Skip to main content

तिचं स्वप्न

लेखक रन्गराव
शनिवार, 23/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सुझान बॉईल ह्या गायिकेचा हा मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षांसमोर गाण्याचा हा पहिलाच प्रसंग. रीयॅलटी शोमध्ये जिथं ग्लॅमर हा सर्वात मोठा भाग असतो तिथ ही खेडवळ दिसणारी स्त्री ऑडिशनसाठी आली तेंव्हा तिच हसू झाला. पण ज्याक्षणी तीने गायला सुरुवात केली तेंव्हा तो कुस्चितपणा कौतुकात बदलल. आपल्या स्वप्नांना कधी ही सोडू नये अशी प्रेरणा देनारी ही विडिओ क्लिप ( चित्र फीत अस लिहिनार होतो पण परा भाऊ.ची ईग्रचीशी नाळ तुटू नये म्हणून ही खट्पट्! ;) )

आता करा कथा....

लेखक अथांग
शनिवार, 23/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
रेच दिवस पाळत ठेवून असलेल्या घरात, आज शेवटी चोरी करण्याचा निर्णय खंडुने घेतला. घरातील तरुण मंडळी सुट्टीसाठी बाहेरगावी गेल्याचे त्याच्या हेरांनी त्याला सांगितले. आता घरात केवळ म्हातारे आजोबा. म्हणजे थोडक्यात काम फत्ते ! उच्च मध्यमवर्गीय वस्तीमधल्या ३ बेडरुम च्या घरात कुठल्या कीमती वस्तुंवर डल्ला मारता येईल याची खंडुची मनातल्या मनात उजळणी देखील करुन झाली. त्या दृष्टीने हत्यारे (टुल्स) ची जमवाजमव सुद्धा झाली. सगळ्या गोष्टी छान जुळून आल्याबद्दल त्याने मनोमन समाधानही व्यक्त केले. 'इंतजार का फल मीठा ही होता है' अशी वाक्ये आठवून खूश सुद्धा झाला.

हे लोक कॉलेजात का गेले ?

शनिवार, 23/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आज एक विचारप्रवर्तक लेख वाचण्यात आला: http://chronicle.com/blogs/innovations/why-did-17-million-students-go-t… सुमारे सव्वातीन लाख वेटर्स, अंशीहजार बारटेंडर्स ह्यांना कॉलेजातील ब्याचलर डिग्री आहे ! एवढेच नव्हे तर, आठ हजार वेटर्सना पीएचडी किंवा व्यावसायिक पदव्या आहेत. अणि सर्वात धक्कादायक म्हणजे सुमारे ५०० भंग्यांना पी एचडी पदवी आहे !!!

मी मिसळपाव ची सभासद होते त्याची गोष्ट

लेखक प्रभा
शुक्रवार, 22/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मी प्रभा. मिसळपाव ची नवी सभासद. माझे मेहुणे श्री सुधीर काळे यांच्या प्रयत्‍नांमुळे व मी नक्कीच लिहू शकेन या त्यांच्या माझ्यावरच्या विश्वासामुळे मी "मिपा" ची सभासद झाले. श्री काळे यांचे "मिपा" वर खूपच लिखाण आहे. ते मध्यंतरी ठाण्यात आले असताना त्यांनी माझ्या "मिपा" च्या सभासदत्वासाठी प्रयत्‍न केले. पण कधी कधी प्रत्येक गोष्टीत, अगदी लहान लहान गोष्टीतही सारखी माशी शिंकत असते. आता ही माशी कशी शिंकते हे मला माहित नाही. तिचा शिंकण्याचा आवाज कसा असतो? तिचे नाक कोठे असते? हे कोणालाच माहित नाही. मुळात माशीला सारखी सर्दी होतेच कशी?

कोजागिरी पौर्णिमा २०१०

शुक्रवार, 22/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आज शुक्रवार, आम्हा चाकरमान्यांची हक्काची सुट्टी, इकडची एमआयडिसी शु़क्रवारी बन्द असते. त्यात आज सुट्तीच्या दिवशी कोजागिरी म्हणजे दुधात साखरच / गार्लिक ब्रेड विथ चिझ ;) मी ठरवले होते कि आज काहितरी छान पदार्थ करायचा. त्यात काल निवेदिता-टाईची काजुकतरीची पा़क्रु पाहिलि व ठरवलेच की करुन पहायचीच, सोपी पण वाटली. एक मैत्रीण कायमची दुबई सोडुन गेली तेव्हा घरातले काजु तिने मला दिले हे लक्शात होतेच.

तारूण्य

लेखक शुचि
शुक्रवार, 22/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
तारूण्य सळसळतं, जोमदार, उत्साहाने परीपूर्ण असतं नव्हे ते तसच असलं पाहीजे. वार्‍याने भरलेलं शीडाचं तारू पूर्ण जोमाने आपल्या ध्येयपूर्तीकडे निघावं तसं काहीसं. "हे विश्वाचे आंगण आम्हा दिले आहे आंदण रे" या ओळी तारूण्याला चपखल लागू पदतात असं मला नेहमी वाटत आलं आहे. अफाट उत्साह, अमाप शक्ती, सकारात्मक दृष्टीकोन, अशक्यप्राय काहीही न वाटणं, संप्रेरकांचे उधाण - जे जे काही चांगले ते ते या काळात वाट्याला येते. स्वप्न, ध्येय, महत्त्वाकांक्षा यांची लयलूट म्हणजे तारूण्याचा सोनेरी ऋतू. जगाच्या शाळेत नुकतच पाऊल टाकलेलं असतं. दुर्दम्य आशावाद मी मी म्हणत असतो. प्रत्येक अनुभव जवळून घ्यावासा वाटतो.

रोहिंटन मिस्त्री वि. आदित्य ठाकरे - महाराष्ट्राच्या सुवर्णयुगाची पहाट?

शुक्रवार, 22/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आदित्य ठाकरे एका वीस वर्षांच्या वाघाच्या बच्च्यानं नुकतीच आपली नखं दाखवून आपल्या उज्ज्वल कारकीर्दीची सुरुवात केली आहे. उध्दवजी ठाकरे यांचे सुपुत्र आणि सन्माननीय श्री. बाळासाहेबांचे नातू आदित्यजी ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून एका यःकश्चित कादंबरीची जी रातोरात हकालपट्टी केली आहे ते पाहून मराठी माणसाची मान अभिमानानं पुन्हा एकदा उंचावली गेली आहे. रोहिंटन मिस्त्री नावाच्या एका पारशाच्या 'सच अ लाँग जर्नी' या कादंबरीला २००७ मध्ये जेव्हा मुंबई विद्यापीठाच्या बी.ए.