Skip to main content

करा बाई करा ग देवीची आरती

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 29/12/2021 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
करा बाई करा ग देवीची आरती करा बाई करा ग मानाची आरती आणा बाई आणा ग देवीला कुंकू लवा बाई लावा ग देवीच्या कपाळा भरा भाई भरा ग देवीचा मळवट नेसवा बाई नेसवा ग देवीला नवूवारी घाला बाई घाला ग देवीला नथनी घाला बाई देवीला मंगळसुत्र घाला बाई घाला देवीला कमरपट्टा घाला बाई घाला ग देवीला तोडे चाल बदलून ए निरांजन दिवा ताटात आणा हळद कुंकू घेवून धूप कापूर पेटवा करा देवीची आरती भक्त सारे ओवाळती पहिली चाल करा बाई करा ग देवीची आरती करा बाई करा ग मानाची आरती - पाभे २९/१२/२०२१

पाळणा झुलू दे

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 29/12/2021 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
असा झुलू दे झुलू दे पाळणा झुलू दे या पाळण्यात माझ्या बाळाला खेळू दे माझ्या या अंगणी आला ग श्रीरंग काय सांगू बाई माझ्या बाळाचे रंग किती द्वाड तो धावतो घरात आवरता आवरेना दिस जाई त्याचे संग काय काय मागतो खायला प्यायला लोणी श्रीखंड बासूंदी करंजी घेते मी कराया रव्या बेसनाचे लाडू मोतीचूर भरपूर केली खीर, कोशिंबीरी सोबतीला शेवया माझ्या या बाळाला आयुष्य उदंड लाभू दे असा झुलू दे झुलू दे पाळणा झुलू दे असा झुलू दे झुलू दे पाळणा झुलू दे या पाळण्यात माझ्या बाळाला खेळू दे - पाषाणभेद २९/१२/२०२१
काव्यरस

लक्ष्मणपूर, एक पडाव.....

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 29/12/2021 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
"अन्नासाठी दाहीदिशा", या व्यंकटेश स्त्रोतातील श्लोका प्रमाणे जगदीशाने आम्हाला उचलले आणी जेथे भाग्योदय होणार होता (देवा घरचे ज्ञात कुणाला ) आशा गावी आणून सोडलं. तब्बल चौदाशे कि. मी. दूर, कोवळ्या वयातला मी, कधी आपली गल्ली सोडून दुसर्‍या गल्लीत खेळायला सुद्धा गेलो नव्हतो (मी मनात सुद्धा माझ्या, कधी दंगा केला नाही ) आसा स्वभाव होता. गोविंदाग्रजांची ( राम गणेश गडकरी), ‘एखाद्याचे नशीब’ नावाच्या अर्थपूर्ण कविते मधल्या शेवटच्या ओळी सारखे आम्ही त्या मुळे "बुडत्याला काडीचा आधार" , म्हणून " आलिया भोगासी ".

तुम मेरे हो

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 29/12/2021 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात इच्छाधारी नाग हे एक स्वतंत्र प्रकरण आहे. जुन्या ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट नागिनपासून ते आजपर्यंत इच्छाधारी नाग - नागिणींवर अनेक सिनेमे आले. इच्छाधारी नाग - नागिण सिनेमातून टीव्हीच्या चॅनलवरही आले आणि चांगले चार-पाच सीझ्न होईपर्यंत चालले. इतकंच नाही तर अगदी एलओसी ओलांडून पाकिस्तानातही गेले आणि तिथल्या टीव्हीसिरीयलमध्येही हिट झाले. आपल्याकडे वैजयंतीमाला, रीना रॉय यांची इच्छाधारी नागिण हिट झाली खरी पण ती खर्‍या अर्थाने गाजवली ती श्रीदेवीने.

ध्रांगध्रा - १

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 28/12/2021 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
ध्रांगध्रा - १ "आता हे झाड दिसतय ना त्याच्या बाजूने पुढे गेलो की दिसेलच आपल्याला." "आरे असं सांगून दाखवलेलं हे पाचवं झाड." "नाही रे, या वेळेला अगदी खरं. माझे गट फिलींग सांगतंय मला. यावेळेला अगदी खरं दिसेल ते आपल्याला. मला तर मनातून आत्ता ते दिसायलाही लागलंय." "काय?" "काय म्हणजे? आपण जे शोधतोय ते. ते मोठे देऊळ. त्याच्या त्या दगडी भक्कम भिंती... त्याचा भव्य दिंडी दरवाजा..... देवळाशेजारी उभे असलेलं पिंपळाचं झाड, झाडाखाली प्रशस्त पार. सगळं दिसतंय बघ मला अगदी मनात." "बघ बघ नीट बघ. पारावर माणसे पण बसली असतील तिथे.

आयुष्य

लेखक VRINDA MOGHE यांनी मंगळवार, 28/12/2021 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
डिसेंबर हा आला, चालला जाता हाती काय उरेल ? , तारखा वार ते तसेच असतील, आयुष्यही हे असेच सरेल !! अशीच वर्षे येतील जातील, एकवीस गेले बावीस येईल, आयुष्य असेच वाहत राहील न कळे कुठे मुक्कामी नेईल !! कशास हवे मनावर ओझे, नकोशा चिंतांचे वाहणे, आयुष्य सरण्याआधी आपली पुण्याची ती झोळी भरणे !! आपुल्या न हाती काही, तरीही फुकाचे 'मी' मीपण, आनंद वाटत जगताना , मनात असावे ईश स्मरण !! -वृंदा

एक स्वप्नपूर्ती - SR होण्याची भाग 3 (400 किमी)

लेखक मालविका यांनी मंगळवार, 28/12/2021 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
एक स्वप्नपूर्ती - SR होण्याची भाग 3 (400 किमी) 300 ची BRM तर पूर्ण झाली, आता 400. लगेच 4 डिसेंबरला मुंबई क्लबची मुलुंड - चिखली - मुलुंड अशी BRM होती. दापोलीच्या खानविलकर आणि पालवणकर ने नाव दाखलही केलं. पण 300 च्या BRM ने माझी खूपच वाईट अवस्था केली होती. हात आणि बोट दुखत होती. करंगळी आणि अनामिका बधिर अवस्थेत होत्या. खांदे दुखत होते. मी जराही उत्सुक नव्हते.श्रीनिवास चा देखील 300 च्या वेळेस पाय दुखायला लागला होता.IT बँड दुखावला अस काहीसं कळलं. अशा वेळी आठवडा पण पूर्ण विश्रांती नसताना 400 ची रिस्क घ्यायची का? तर उत्तर नाही असाच आलं. आम्ही मनोज दादाला दापोलिकरांबरोबर जायला सांगत होतो.

कळले तुजला?

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 28/12/2021 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
कारण काढून भेटायाचे किती दुरूनी आलेला तू! लपवलेस तू मनातले तरी किती बाभरा झालेला तू! कळले मजला... विचारसी तू देऊन हाती चित्रे काही सापडते का यांच्यामधले लपले अक्षर? इतके बोलून सहज उभा तू माझ्यामागे आणि इथे मी चूर लाजुनी शोधीत उत्तर कळले तुजला? मधुभासांचे रिंगण पडले सभोवताली गोंधळले मी तुझा गंध का होते अत्तर? केसांवरती तव श्वासांची मोहक फुंकर क्षणाक्षणाला वितळत होते मधले अंतर कळले तुजला?? श्वास रोधुनी उत्सुक मी रे काही घडण्या.. मिसळून गेली शब्दांमध्ये चित्रे झरझर.. काय बोलले किंवा हसले काही स्मरेना आठवते ती अनोळखीशी नाजूक थरथर.. कळले तुजला??? किती मनाला आवरले तू... आणि मलाही सावरले तू.. कळल
काव्यरस

कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - २

लेखक टर्मीनेटर यांनी सोमवार, 27/12/2021 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग : कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - १
सकाळी नऊच्या सुमारास जाग आली. काल येताना दुध आणायचे राहुन गेले होते पण घरात Dairy Whitener होते, ते घालुन चहा बनवून प्यायला आणि नाष्ट्यासाठी पेण मधील श्री ऊपाहार हॅाटेलचे मेनु कार्ड बघुन ‘आज स्पेशल’ विभागात वारा नुसार दिलेल्या यादीतील गुरूवारी मिळणाऱ्या छोले भटुऱ्यांची ॲार्डर व्हॅाट्सॲपवर दिली.