मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

युध्द : जागतिक अर्थव्यवस्थे ची गरज ?

वडिल ·
जागतिक अर्थव्यवस्था कोलमडत आहे. अमेरीके सारखा श्रीमंत देश जवळ जवळ कंगाल झाला आहे. युरोप त्याच स्थितित आहे. भारत , चीन, ब्राजिल, रशिया सारखे देश जागतिक अर्थव्यवस्था पुन: जिवित करतील अशी आशा जगभर आहे. ओबामा नंतर रशिया, चीन , फ्रान्स आदि देशांचे प्रमुख भारताचे कौतुक करुन (हरभर् या च्या) झाडावर चढवत आहेत. स्वत: च्या फायद्या साठि भारतीय बाजारपेठ आणि कन्जुमर कडे सगळ्यांचे लक्ष आहे. युध्द शस्त्राचा भारत हा मोठा आयात कर्ता आहे.

चिलीया बाळाची कथा

विजुभाऊ ·
दत्तगुरूच्या संदर्भातील काही कथांवर इथे बरेच चर्वण झालेय. त्याच संदर्भातील एक गाणे आठवले . त्या गाण्यात " चिलीया बाळाची बारीक भाजी " असे काहीसे शब्द होते ती कथा नक्की काय आहे हे कोणास ठाऊक आहे का? असल्यास ती कथा काय आहे ते सांगावे. चिलीया बाळ कोण होता ? दत्त संप्रदाय आणि नाथसंप्रदाय हे एकच की वेगवेगळे? हे संप्रदाय कोणी स्थापन केले? नाथ संप्रदयातील गुरुपरंपरेबद्दल कोणी सांगेल का?

चीनचे मनसे.

विजुभाऊ ·
चीन सरकारने एका अध्यादेशाद्वारे चिनी भाषेत इतर भाषीक शब्द येवून त्यामुळे चिनी भाषेत भेसळ होऊ नये म्हणून इतर भाषीक शब्दाची सरमिसळ करण्यास मनाई केलेली आहे. http://www.bbc.co.uk/hindi/news/2010/12/101221_china_english_ak.shtml हे भाषेची जपणूक करण्याचे आदर्ष उदाहरण ठरेल. किंवा चीन सरकार्ची प्रषंसा केली जाईल. मराठी लोकानी असे केले तर ते म्हणे नतद्रष्तपणाचे ठरते. मराठीवर हिंदी भाषेचे जे आक्रमण चालले आहे ते पहाता मराठी भाषेला सर्वात मोठा धोका इंग्रजीपासून नाही तर हिन्दी भाषे पासून आहे. गुजरातमध्ये देखील गुजरात सरकारने दुकानांचे फलक गुजरातीमध्येच असणे आवश्यक आहे नियम केला आहे.

स्टेटस चेंज्ड... आशिर्वाद हवेत !!

चिगो ·
लेखनप्रकार
मी पारतंत्र्यात आलो... जवळपास ४ वर्षांआधी माझ्या अटकेचा प्रस्ताव (प्रपोजल) मी माझ्या प्रेयसीसमोर मांडला.. त्यावर बराच विचार करुन झाल्यावर तिने मंजूरी दिली. नंतर हा प्रस्ताव हायर कोर्टांमधून पास होत होत फायनली त्याला मंजुरी मिळाली, आणि ०२डिसेंबर २०१० रोजी आम्ही विवाहबद्ध झालो... (ढिसक्लेमर - लग्नाची पत्रिका मिपावर टाकणार होतो, पण स्कॅनर नव्हता आणि फोटोपण स्पष्ट येत नव्हता. नंतर धावपळीत ते राहूनच गेलं.

सचिनला कराचीच्या 'गॉन'चा मानाचा मुजरा!

सुधीर काळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सचिनला कराचीच्या 'गॉन'चा मानाचा मुजरा! कराचीहून प्रसिद्ध होणार्‍या 'गॉन' या वृत्तपत्राचा मी नियमित वाचक आहे 'मिपा'वर बर्‍याच लोकांना माहीत आहे. आज या पाकिस्तानी वृत्तपत्राने अतीशय सुंदर भाषेत सचिनला मानाचा मुजरा केला आहे! वाचा खाली दिलेल्या दुव्यावर! http://www.dawn.com/2010/12/21/tendulkar-s-feat.html Tendulkar’s feat December 21, 2010 ताजमहालाला वीट लावण्याचा प्रयत्न न करता मी एवढेच लिहितो कीं हे वृत्तपत्र म्हणते कीं सचिनचा पराक्रम केवळ क्रीडाक्षेत्रापुरता मानणे चुकीचे ठरेल तर तो शास्त्र, कला, साहित्य या सर्व क्षेत्रातील विक्रमाच्या तोडीचा आहे.

अतिरेक्यांना पोसण्यासाठी अस्तित्वात असलेला देश : भारत

गांधीवादी ·
जर्मन बेकरी बॉंबस्फोटातील आरोपी मिर्झा हिमायत बेग याला येरवडा कारागृहात वाचण्यासाठी कुराण, वर्तमानपत्र द्यावे, असा आदेश विशेष न्यायाधीश उषा ठाकरे यांनी दिला. १३ फेब्रुवारी २०१० रोजी सायंकाळी सातच्या सुमारास एका बॉम्ब स्फोटाने १७ निष्पापांचा जीव घेतला आणि ५०-६० लोकांना जखमी केले. हे अघोरी कृत्य करण्यास जबाबदार असलेल्या मिर्जा हिमायत ऊर्फ युसुफ बेग याला (७ महिन्यांनी) अखेर राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने पुणे येथून अटक केली.