Skip to main content

भाषिक संपत्ती

Published on मंगळवार, 26/10/2010
भाषिक संपत्ती - लहानपणापासुन आवडता असलेल्या विषयावर लिहायला घ्यावे असा विचार केला त्यावेळेस याहुन जास्त समर्पक शीर्षक नाही सुचले. सध्या शिव्या (किंवा मराठीत ज्याला आपण स्लँग म्हणतो) मर्दानगीचे प्रतिक आहेत असे मौलिक ज्ञान मला नुकतेच मिळाले आहे. त्यामुळे या संपत्तीचे मोलही प्रचंड वाढले आहे. असे म्हणतात की कुठल्याही भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर प्रथम त्या भाषेतल्या शिव्या शिकुन घ्याव्यात. आमच्यासाठी ही प्रक्रिया फार लवकर सुरु झाली. मायबोलीतल्या काही "मर्दानी" शब्दांवर आम्ही खुप लवकर प्रभुत्व मिळवले. कोल्हापुरात असताना (माझा लेख सुपरहिट्ट होणार.

कित्ती कित्ती छान!

लेखक लिखाळ
Published on मंगळवार, 26/10/2010
परवाचाच अनुभव आहे. म्हणावे तर साधासाच. पण खूप काही शिकवून जाणारा. असे अनुभवच आपले जीवन खुलवत असतात, फुलवत असतात. आयुष्याचे निराळेच पैलू अवचित आपल्या समोर आणून आपले भावविश्व कुठेतरी समृद्ध करत असतात. झालं असं की मी बस मधून एके ठिकाणी निघालो होतो. आत गेल्यावर बसायला जागा मिळाल्याने स्वारी थोडी खुष होती. एक दोन स्टॉप गेल्यावर अचानक एक मध्यम वयीन काकू आल्या आणि ओरडूनच म्हणाल्या की मला बसू द्या..स्त्रीयांचा काही मान ठेवत नाहीत.. नियम पाळत नाहीत वगैरे वगैरे.. मी खरेतर स्त्रीयांसाठी राखीव जागेवर बसलो नव्हतो. माझा चेहरा एकदम गोरामोरा झाला.

पुणेरी आजोळ- ई-पुस्तक प्रकशित..

Published on मंगळवार, 26/10/2010
पुण्यासारखं आजोळ लाभणं म्हणजे कोणतंतरी पुण्यकर्मच म्हणायचं. पुण्याशी नातं जोडायला अनेकजण उत्सुक असतात. मग ते राजकीय असो वा सामाजिक अथवा वैयक्तिक. तिचं माहेर पुणं आहे याचा आमच्या आईला पराकोटीचा अभिमान होता. पुण्याशी नाळ जोडलेली होती ती अशी. मराठी वाचक असो वा लेखक पुण्याची हौस अन् आस सर्वांनाच. बहुतेक मराठी 'नेट'कर हे पुणेकरच आहेत. पुणे जिल्ह्याच्या हद्दी नजिक असले तरी नेटीव्ह प्लेस म्हणून पुण्याचा उल्लेख करायला कचरत नाहीत. इतका पुण्याचा सर्वांना लळा लागलेला असतांना आम्ही तर ते आजोळच्या नात्यानं पाहिलं, अनुभवलं.

आई..मिटलेला श्वास - ३

लेखक गणेशा
Published on मंगळवार, 26/10/2010
आई..मिटलेला श्वास - २ ... http://www.misalpav.com/node/15014 पार्श्वभुमी: मळकट पायवाट .. गावाला दूर गेल्यावर ही तेथील प्रत्येक गोष्टींमध्ये आपल्या आई बद्दलच्या दाटुन आलेल्या भावनांच्या या पारंब्या ते वडाचे झाड वाळके दोरा बोहताली करकच्च स्वप्नझुल्यांच्या पारंब्या ओस भावना दाटलेल्या भरगच्च आकाशात किंचाळते वीज सुनसान मी भयभीत स्मरणात तुझीया संपते खोल हुंदक्यांची रात रस्त्यात उभे वारुळ मनाचे उडलेले डाग स्वप्नपारंब्या खाली निजते माझे विचारगाव ----- शब्दमेघ
काव्यरस

बाबा झाल्यावर....

लेखक ५० फक्त
Published on मंगळवार, 26/10/2010
आताशा माझे पिल्लू ३ वर्षे १० महिन्यांचे आहे, कधी अड़ते कधी पड़ते. कधी त्याला समजावतो कधी रागावतो. हे त्याच्या वागन्या पेक्षा माझ्या मूड वर जास्त अवलंबून असते. नंतर उगाच विचार करतो बाबा पण असेच काही करायचे ना. लहानपणी मी एकदा घरात काहीतरी माझ्या मनासारखे झाले नाही म्हणून चिडून बसलो होतो आणि मग घर सोडायला निघालो होतो, फकत बाबांची वाट पाहत होतो. अशासाठी की बाबा येउन माझा प्रश्न सोडवू शकतील अशी आशा होती. बाबा आले शालेतुन आणि घराबाहेर पाय-यावर बसून माझ्या बरोबर बोलत होते १० च मिनिटे.

राज ठाकरेंचे भाषण.. एक विचार..

लेखक पंख
Published on मंगळवार, 26/10/2010
(मी कुठल्याही पक्षाचा समर्थक, कर्यकर्ता अथवा संबंधित नसून केवळ जे वाटतेय तेच लिहित आहे.. मिपाच्या धोरणाबाहेर असल्यास लेखनास पंख देऊन ऊडवले तरी चालेल..) कडोंमपा निवडणुकीच्या निमित्ताने राज ठाकरेंनी काल केलेले भाषण टिव्हीवर लाईव्ह बघितले.. काय बोलतो तो माणूस.. गेल्या दोनेक वर्षांत त्यांनी जी मजल गाठली आहे ती कौतुकास्पद आहे. अगदी मनापासून बोलायचं झाल्यास सध्या महाराष्ट्रात निश्चित दिशा असलेला एकमेव नेता म्हणून राज ठाकरेंचेच नाव घ्यावे लागेल. कालच्या त्यांच्या भाषणातील एक मुद्दा मात्र खरोखर विचार करायला लावणारा होता.. राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात टाईम्स ऑफ ईंडीयातील एका लेखाचा संदर्भ दिला.

मसंमहात्म्यस्तोत्र

लेखक अवलिया
Published on मंगळवार, 26/10/2010
राम राम मंडळी हल्ली अनेकांचे प्रतिसाद उडतात. लेख उडतात. कविता उडतात. इतकेच काय तर काही काही आयडी सुद्धा उडतात. कंपू त्रास देतो. लेखन प्रतिसाद लिहितांना घाबरल्यासारखे होते. अनेकांना अनेक गोष्टी आंतरजालावर वावरतांना त्रासदायक होतात. या सर्वांवर उपाय म्हणुन आम्ही लिहित असलेल्या संकेतस्थळपुराणातील मसंअध्यायातील एक स्तोत्र देत आहोत.

भीती

लेखक पारा
Published on मंगळवार, 26/10/2010
माझा मराठीत कथा लिहायचा हा प्रथम प्रयत्न. चूकभूल माफ असावी...:) तिला जरा जास्तच उशीर झाला होता आज. नाही म्हणजे कामं काय असतातच सारखी पण म्हणून रात्रीचे साडे-अकरा ? तरी बरं की तिच्या बॉस ने तिला घरापर्यंत सोडण्यासाठी वाहन पाठवलं होतं. ती तशी कार्यालयापासून दूर राहायची. तब्बल एक तास लागायचा तिला घरी पोहोचायला. आता रहदारी कमी जरी धरली तरी चाळीस मिनिटांच्या आत काही ती पोहोचू शकणार नव्हती. तिने गाडीवाल्याला फोन लावला आणि मुख्य गेट वर वाट बघत उभी राहिली. गाडीवाला तसा तिच्यासाठीच थांबला असावा. कारण तिने फोन केल्यावर तो लगेचच आला तिला न्यायला. त्यांचा नेहमीचा ओळखीचा माणूस होता तो.

जिस्म आणि इतर

लेखक फारएन्ड
Published on मंगळवार, 26/10/2010
हा सगळा रिव्यू फक्त 'जिस्म' या एकाच चित्रपटाचा नाही, 'जिस्म', 'रोग', 'क्रिमिनल' व इतर अनेक महेश भट किंवा विक्रम भट आणि इतर नेहमीचेच (अ)यशस्वी यांचे चित्रपट पाहिले आणि त्यात ज्या कायम दिसणार्‍या गोष्टी आहेत त्याबद्दल हे आहे. असे चित्रपट पाहताना सतत जो वैताग येत असतो त्याचे असंबद्ध वर्णन समजा:-) या सर्व चित्रपटांत सहसा ठोकळेबाज अभिनेते असतात, जॉन अब्राहम, अश्मित पटेल, डिनो मोरिया बरेचसे मुळचे मॉडेल्स. नायिकाही तशाच. यांना इतर कोणते रोल झेपणार नाहीत म्हणून शक्यतो कोरडा ठण्ण चेहरा करून वावरण्याचे रोल त्यांना देतात, म्हणजे फॅशन डिझाइनर, यशस्वी बॅचलर , बिझिनेसमन वगैरे.