Skip to main content

मदत हवी आहे

लेखक रणजित चितळे यांनी मंगळवार, 04/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
दाण्याची कोरडी चटणी व ठेचा कसा करायचा त्याची कृती हवी आहे

कांदे पोहे...

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 04/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
[संवाद... ] आतुर नजरेचा... एकच कटाक्ष हलकासा... हळुवार शिडकावा...अबोल शब्दांचा... तरल स्वप्नांचा... उंच किनारा ... अंगावर शहारा...थरथरत्या भावनांचा... [गीत...] मन हे बेधुंद झाले बावरले .. हरवले .. स्पर्श स्वप्नांचा घेवूनी नयनात सामावले !! क्षण हे गोंधळलेले थोडेशे बावरलेले अंगणात हृद्याच्या नभ अवतरलेले !! [संवाद...] हवी हवीशी सळसळ... कातरलेल्या वेलीची ... चंदेरी बरसात आज... नक्षत्राच्या चांदण्यांची... सोनेरी किरणांची... आकाशी नक्षी... अल्हाद मोहक निर्मळ...
काव्यरस

पानिपताची मराठी भाषेला देणगी?

लेखक चिंतातुर जंतू यांनी मंगळवार, 04/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
पानिपतच्या लढ्याला आता २५० वर्षं पूर्ण होतील. पानिपत आणि तिथं झालेला पराभव ही मराठी माणसाला सलणारी आणि सहज विसर न पडणारी अशी गोष्ट आहे. पण त्यामुळे 'पानिपत होणे' असा एक वाक्प्रचार मराठीला मिळाला. पानिपताविषयीची बखरींतली किंवा मौखिक परंपरेतली वर्णनं, पोवाडे वगैरेंमधून असे इतर काही शब्द मराठीला लाभले का? असतील तर ते कोणते याविषयी माहिती हवी आहे.

नवलकोल आणि मुळ्याच्या पानांचा भगरा/झुणका

लेखक जागु यांनी मंगळवार, 04/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
काल मी नवअलकोल आमटीसाठी आणि कांदेमुळा सॅलेडसाठी आणला होता. आणि हा जिवनसत्ववाला पाला टाकुन देण जिवावर आल.

आल्फा मेल

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 04/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
अँगल चे नॉमेन्केचर आल्फा,बिटा,थिटा हे मला माहीत आहे. हे आल्फा मेल म्हणजे नेमके काय असते? ह्याची व्याख्या काय? ह्या मंडळीची नेमकी दिनचर्या काय असते? ह्यांना हे नाव नेमके कशामुळे मिळते? ----------------------------------------------------------------------------------------- रोज आपल्या बायको किंवा होणार्‍या बायकोकडुन जोडे खातो, खरे खुरे किंवा शाब्दिक. आणि बिटा सारखा लाल लाल होतो तो बिटा मेल. अगदी चांदीच्या ताटात वाढुन समोरुन वाढुन आले तरी त्याचा आस्वाद न घेउ शकणारा थिटा मेल. पण हे आल्फाची व्याख्या काही माहीत नाही बॉ?

कसे वर्ष गेले हरवून ...!!!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 04/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ष कसे गेले कळलेच नाही कसे दिवस जातात पटकन हरवून किती वर्ष गेली हे तरी कोठे समजले कधी .त्याला .?? जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत केले जुने वर्ष संपताना ते बिचारे हताश होऊन गेले फटाके कुणासाठी वाजले हे त्याला कळले देखील नाही हिरमुसले रुसले हलकेच निघून गेले काय दिले त्याने ? काय घेतले तुम्ही ?? काय घेतले ठाऊक नाही काय हिरावून नेले हे फक्त लक्षात राहिले त्याचा जिवाभावाचा भाऊ गेला आठवण आली की , काळीज फुटून जातेय त्याचे जगणे फक्त ढकलून दिले जाते काळोखाच्या समुद्रात विरघळून जावेसे वाटते त्याला शप्पत ...
काव्यरस

दादाजीपंतांनी सिऊबास शहाणे केले

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 04/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, लोकप्रभातील श्री. पांडूरंग बलकवडे यांचा खालील लेख जरूर वाचावा आणि इतरांस वाचण्यास प्रवृत्त करावे. ब्रिगेडच्या अतिरेक्यांना दादोजींनी जिजाऊंचा मातोश्री असा उल्लेख करून चोख उत्तर दिले आहे. लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा ! आपल्या पुढार्‍यांइतकी नीच माणसे या पृथ्वितलावर सापडणे नाही. जयंत कुलकर्णी.