिने मला अशी विचारणा केली आहे की, उपरोल्लिखित परिक्षेकरता मराठी साहित्य या विषया करता कोणी अनुभवी आणि एक्सपर्ट मार्गदर्शक आहे का?

सुरंगीची वेणी, ज्यूटची पिशवी आणि गोल्डफिशचा साबण

लेखक अरुंधती
शुक्रवार, 15/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
"गोव्याहून तुझ्यासाठी काय आणू? " माझा हा प्रश्न आमच्या नातेवाईकांना, परिचितांना एव्हाना तोंडपाठ झाला होता. आयुष्यातील पहिलीवहिली शाळेची लांब पल्ल्याची सहल. माझा उत्साह नुसता ओसंडून वाहत होता. जो भेटेल त्याला ह्या आगामी गोवा सहलीचे इत्यंभूत वार्ताकथन होत होते. आम्ही काय काय स्थळे पाहणार, कोणकोणत्या बीचवर जाणार, कसा प्रवास करणार.... एक ना दोन! आणि सर्व स्वयंस्फूर्त माहितीची गाडी "तुझ्यासाठी काय आणू? " ह्या प्रश्नावर येऊन थांबायची. अर्थात मला नाही तरी इतरांना माझ्या आईवडीलांच्या खिशाची काळजी होती म्हणा! त्यामुळे बहुतेक सगळेजण "तुला आवडेल ते आण," अशा जुजबी बोलण्यावर माझी बोळवण करत होते.

धारयते सः धर्मः

लेखक शरद
शुक्रवार, 15/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
धारयते स: धर्म: श्री. यनावाला व त्यांच्या विचारसरणीचे लोक थोडा एकांगी विचार करत असतात असे वाटते. पहिली गोष्ट म्हणजे धर्म व कर्मकांड यातील फरक ते लक्षात घेतातच असे नाही. चतुर्थीला चंद्रोदयानंतर जेवण, उपासाला चालणारे/न चालणारे पदार्थ, श्राद्धाला करावयाचे पिंड, इत्यादींना विरोध करतांना ते या गोष्टी म्हणजे धर्म नव्हे या कडे दुर्लक्ष करतात. या कांडांना "चुकीचे" असे गेली हजारो वर्षे शेकडो संत/ अभ्यासक सांगत आले आहेत. तेही अयशस्वी झाले याचे कारण सर्वसाधारण माणूस यांच्याप्रमाणे "विचारवंत" नसतो. (वैयक्तिक: यनावालांची तर्कक्रीडा साधारणत: ५% वाचकही सोडवू शकत नाहीत.

नाते तुझे नि माझे ना सापडे अताशा

शुक्रवार, 15/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
ज्याची मनास भीती तेची घडे अताशा कोणीच ना पहाते माझ्याकडे अताशा दिसती दुभंगलेले मज सोबती जिवाचे डोळ्यांस काय माझ्या गेले तडे अताशा? मी बोलतो तुझ्याशी साध्यासुध्या मनाने त्यातून शोधिसी का तू वाकडे अताशा दूरातूनी विराणी सनई उदास गाते ह्रदयास घाव देती अन चौघडे अताशा इतके जपून होते ह्रदयात ठेवले की नाते तुझे नि माझे ना सापडे अताशा पूर्वी तुझ्या मनाशी बेबंद बोलणारे- मन बोलता स्वतःशी का गडबडे अताशा? इतके गढूळ झाले जीवन प्रदूषणाने लोकांस तारणारी गाथा बुडे अताशा हुंड्या परी अताशा गेल्या जुन्या प्रथाही दिसतात संपलेले हिरवे चुडे अताशा -स्वानंद

प्रेमाचा चौकोन

शुक्रवार, 15/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
एक हिन्दी शेर आहे. कदाचित तुला माहीत असेल. - मोहब्बत का सफर है, पता मंझिलसे पुछो.. उनकी बात छोडो, तुम अपने दिलसे पुछो। म्हणजे तुझ्या प्रेमाखातर कोणीही उठून काहीही म्हणेल, तुझ्या मनात कोणती मंझिल दडलेली आहे ते महत्वाचे. अन् तेच तू जाणून घ्यायला हवं. हे प्रेमज्ञान पाजळण्याचं कारण हेच की तुझ्या प्रेमासाठी तुझ्याभोवती प्रेमाचा त्रिकोण नाही तर चौकोन झाला आहे! वरील डाव्या बाजूच्या कोनात तुझे स्थान गृहीत धरले तर इतर तीन कोन म्हणजे गणेश, सचिन व सुशील हे होत. मुळात प्रेमाचा हा चौकोन असल्याने कोणीतरी एकच फार नजिक येणारा आहे. जर चौरस कल्पिला असता तर तिघेही तुजपासून समसमान अंतरावर राहिले असते.

दुर्गदुर्गेश्वर रायगड

लेखक योगेश२४
शुक्रवार, 15/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
=========================================================== =========================================================== || रायगडावर खडे पसरले, शिवरायांच्या पायी हिरे माणके, ती आम्हाला, दुसरी दौलत नाही || =========================================================== ===========================================================

घन ओथंबून येती

लेखक शरद
शुक्रवार, 15/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
घन ओथंबून येती वनात राघू घिरघिरती पंखावरती सर ओघळती झाडांतुन झडझडती घन ओथंबुन झरती नदीस सागरभरती डोंगरलाटा वेढित वाटा वेढित मजला नेती घन ओथंबुन आले पिकात केसर ओले आडोशाला जरा बाजूला साजण छेलछबेला घन होऊन बिलगला ना.धों महानोर या महानोरांचे एक वैशिष्ट्य़: यांच्या कवितेला निसर्ग,खेडे, शेत, पाऊस, पीकपाणी इ. यांतून बाहेरच पडता येत नाही. स्वत: कवीलाही आणि म्हणून वाचकालाही .खेड्याचे दु:ख ते कवीचे दु:ख, ओल्या जमीनीचा आनंद तो ह्याचा आनंद,शेताचे सृजन ते ह्याचे सृजन! कवी काव्य का लिहतो ?

सरकारी योजना

शुक्रवार, 15/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सरकारी योजना
माझ्या गावाचा रस्ता कधी सवान* होतच न्हाई सरकारी योजना इथं कधी पोहचतच न्हाई गाई म्हशी आम्ही पाळतो, सकाळी धारा काढतो उन वारा थंडीचं, दोन पैशासाठी दुध शहरात पाठवतो घरात पोरांच्या ओठांना दुध राहातच न्हाई सरकारी योजना इथं कधी पोहचतच न्हाई शाळा!
काव्यरस